maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

स्नॅप इंडिया जागतिक स्थरावर एआर लेन्सेस आकडेवारीसह अग्रस्थानी

राष्‍ट्रीय, १२ फेब्रुवारी २०२५: स्‍नॅप इन्‍क.ने मुंबईमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या दुसऱ्या वार्षिक इंडिया एआर डे इव्‍हेण्‍टमध्‍ये ऑगमेण्‍टेड रिअॅलिटी (एआर) च्‍या परिवर्तनात्‍मक क्षमतेला दाखवले, ज्‍यामधून दिसून आले की, कंपनी एआरसाठी भावी दृष्टिकोनाला गती देत आहे, सर्जनशीलतेला चालना देत आहे आणि विशेषत: भारतातील डायनॅमिक डेव्‍हलपर लँडस्‍केपमध्‍ये प्रगतीशील इकोसिस्‍टम तयार करत आहे.

स्‍नॅप इन्‍क.चे सीटीओ बॉबी मर्फी यांनी भारतात एआर इनोव्‍हेशनच्‍या माध्‍यमातून सर्जनशीलता आणि स्‍वयं-अभिव्‍यक्‍तीला चालना देण्‍याप्रती कंपनीच्‍या कटिबद्धतेवर भर दिला. ते म्‍हणाले, ”स्‍नॅप एआरसोबत आमचे सर्जनशीलतेसाठी प्‍लॅटफॉर्म असण्‍याचे मिशन आहे. आम्‍ही क्रिएटर्सना लाखो लोकांकरिता आनंद देणारे अद्भुत अनुभव निर्माण करण्‍यास सक्षम करण्‍यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि टूल्‍स विकसित करतो. भारतातील डेव्‍हलपर्स नाविन्‍यतेसंदर्भात अग्रस्‍थानी आहेत, जे सर्वसमावेशक व सर्जनशील अनुभवांना प्रत्‍यक्षात आणत आहेत. खरेतर, सर्व देशांमध्‍ये स्‍नॅपचॅटवर प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या लेन्‍सेसची सर्वाधिक संख्‍या भारतामधून आहे. आणि येथील डेव्‍हलपर समुदाय गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये पन्‍नास टक्‍क्‍यांहून अधिकने वाढला आहे. भारत असाधारण देश आहे, जेथे एआर दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. या देशामध्‍ये क्रिएटिव्‍ह ऊर्जा उत्‍साहपूर्ण आहे आणि एआर मनोरंजनासाठी टूल असण्‍यासोबत सांस्‍कृतिक अभिव्‍यक्‍तीसाठी माध्‍यम देखील आहे.”

स्‍नॅक इन्‍क.चे भारतातील व्‍यवस्‍थापकीय संचालक पुलकित त्रिवेदी म्‍हणाले, ”भारत क्रिएटर्स व डेव्‍हलपर्सच्‍या प्रगतीशील समुदायाचे आश्रयस्‍थान आहे, जे एआरच्‍या भविष्‍याला आकार देत आहेत. भारतातील २०० दशलक्षहून अधिक स्‍नॅपचॅटर्स[3] स्‍वत:ला व्हिज्‍युअली अभिव्‍यक्‍त करण्‍यासाठी, कनेक्‍ट होण्‍यासाठी आणि कन्‍टेन्‍टचा आनंद घेण्‍यासाठी प्‍लॅटफॉर्मचा वापर करत आहेत, ज्‍यामुळे एआर संवाद साधण्‍यासाठी आणि सर्जनशीलतेसाठी मुख्‍य टूल बनले आहे. आमचा विश्‍वास आहे की, एआरमधील दीर्घकालीन यश प्रबळ डेव्‍हलपर इकोसिस्‍टमवर अवलंबून आहे आणि आम्‍ही या वैविध्‍यपूर्ण समुदायाला चालना देण्‍याप्रती दृढ कटिबद्ध आहोत. स्‍नॅपचॅटर्सना महिन्‍यातून[4] ८० बिलियनहून अधिक वेळा एआर लेन्‍सेसचा वापर करताना पाहण्‍यामधून सर्जनशील अभिव्‍यक्‍तीची क्षमता दिसून येते. आम्‍ही या नाविन्‍यतेला पाठिंबा देण्‍यासोबत साजरे करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.”

