maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ब्राइट फ्युचरचा १४ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३: ब्राइट फ्युचर या तरुणांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि तरुणांचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या प्रख्यात अशासकीय संस्थेने नुकताच प्रभादेवी येथील प्रतिष्ठित रवींद्र नाट्य गृहातआपला १४ वा वर्धापन दिन साजरा केला. “अवेक, ऍस्पायर, अचिव्ह” या थीमवर असलेल्या या कार्यक्रमाने १००० हून अधिक ब्राइट फ्युचरचे माजी विद्यार्थी, डोनर्स, एम्प्लॉई पार्टनर्स एकत्र आणले, या सर्वांच्या मदतीमुळे संस्थेने युवकांच्या आकांक्षा व स्वप्न जोपासण्याची सतत वचनबद्धता दर्शवली आहे. कार्यक्रमाची सुरुवात मंत्रमुग्ध करणाऱ्या शास्त्रीय स्वागत नृत्य सादरीकरणाने झाली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक श्री किशोर पालवे ह्यांचा हस्ते रोपटे लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यानचा एक महत्त्वाचा क्षण म्हणजे “बंधन ऍप्लिकेशन” चे अधिकृत लॉन्च. हे नाविन्यपूर्ण मोबाइल एप ब्राइट फ्यूचरच्या माजी विद्यार्थ्यांकरिता नोकरीत टिकून राहण्या करिता आवश्यक असणारी कौशल्य प्रधान करेल, युवकांना एका समान व्यासपीठावर जोडून ठेवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे, जे युवा वर्गातल्या त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक उत्कर्षासाठी सतत मार्गदर्शन प्रदान करेल.

हे ऍप प्रसिद्ध युथ आयकॉन, प्राणीप्रेमी आणि कोरिओग्राफर श्री श्रेष्ठा अय्यर आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कुशल अभिनेते श्री आशुतोष गायकवाड यांनी लॉन्च केले, जे या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय पाहुणे होते आणि त्यांच्यासोबत ध्वनी, ग्रामीण माहिती प्रणालीचे श्री शोभित माथूर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री अविनाश पाटील, कोईता फाउंडेशनच्या श्रीमती. रेखा कोईता यांनीही मंचावर उपस्थित राहून ॲप लॉन्च केले. फिडेलिटी, एशिया पॅसिफिक फाऊंडेशनच्या पाठिंब्याने या बंधन एप्लीकेशनचा विकास करणे शक्य झाले.

हा कार्यक्रम प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा एक गतिमान प्रदर्शन होता, ज्यामध्ये ब्राइट फ्युचरच्या सर्व कौशल्य विकास केंद्रांमधील सहभागींच्या विविध प्रकारच्या प्रदर्शनांचा समावेश होता. या कामगिरीने कार्यक्रमात जीवंतपणा आणला, ज्यात बाल कामगार, लैंगिक शिक्षण, मानसिक आरोग्य जागरुकता, आणि लिंग भूमिका यासारख्या गंभीर सामाजिक समस्यांना संबोधित करणाऱ्या विचारप्रवर्तक नाटकांचाही समावेश होता.

Related posts

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने इब्‍लू श्रेणीसाठी बॅटरी वॉरंटीमध्‍ये वाढ केली

Shivani Shetty

कृषी क्षेत्रात क्रांती: शेतक-यांसाठी ड्रोनद्वारे फवारणी सेवेची सुरुवात

Shivani Shetty

फिजिक्‍सवालाची भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी ५० लाख रूपयांच्‍या स्‍कॉलरशिपची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment