मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३: लिव्हप्युअर या भारतातील आघाडीच्या होम व लिव्हिंग कंझ्युमर प्रॉडक्ट उत्पादक कंपनीने नवीन टेलिव्हिजन जाहिरात लाँच केली आहे. या जाहिरातीमध्ये ब्रॅण्ड अॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर आहेत. या जाहिरातीच्या माध्यमातून कंपनीचा उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण प्लॅटिनो कॉपर वॉटर प्युरिफायर लाँच करण्यात येत आहे. या टीव्हीसीमधून लिव्हप्युअरची स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी वितरित करण्याप्रती समर्पितता दिसून येते. तसेच ही टीव्हीसी प्लॅटिनो कॉपर वॉटर प्युरिफायरमध्ये असलेल्या त्यांच्या प्रगत आरओ तंत्रज्ञानाच्या व्यापक पर्यावरणीय फायद्यांवर प्रकाश टाकते. या तंत्रज्ञानामध्ये दरवर्षाला जवळपास २०,००० लीटर पाण्याचे संवर्धन करण्याची क्षमता आहे.
कोणत्याही स्रोतामधील पाण्याला शुद्ध करणाऱ्या ८-स्टेज फिल्ट्रेशन सिस्टमसह तुमच्या घरामध्ये प्रत्येकवेळी उच्च दर्जाचे शुद्ध व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असण्याची खात्री मिळते. हे इनोव्हेशन ग्लासेस्, बॉटल्ससाठी सानुकूल डिस्पेन्सिंग पर्याय देते. तसेच अधिक सुरक्षिततेसाठी व्यापक ८.५-लीटर स्टोरेज क्षमता व इन्सेक्ट-प्रूफ वॉटर टँक आहे.
लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राकेश कौल म्हणाले “आमच्या प्लॅटिनो कॉपर वॉटर प्युरिफायरमधील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमची कटिबद्धता दिसून येते. हे फक्त उत्पादन नसून पृथ्वीवरील सर्वात बहुमूल्य संसाधन असलेल्या पाण्याचे संरक्षण करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचे प्रतीक देखील आहे. आमच्या नवीन टेलिव्हिजन जाहिरातीमधून लिव्हप्युअरची तत्त्वे नाविन्यता व शाश्वतता दिसून येतात. व्यक्तींचे जीवन सुधारणारी आणि पर्यावरणावरील परिणाम कमी करणारी उत्पादने निर्माण करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचे हे व्हिज्युअल सादरीकरण आहे. आम्ही आशा करतो की, आमचा संदेश विशेषत: सणासुदीच्या काळादरम्यान ग्राहकांशी संलग्न होईल आणि त्यांना या महत्त्वपूर्ण मिशनमध्ये आमच्यासोबत सामील होण्यास प्रेरित करेल. सहयोगाने, आपण आपल्या भूमातेसाठी सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतो, ज्यामधून भावी पिढ्यांसाठी शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध असण्याची खात्री मिळेल.”
सणासुदीचा काळ जवळ आला असताना लिव्हप्युअरला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची आणि विक्रीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. टीव्हीसीचा लक्षवेधक संदेश उत्सवी उत्साहाशी परिपूर्णपणे संलग्न आहे, ज्यामुळे आपल्या स्वत:च्या जीवनासह प्रियजनांचे जीवन सुरक्षित करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी वॉटर प्युरिफायर्स योग्य व अर्थपूर्ण निवड आहेत.