एआर इनोव्‍हेशनचा प्रत्‍यक्ष अनुभव: स्‍नॅपचे फिफ्थ जनरेशन स्‍पेक्‍टॅकल्‍स

मुंबईतील इव्‍हेण्‍टमध्‍ये भारतातील टॉप एआर क्रिएटर्स, डेव्‍हलपर्स, ब्रँड्स, सहयोगी आणि व्‍यापक समुदाय एकत्र आले. उपस्थितांना क्रिएटर्स, डेव्‍हलपर्स आणि ब्रँड्सच्‍या प्रेक्षकांशी कनेक्‍ट होण्‍यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकणाऱ्या पद्धती पाहायला मिळाल्‍या, तसेच परस्‍परसंवादात्‍मक अनुभवांमधून मनोरंजनापासून उपयोजनापर्यंत विविध क्षेत्रांमधील एआरची क्षमता पाहायला मिळाली. स्‍नॅपच्‍या ‘एनी बडी कॅन डेव्‍हलप’ अनुभवाने अभ्‍यागतांना स्‍वत:च्‍या लेन्‍सेस डिझाइन करण्‍याचे ज्ञान मिळवण्‍याची प्रत्‍यक्ष संधी दिली.

स्‍नॅपचे फिफ्थ-जनरेशन सी-थ्रू एआर ग्‍लासेस् स्‍पेक्‍टॅकल्‍स भारतातील पहिल्‍यांदाच प्रात्‍यक्षिकासाठी उपलब्‍ध हेाते. स्‍नॅप ओएसची शक्‍ती असलेले ही स्‍वतंत्र, सी-थ्रू एआर ग्‍लासेस् पूर्णत: नव्‍या पद्धतीने एआरसह संवाद करण्‍याची सुविधा देतात. स्‍नॅप ओएस एआरसाठी उद्देशपूर्ण डिझाइन करण्‍यात आलेली अद्वितीय ऑपरेटिंग सिस्‍टम आहे, जी स्‍पेक्‍टॅकल्‍सना शक्‍ती देते आणि विनासायास सर्वसमावेशक अनुभव देते. वीअरेबिलिटी आणि एआर क्षमतेमध्‍ये काळजीपूर्वक संतुलन राखण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या स्‍पेक्‍टॅकल्‍समध्‍ये इनडोअर आणि आउटडोअर वापरासाठी सी-थ्रू डिस्प्ले आणि बिल्ट-इन डिमर आहे, ज्यामुळे ते बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या इतर हार्डवेअरपेक्षा वेगळे आहेत. स्‍नॅप ओएस व्‍यक्‍तींच्‍या जीवनाशी विनासायासपणे संलग्‍न राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. यामधील नैसर्गिक इंटरफेस ऑगमेण्‍टेड रिअॅलिटीच्‍या माध्‍यमातून मित्रांना पाहण्‍याची आणि त्‍यांच्‍यासोबत संवाद साधण्‍याची सेवा देते, तसेच हे इंटरफेस तुमचा आवाज व हातांसह नियंत्रित करता येते.

स्‍पेक्‍टॅकल्‍सचे हे नवीन व्‍हर्जन आणि लाँच करण्‍यात आलेली स्‍नॅप ओएस हार्डवेअर व सॉफ्टवेअरमधील स्‍नॅपच्‍या इनाव्‍हेशन्‍सना अधिक दृढ करतात, ज्‍याबाबतीत कंपनी दशकाहून अधिक काळापासून प्रयत्‍न करत आहे.

एआर क्रिएटर्सच्‍या नवीन पिढीचे सक्षमीकरण

भारतात विशेषत: सांस्‍कृतिक क्षण व सणासुदीच्‍या काळादरम्‍यान मित्र आणि कुटुंबियांसोबत कनेक्‍ट होण्‍यासाठी ८५ टक्‍क्‍यांहून अधिक स्‍नॅपचॅटर्स[5] लेन्‍सेसचा वापर करतात, ज्‍यामुळे सर्जनशील अभिव्‍यक्‍तीवरील फोकस अनिवार्य आहे.

