maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

२०२४ मध्‍ये रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी आवश्‍यक पौष्टिक घटक

सर्वोत्तम रोगप्रतिकारशक्‍ती संपादित करण्‍याचे नववर्ष संकल्‍प स्‍थापित करत नववर्षाची उत्‍साहात सुरूवात करा. उत्तम पोषण आरोग्‍यदायी रोगप्रतिकारशक्‍तीसाठी महत्त्वाचे आहे. अनारोग्‍यकारक पोषण स्थिती आणि रोगप्रतिकारशक्‍तीबाबत केली जाणारी तडजोड यादरम्‍यान प्रबळ संबंध आहे. आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याचा प्रयत्‍न करणारे प्रौढ व्‍यक्‍ती असो किंवा मुलांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याचा प्रयत्‍न करणारे पालक असोदैनंदिन आहारामध्‍ये आवश्‍यक पौष्टिक घटकांचा समावेश असणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. 

तुम्‍हाला आरोग्‍यदायी रोगप्रतिकाशक्‍ती संपादित करण्‍यास मदत करण्‍यासाठी अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन बिझनेसच्‍या मेडिकल अॅण्‍ड सायण्‍टिफिक अफेअर्सचे संचालक डॉ. गणेश काढे तुम्‍हाला आरोग्‍यदायीठेवू शकणारे महत्त्वाचे पौष्टिक घटक आणि त्‍यांच्‍या स्रोतांबाबत सांगत आहेत. 

प्रौढ व्‍यक्‍तींना रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यास आवश्‍यक पोषण    

1. प्रथिन शरीरातील प्रत्येक पेशीसाठी मुलभूत बिल्डिंग ब्लॉक्स म्हणूनकाम करते, स्नायू, हाडे, हार्मोन्स आणि अॅण्‍टीबॉडीज सारख्यामहत्वाच्या घटकांच्या विकासात योगदान देते. प्रथिने अॅण्‍टीबॉडीज निर्माण होण्‍यास साह्य करतात, तसेच रोगप्रतिकारक पेशींना वाढीसाठी आवश्यक अमिनो अॅसिड देत रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. अंडी हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, तसेचचणे, कॉटेज चीज, क्विनोआ, ग्रीक दही, शेंगदाणे आणि बदामयासारख्‍या खाद्यपदार्थांमधून देखील प्रथिने संपन्‍न प्रमाणात मिळतात. 
2. व्हिटॅमिन ए रोगप्रतिकारशक्तीचे नियमन करण्यास मदत करते. ‘अॅण्‍टीइन्फेक्टीव्ह व्हिटॅमिनम्हणून ओळखला जाणारा हा पौष्टिक घटकत्वचा, तोंड, पोट आणि फुफ्फुस आरोग्‍यदायी ठेवतो, ज्‍यामुळे तेसंसर्गाशी लढू शकतात. तीक्ष्ण दृष्टीसाठी देखील हा महत्त्वाचा आहे. व्हिटॅमिन ए संपन्‍न प्रमाणात मिळण्‍यासाठी काही फॅटसह त्याचे सेवनकरा. रताळे, भोपळा, गाजर आणि पालक यामध्‍ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. 
3. व्हिटॅमिन सी शरीराला आरोग्‍यदायी त्वचा आणि संयोजी ती तयारकरण्यास मदत करते, ज्‍या बाहेरील वातावरणामधील सूक्ष्‍मजंतूंना शरीरात प्रवेशास प्रतिबंधित करतात. व्हिटॅमिन सी पेशींचे नुकसानहोण्यापासून संरक्षण करणारे अॅण्‍टीऑक्सिडंट म्हणून देखील कार्यकरते. पालेभाज्‍यांमधून अधिक लोह शोषून घेण्यास मदत करून तेअॅनिमियापासून संरक्षण करण्यास मदत करते. संत्र्यामध्‍ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. पण, याव्‍यतिरिक्‍त व्हिटॅमिन सीने युक्तअसलेले काही पदार्थ म्हणजे किवी, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, टोमॅटो, फ्लॉवरआणि लाल मिरची.
4. व्हिटॅमिन अॅण्‍टीऑक्सिडंट म्हणून कार्य करते, मुक्त रॅडिकल्समुळेपेशींच्या आवरणाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. आरोग्‍यदायी पेशी आवरण बाहेरील सूक्ष्‍मजंतूंपासून संरक्षण होण्‍यास मदत करतात, परिणामत: रोगप्रतिकारशक्‍ती आरोग्‍यदायी राहते.  व्हिटॅमिन बहुतेकपदार्थांमध्ये आढळणारे सामान्य पौष्टिक घटक आहे. कूकिंग ऑईल्‍स, बियाणे आणि नट हा अपवादात्मकरित्या व्हिटॅमिन ई चा संपन्‍न स्रोत आहे. 
5. व्हिटॅमिन डी बहुआयामी पौष्टिक घटक आहे, जो रोगप्रतिकारक पेशीसक्रिय करण्यास आणि त्यांचे कार्य नियंत्रित करण्यास मदत करतो. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतेआणि रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ करते. काही खाद्यपदार्थांमध्‍ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी३ आढळून येते, जसे फॅटी माशांचे मांसआणि फिश लिव्‍हर ऑईल्‍स, अंड्यातील पिवळा बलक, संत्र्याचा रसआणि चीज.
6. झिंक पेशींच्‍या पुनरुत्पादनासाठी आवश्यक आहे, जे नवीनरोगप्रतिकारक पेशींच्या संश्लेषणात महत्वाचे आहे. विशेषतः बालपणआणि किशोरवयीन काळात योग्य वाढ विकासासाठी देखील झिंकआवश्‍यक आहे. मांसाहार आवडणाऱ्यांसाठी मांस, विशेषतः लाल मांसझिंकचा उत्कृष्ट स्रोत आहे. शाकाहारी लोकांसाठी चणे, मसूर आणिसोयाबीन यांसारख्या अन्नामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. बियादेखील आपल्या आहारात आरोग्‍यदायी भर ठरू शकतात.  

