maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

प्रसिद्ध सिनेमा ‘पुष्पा’ दागिन्यांची श्रेणी कल्याण तर्फे सादर

मुंबई, १० डिसेंबर २०२४- कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि दागिन्यांच्या प्रसिद्ध ब्रँड्सपैकी एका ब्रँडला ‘पुष्पा’ ही दागिन्यांची मर्यादित श्रेणी लाँच करताना आनंद होत आहे. प्रसिद्ध सिनेमा पुष्पावरून प्रेरित होऊन ही श्रेणी तयार करण्यात आली आहे. बहुप्रतीक्षित पुष्पा सिनेमावरून हे आकर्षक कलेक्शन डिझाइन करण्यात आले असून, सिनेमाप्रमाणे त्यात निसर्गाचे मर्म मांडण्यात आले आहे. ही श्रेणी ठळक, आकर्षक डिझाइन्सनी परिपूर्ण असून, ती ताकद आणि अभिजातता यांचे प्रतीक आहे. या श्रेणीचे अनावरण सुप्रसिद्ध ‘पुष्पा2’ अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यातर्फे सोशल मीडियावर करण्यात आले आणि त्यांनी यावेळी सिनेमापासून प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या या दागिन्यांबद्दल उत्सुकता व्यक्त केली.

सोन्यात घडविलेले आणि अनकट हिरे, मोती, सेमी- प्रेशियस स्टोन्सपासून बनविलेले पुष्पा कलेक्शन निसर्गाच्या अनवट सौंदर्याला दाद देणारे आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक दागिना कल्याण ज्वेलर्सची अनोखी गोष्ट सांगणारे कलात्मक दागिने घडविण्याची बांधिलकी दर्शविणारा आहे.

कल्याण ज्वेलर्सच्या निवडक दालनांमध्ये उपलब्ध असलेले पुष्पा कलेक्शन आपल्या पॅशनविषयी अभिमान बाळगणाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आले आहे. खास प्रसंग असो किंवा दैनंदिन पोशाख, सिनेमाचं प्रतीक असलेले या श्रेणीतले दागिने प्रत्येक चाहत्याला आवडतील आणि खुलून दिसतील.

Related posts

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कुर्ला विधानसभेत मेगा शिबिरांचे आयोजन.

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटर ने अपनी डीलरशिप, राजेश टोयोटा को बेस्ट ससटेनेबल इको प्रैक्टिसेज के लिए सीआईआई ग्रीनको गोल्ड रेटिंग पुरस्कार मिलने पर खुशी मनाई

Shivani Shetty

कल्याण मुहूर्त ब्राइड-सेलिब्रेटिंग हर’

Shivani Shetty

Leave a Comment