मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३: स्टडी ग्रुप या आंतरराष्ट्रीय शिक्षणामधील जागतिक अग्रणी कंपनीच्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी सहयोगींनी नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या २०२४ युनिव्हर्सिटी रँकिंग्जमध्ये घवघवीत यश संपादित केले आहे, ज्यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण प्रदान करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
स्टडी ग्रुपच्या युनिव्हर्सिटी पार्टनरशिप्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मार्क कनिंग्टन म्हणाले, “जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये संशोधन-आधारित शिक्षणापासून आधुनिक युनिव्हर्सिटींमधील व्यावसायिक पदवी शिक्षणापर्यत यूके शतकानुशतके शैक्षणिक उत्कृष्टतेवर आधारित परिवर्तनात्मक शिक्षण देते. आम्हाला अनेक प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीजसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो, जेथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी त्यांची ध्येये संपादित करू शकतात. ब्रिटीश युनिव्हर्सिटी शिक्षण अनेक संधींचे दरवाजे खुले करू शकते आणि पदवीधर शिक्षणानंतर काम करण्याच्या अधिकारांसह रोजगारासाठी यूकेमध्ये राहू शकतात.”
गार्डियन युनिव्हर्सिटी गाइड २०२४ ही प्रतिष्ठित रँकिंग सिस्टम विविध श्रेणींमधील स्टडी ग्रुपच्या यूकेमधील सहयोगींच्या सर्वोत्तम कामगिरीला प्रशंसित करते. डरहॅम युनिव्हर्सिटीने रसेल ग्रुप ऑफ युनिव्हर्सिटीजची प्रतिष्ठित सदस्य म्हणून आपली गुणवत्ता कायम राखत ७वे स्थान प्राप्त केले. संशोधनामधील सर्वोत्तमतेसाठी प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ एबरडीनने १२वे स्थान मिळवले, तर स्कॉटलंडमधल दुसरे सर्वात मोठे शहर ग्लासगोमधील युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइडने आपले प्रतिष्ठित १६वे स्थान कायम राखले.
संशोधन-केंद्रित रसेल ग्रुपचा भाग असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डने नऊ स्थान पुढे येत युनिव्हर्सिटी ऑफ सरे सोबत २१वे स्थान प्राप्त केले. रसेल ग्रुप सदस्य असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सने २७वे स्थान मिळवले, तर सहकारी प्रतिष्ठित रसेल ग्रुप संस्था कार्डिफ युनिव्हर्सिटीने टॉप ३० मध्ये स्थान मिळवले, जेथे सहा स्थान वर येत २९वे स्थान मिळवले.
स्टडी ग्रुपच्या आधुनिक युनिव्हर्सिटी सहयोगींपैकी लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटीने ३० स्थानांची मोठी झेप घेत ५७वे स्थान प्राप्त केले. लंडनमधील किंग्स्टन युनिव्हर्सिटीने देखील यश संपादित केले, जेथे त्यांच्या सात विषयांना द गार्डियनच्या टॉप १० सब्जेक्ट रॅकिंग्जमध्ये रँकिंग मिळाले.