स्‍नॅपची एआर इकोसिस्‍टम झपाट्याने वाढत आहे, जेथे जगभरातील ३७५,००० हून अधिक क्रिएटर्सनी ४ दशलक्षहून अधिक एआर लेन्‍सेस डिझाइन केल्‍या आहेत, ज्‍यांच्‍यासोबत स्‍नॅपचॅटर्स गेल्‍या वर्षभरात ४.५ ट्रिलियनहून अधिक वेळा संलग्‍न झाले आहेत. मुख्‍य शहरांमधून, तसेच गोरया, प्रयागराज, कोचीन, अंबाला अशा इतर शहरांमधून देखील क्रिएटर नेटवर्कचा विकास होत असल्‍यामुळे भारतातील एआर डेव्‍हलपर समुदाय उल्‍लेखनीय आहे.

स्‍नॅपने द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांसह संपूर्ण भारतात एआर अवलंबनाचा विस्‍तार करण्‍यामध्‍ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सुरत, कोईम्‍बतूर, राजकोट, त्रिची, त्रिवंद्रम व ग्‍वाल्‍हेर अशा शहरांमध्‍ये लेन्‍स स्‍टुडिओ प्रशिक्षण मीट-अप्‍स सारखे स्‍थानिक उपक्रम महत्त्वाकांक्षी क्रिएटर्सना त्‍यांच्‍या पहिल्‍या लेन्‍सेस डिझाइन करण्‍यासाठी आणि त्‍यांचा एआर प्रवास सुरू करण्‍यासाठी सक्षम करत आहेत. स्‍नॅपने २०२४ मध्‍ये १२० हून अधिक मीटअप्‍स आयोजित केले आहेत, ज्‍या माध्‍यमातून ६,००० हून अधिक एआर डेव्‍हलपर्सपर्यंत पोहोचली आहे.

स्‍नॅप टीम देखील शैक्षणिक संस्‍थांसोबत काम करत तरूण टॅलेंटना महत्त्वपूर्ण सर्जनशील डिजिटल कौशल्‍यांसह निपुण करत आहे आणि यंदा मुंबईतील के.जे. सोमैया, बेंगळुरू, मुंबई व दिल्‍लीमधील पर्ल अकॅडमी, चेन्‍नईमधील लोयोला कॉलेज यांच्‍यासोबत सहयोग केला आहे. हे सहयोग सर्जनशील डिजिटल कौशल्‍ये विकसित करण्‍यासाठी अद्वितीय संधी देतात, जी संयोजित रिअॅलिटीला प्रगत करण्‍यासाठी आणि सर्वसमावेशक एक्‍सआर लँडस्‍केपमध्‍ये नाविन्‍यतेला चालना देण्‍यासाठी महत्त्वाची आहेत.

या इकोसिस्‍टमला प्रगत करण्‍यासाठी स्‍नॅपने इंडिया लेन्‍स अवॉर्ड्सच्‍या लाँचची देखील घोषणा केली. ही वार्षिक स्‍पर्धा पाच श्रेणींमध्‍ये सर्वात नाविन्‍यपूर्ण एआर लेन्‍स क्रिएटर्सना प्रशंसित करते. विजेते आहेत – बेस्‍ट व्‍हायरल लेन्‍स: प्रत्‍युष गुप्‍ताचा परफेक्‍ट पिच गेम, बेस्‍ट गेम: कृणाल एमबी गेडियाचा दिवाळी गेम, बेस्‍ट आर्टिस्टिक लेन्‍स: एक्‍सआरएफएक्‍स स्‍टुडिओचा इथरिअल ड्रेस, बेस्‍ट टेक्निकल लेन्‍स: वसिम घोलेची डोमिनो प्रो एलआयडीएआर आणि बेस्‍ट फेस्टिव्‍ह लेन्‍स: जीतेश सिंगची रेंग दे मोहे.

एआरचा फायदा घेणारे ब्रँड्स

स्‍नॅप प्रायोजित एआरमध्‍ये अग्रस्‍थानी आहे, महत्त्वपूर्ण क्षणांपासून उच्‍च-आरओआय सहभागापर्यंत सर्व गोष्‍टींना समर्थन देत आहे, तसेच सतत एआर नाविन्‍यतेला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. हे वाढते नेटवर्क स्‍नॅपच्‍या एआर अॅडव्‍हर्टायझिंग टूल्‍समधून देखील फायदा घेते, ब्रँड्सना नाविन्‍यपूर्ण पद्धतींनी प्रेक्षकांशी कनेक्‍ट होण्‍यास मदत करत आहे.