मुलांना रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यास आवश्‍यक पोषण

1. प्रथिनसंपन्‍न आहार: मुलांना वाढीच्‍या काळात प्रथिन-संपन्‍न आहारामुळे त्‍यांना सर्वांगीण वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यास मदत होते. त्‍यांच्‍या आहारामध्‍ये लीन मीट्स, दुग्धजन्यपदार्थ, अंडी, शेंगा आणि काजू यांसारख्या स्रोतांचा समावेश करा. 
2. रंगीत फळे आणि भाज्या: आवश्यक जीवनसत्त्वे आणि मिनरल्‍स मिळण्‍यासाठी मुलांना विविध फळे व भाज्‍या सेवन करण्‍यास द्या. बेरी, गाजर आणि पालेभाज्या यांसारखी लक्षवेधक रंगीत उत्पादनेदिसायला आकर्षक असण्‍यासोबत भरपूर पौष्टिक देखील असतात.
3. वाढीसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी: हाडांच्या आरोग्यासाठीआणि सर्वांगीण वाढीसाठी कॅल्शियम व व्हिटॅमिन डीचे पुरेसे सेवनहोत असल्‍याची खात्री घ्‍या. दुग्धजन्य पदार्थ, फोर्टिफाईड सेरेल्‍सआणि मुलांसाठी अनुकूल व्हिटॅमिन डीयुक्त खाद्यपदार्थांचासमावेश करा.
4. आतड्यांच्या आरोग्यासाठी फायबर: संपूर्ण धान्य, फळे आणिभाज्या यांसारख्या फायबरयुक्त खाद्यपदार्थांसह संतुलित आहार सेवन केला जाण्‍याची खात्री घ्‍या. आतड्यांचे आरोग्‍य उत्तम असल्‍यास रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ होते. 

पौष्टिक घटकांनी युक्‍त आहाराचे सेवन केल्‍यास दीर्घकाळापर्यंत रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ राहण्‍यास मदत होऊ शकते, ज्‍यामुळे जीवनशैली दीर्घकाळापर्यंत उत्तम राहण्‍याचा रोडमॅप तयार करता येऊ शकतो. या नववर्षात स्‍वत:च्‍या शरीराला उत्तम पोषण द्या, रोगप्रतिकारशक्‍ती वाढवा आणि आरोग्‍याची काळजी घेण्‍याच्‍या अमर्याद संधींना अनलॉक करा.  

Related posts

इन्शुरन्सदेखोला ग्रेट प्लेस टू वर्कचे प्रमाणपत्र

Shivani Shetty

फिजिक्‍सवालाने युजीसी नेट २०२४ साठी ‘मिशन जेआरएफ’ सिरीज लाँच केली

Shivani Shetty

ऑडी इंडियाने सणासुदीच्‍या काळासाठी लिमिटेड एडिशन ‘ऑडी क्‍यू८’ लाँच केली

Shivani Shetty

Leave a Comment