या आठवड्यातील IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सिटाडेल: हनी बनी याया सिरीजमधल्या कलाकारांचे नाव झळकत आहे. समंथा रुथ प्रभू १ स्थानावर, वरुण धवन २५व्या स्थानावर, आणि सिमरन ३६व्या स्थानावर आहेत.
याशिवाय, भूल भुलैया ३ या चित्रपटाचे कलाकार देखील यादीत आपला दबदबा कायम ठेवत आहेत. तृप्ती डिमरी ५व्या स्थानावर, कार्तिक आर्यन १४व्या स्थानावर, दिग्दर्शक अनीस बज्मी १९व्या स्थानावर, तर विद्या बालन ३५व्या स्थानावर आहेत.
द बकिंगहॅम मर्डर्स चित्रपटाच्या स्ट्रीमिंग रिलीजनंतर करीना कपूरने १०वे स्थान मिळवले आहे. तसेच शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पदुकोण अनुक्रमे ३रे, ४थे, आणि ९वे स्थान कायम ठेवत यादीत आपली उपस्थिती टिकवून ठेवली आहे.
IMDb अॅपवर (फक्त Android आणि iOS साठी उपलब्ध) लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी फीचर दर आठवड्याला भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना प्रकाशझोतात आणते. IMDb ला दरमहा २० कोटीहून अधिक लोक भेट देतात, ज्यामुळे ही यादी तयार केली जाते. मनोरंजन प्रेमींना यामध्ये दर आठवड्याला कोणता सेलिब्रिटी ट्रेंडमध्ये आहे हे पाहता येते, आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो करता येते आणि नवोदित कलाकारांना ओळखण्याची संधी मिळते.