हे उपक्रम एक्‍सआरएफएक्‍स स्‍टुडिओचे संस्‍थापक प्रीसिका पिकार्डो यांच्‍यासारख्‍या क्रिएटर्ससाठी वास्‍तविक बदल घडवून आणत आहेत. या उत्‍साही लेन्‍स डेव्‍हलपरनी २०१८ मध्‍ये एआरचा शोध लावला. ते म्‍हणाले, ”मी माझा प्रवास सुरू केला तेव्‍हा स्‍नॅपच्‍या लेन्‍स स्‍टुडिओने मला माझ्या पॅशनला प्रोफेशनमध्‍ये बदलण्‍यासाठी टूल्‍स दिले. यामधील वैविध्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये मला माझ्या संकल्‍पनांना प्रयत्‍क्षात आणण्‍यास, ब्‍युटी, फॅशनमधील प्रभावी ब्रँड्ससोबत सहयोग करण्‍यास आणि स्‍नॅपच्‍या डायनॅमिक एआर क्रिएटर इकोसिस्‍टममध्‍ये विकसित होण्‍यास मदत करतात. जवळपास ५ वर्ष माझी कौशल्‍ये निपुण केल्‍यानंतर मी एक्‍सआरएफएक्‍स स्‍ट‍ुडिओची सहयोगाने स्‍थापना केली, जी ब्रँड्ससाठी सानुकूल एआर इफेक्‍ट्स डिझाइन करण्‍यामध्‍ये विशेषीकृत आहे. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत आमच्‍या टीमचा विस्‍तार झाला आहे आणि आज आम्‍ही कोका-कोला, गुगल, नायका, टिरा, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, अजिओ, मॅक्‍स, स्विगी, झेप्‍टो इत्‍यादी सारख्‍या ब्रँड्ससाठी एआर निर्माण करतो. आम्‍ही नुकतेच १००,००० डॉलर्स महसूलाचा टप्‍पा गाठला, ज्‍यामधून दिसून येते की, एआर ब्रँड सहभाग आणि डिजिटल अनुभवांमध्‍ये बदल घडवून आणत आहे.”

धोरणात्‍मक उपक्रम आणि नायका, मिंत्रा, डोरिटोस – पेप्‍सी कं., अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, हॉटस्‍टार, स्विगी, अजिओ, स्‍पोटिफाय, सर्फ एक्‍सेल अशा अव्‍वल ब्रँड्ससोबतचे सहयोग उत्‍पन्‍नाच्‍या संधी निर्माण करत आहेत, तसेच क्रिएटर्सना शाश्‍वत करिअर्स घडवण्‍यास सक्षम करत आहेत.

इंडिया एआर डेमधून भारताच्‍या एआर भविष्‍यासाठी स्‍नॅपचा दृष्टिकोन दिसून येतो. ही इकोसिस्‍टम आहे, जेथे क्रिएटर्स, डेव्‍हलपर्स व ब्रँड्स प्रगती करतात, अनपेक्षित सहभाग, नाविन्‍यता आणि सांस्‍कृतिक अभिव्‍यक्‍तीला चालना मिळते. हे भविष्‍य आहे, जेथे भारतातील क्रिएटीव्‍हीटी जागतिक स्‍तरावर एआरच्‍या अनेक क्षमतेच्‍या माध्‍यमातून चमकदार कामगिरी करेल.

Related posts

कोटक प्रायव्‍हेट मल्‍टीमीडिया मोहिमेसह साजरी करत आहे सर्वोत्तमतेची २० वर्षे

Shivani Shetty

मुंबईत ‘टेक्सफ्युचर परिषदेचे’ आयोजन

Shivani Shetty

रणवीर ब्रार यांची ‘मास्टरचाउ’च्या ब्रॅंड अम्बॅसडरपदी नियुक्ती

Shivani Shetty

Leave a Comment