maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

आयएलटी 20 तिसऱ्या आवृत्तीसाठी जागतिक क्रिकेट स्टार्सच्या साहाय्याने सज्ज

मुंबई, २३ जून २०२४: झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL), भारताचे कंटेंट आणि एंटरटेनमेंट पॉवरहाऊस आणि एमिरेट्स क्रिकेट बोर्ड यांनी बहुप्रतीक्षित ट्रूली-ग्लोबल क्रिकेट लीग – डीपी वर्ल्ड इंटरनॅशनल लीग टी20 सीझन ३ च्या आगामी आवृत्तीसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे शनिवार, ११ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामासाठी सहा फ्रँचायझी संघांनी एकूण ६९ खेळाडूंना कायम ठेवले आहे.

राखून ठेवलेल्या खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, सुनील नरेन, ॲलेक्स हेल्स, शेरफेन रदरफोर्ड, वानिंदू हरसांगा, रोव्हमन पॉवेल, ड्वेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड, शिमरॉन हेटमायर, सॅम बिलिंग्ज, डेव्हिड विली, सिकंदर रझा, ख्रिस जॉर्डन, जेम्स विन्स, अकेल होसेन, जॉन्सन चार्ल्स, टॉम कोहलर-कॅडमोर आणि दासुन शनका यांसारख्या टी-20 मधील प्रभावी खेळाडूंचा समावेश आहे.

राखून ठेवलेल्या ६९ खेळाडूंपैकी, २६ हे आयसीसी पुरुषांच्या टी20 विश्वचषक २०२४ च्या विविध संघांचा भाग होते. यामुळे जागतिक स्तरावरील लीगच्या यशावर प्रकाश टाकला जातो. झी एंटरटेनमेंट एन्टरप्राइसेस लिमिटेड (झील) ने अहवाल दिला की, या वर्षाच्या सुरुवातीला लीगचा दुसरा सीझन २२१ दशलक्ष दर्शकांपर्यंत पोहोचला आहे. झी एंटरटेनमेंटच्या विस्तृत वितरण धोरणामुळे भारत आणि जगभरात व्यापक प्रवेशयोग्यता सुनिश्चित झाली.

आशिष सेहगल, चीफ ग्रोथ ऑफिसर- झी एंटरटेनमेंट एन्टरप्राइसेस लिमिटेड (झील), म्हणाले,“डीपी वर्ल्ड ILT20 च्या आगामी हंगामासाठी राखून ठेवलेल्या क्रिकेट स्टार्सची भरपूर संख्या उघड करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. क्रिकेटमधील काही मोठ्या नावांसह, डीपी वर्ल्ड ILT20 चा तिसरा सीझन जागतिक स्तरावरील सर्वात स्पर्धात्मक क्रिकेट लीग होण्याचे वचन देतो. लीगमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर लीगचे आकर्षण आणि त्यातील स्वारस्य वाढतच आहे आणि हा क्रिकेटचा खेळ जगभरातील प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे.”

सीझन 3 मध्ये जगभरातील अनेक जागतिक दर्जाचे आणि अनुभवी T20 खेळाडू पाहण्यासाठी सज्ज आहे. ६ फ्रँचायझींनी प्रत्येकी दोन यूएई खेळाडूंना कायम ठेवले आहे. सीझन ३ साठी यूएईच्या खेळाडूंमध्ये आदित्य शेट्टी आणि अलिशान शराफू (अबू धाबी नाइट रायडर्स), अली नसीर आणि तनिश सुरी (डेझर्ट वायपर्स), हैदर अली आणि राजा अकीफ (दुबई कॅपिटल्स), अयान अफझल खान आणि मोहम्मद जोहेब झुबेर (गल्फ जायंट्स), मुहम्मद रोहिद खान आणि मुहम्मद वसीम (एमआय एमिरेट्स), जुनैद सिद्दीक आणि मुहम्मद जवादुल्लाह (शारजाह वॉरियर्स) यांचा समावेश आहे.

जे खेळाडू कायम राहणार ते नक्की झाल्यावर सध्या सुरू असलेल्या प्लेयर ऍक्विझिशनच्या माध्यमातून संघ नव्याने खेळाडू निवडू शकतो. १५ सप्टेंबरपर्यंत ही संधी उपलब्ध आहे. ऑक्टोबरमध्ये होणारी ILT20 डेव्हलपमेंट टूर्नामेंट पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक फ्रँचायझी त्यांचा चार युएई खेळाडूंचा कोटा पूर्ण करण्यासाठी किमान दोन अतिरिक्त युएई खेळाडूंची निवड करू शकते.

Related posts

अपोलोने ७८ बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स पूर्ण केले

Shivani Shetty

डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर ‘हिस्टरी हंटरच्या’ एपिसोड 2 मध्ये मनिष पॉल नालंदाच्या हरवलेल्या ज्ञानाचा शोध घेणार

Shivani Shetty

मुलांना न्युमोकॉक्कल बॅक्टेरियल संसर्गापासून अधिक व्यापक संरक्षण पुरविणारी अॅबॉटची १४ व्हॅलेन्ट न्युमोकॉक्कल कन्ज्युगेट लस (PCV-14) बाजारात दाखल

Shivani Shetty

Leave a Comment