मुंबई, ८ जानेवारी २०२४: जागतिक स्तरावर वीगन कॉस्मेटिक्स उद्योग २०२३-२८ दरम्यान ६.३१ टक्के कंपाऊंड वार्षिक विकास दराने वाढण्याची आणि २०२८ पर्यंत २४ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतासारख्या देशांमध्ये वीगन कॉस्मेटिक्सप्रती मागणी वाढत आहे, ज्यामुळे पशु अत्याचाराबाबत जागरूकता वाढली आहे. द बॉडी शॉप हा ब्रिटीश-स्थित एथिकल ब्युटी ब्रॅण्ड अलीकडेच स्किनकेअर, बॉडी केअर, हेअरकेअर, मेकअप आणि फ्रॅग्रॅन्स अशा सर्व श्रेणींमध्ये १०० टक्के वीगन उत्पादन फॉर्म्युलेशन्स संपादित करणारा जगातील पहिला जागतिक ब्युटी ब्रॅण्ड ठरला आहे. संपूर्ण उत्पादन फॉर्म्युलेशन्स पोर्टफोलिओ वीगन सोसायटीद्वारे प्रमाणित आहे. या महत्वपूर्ण ब्युटी रिटेलरने स्वत:साठी निश्चित केलेले महत्त्वाकांक्षी लक्ष्य २०२१ मध्येच गाठले होते. त्यावेळी त्यांच्या ६०% उत्पादनांमध्ये वीगन सोसायटीचा ट्रेडमार्क होता.
द बॉडी शॉपच्या दक्षिण आशियामधील मार्केटिंग, ई-कॉमर्स व प्रॉडक्टच्या उपाध्यक्ष हरमीत सिंग म्हणाल्या, ”आमचे १०० टक्के उत्पादन फॉर्म्युलेशन्सना वीगन प्रमाणन मिळणे हे द बॉडी शॉपसाठी मोठे यश आहे. या कटिबद्धतेमधून आम्हाला विशेषत: भारतातील ग्राहकांमधील वीगन ब्युटीचे वाढते महत्त्व माहित असल्याचे दिसून येते. आता, द बॉडी शॉप येथे खरेदी करणे म्हणजे सौंदर्याच्या अधिक शाश्वत दृष्टीकोनाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या मोहिमेचा भाग असल्यासारखे आहे.”
द बॉडी शॉप १९८९ मध्ये सौंदर्यप्रसाधनांमध्ये पशु चाचणी विरोधात मोहिम राबवणारी पहिली ब्युटी रिटेलर देखील ठरली. ब्रॅण्डचा सौंदर्यप्रसाधने निर्माण करताना पशूंना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यावर विश्वास आहे. जगभरात सौंदर्यप्रसाधनांमध्ये पशू चाचणीवर बंदी आणण्याबाबत लढा सुरू असताना द बॉडी शॉपसाठी संपूर्ण वीगन उत्पादन श्रेणी क्रूरता-मुक्त सौंदर्यामधील भावी महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
जागतिक स्तरावर वीगन कॉस्मेटिक्स उद्योग २०२३-२८ दरम्यान ६.३१ टक्के कंपाऊंड वार्षिक विकास दराने वाढण्याची आणि २०२८ पर्यंत २४ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतासारख्या देशांमध्ये वीगन कॉस्मेटिक्सप्रती मागणी वाढत आहे, ज्यामुळे पशु अत्याचाराबाबत जागरूकता वाढली आहे. वीगन सोसायटी विविध उद्योगांमधील वीगन प्रमाणनामधील जागतिक सुवर्ण मानकांचे प्रतिनिधीत्व करते, द बॉडी शॉप उत्पादनांसाठी विश्वसनीय ट्रेडमार्क प्रदान करते. प्रमाणन प्रक्रिया अत्यंत कठोर आहे, ज्यामध्ये उत्पादन विभागामधील कच्चा मालांच्या प्रत्येक पुरवठादाराचे व उत्पादकाचे सखोलपणे मूल्यांकन केले जाते. द बॉडी शॉपसाठी ४००० हून अधिक सामग्रीचे सत्यापन करण्यात आले, ज्यापैकी १०० हून अधिक उत्पादनांना हे प्रमाणन मिळाले.