काम, सामाजिक भेटीगाठी किंवा खरेदी असो, आपले अधिकाधिक दैनंदिन क्रियाकलाप ऑनलाइन होत असताना घोटाळेबाज ग्राहकांकडून माहिती व पैसे चोरण्यासाठी अत्याधुनिक पद्धतींचा वापर करत आहेत. ११ फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त व्हिसा तुमच्या डिजिटल माहितीचे संरक्षण करण्यास मदत करण्यासाठी टिप्स सांगत आहे.
*1. * *तुमचे डिवाईसेस बायोमेट्रिक्ससह सुरक्षित करा:* तुमच्या फोन्समधील फिंगरप्रिंट्स किंवा फेशियल रेकग्निशन अशा बायोमेट्रिक सुरक्षितता वैशिष्ट्यांचा वापर करा. ही वैशिष्ट्ये विशेषत: डिजिटल पेमेंट्ससंदर्भात तडजोड होऊ शकणारे पिन क्रमांक व पासवर्ड्सच्या तुलनेत उच्च-स्तरीय सुरक्षितता देतात.
*2.* *आतापर्यंत केले नसल्यास कार्ड्स टोकनाइज करा* : आरबीआयने ऑनलाइन व्यवहारांसाठी कार्ड्सना टोकनाइज करणे अनिवार्य केले आहे, ज्यामुळे पेमेंट्स सुरक्षित व सुनिश्चितपणे होतात. आज बाजारपेठेत जवळपास १०० टक्के कार्ड्स टोकनाइज करण्यात आलेले आहेत, तर मग तुम्ही याबाबतीत मागे राहू नका!
*3. * *विश्वसनीय वेबसाइट्सचा वापर करा* : सर्वात सामान्य धोका म्हणजे वेबसाइट अॅड्रेस, जे “https://” सह सुरू होत नाही. याचा अर्थ असा की वेबसाइटवर सुरक्षिततेसंदर्भात संभाव्य समस्या आहे. संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि मालिशियस सॉफ्टवेअरचा धोका टाळण्यासाठी विश्वसनीय अॅप स्टोअरमधून अॅप डाऊनलोड करा.
*4.* *प्रायव्हसी पॉलिसीज वाचा:* प्रायव्हसी पॉलिसीज वाचण्यास कदाचित कंटाळा येऊ शकतो, पण प्रायव्हसी पॉलिसीज तपासल्याने तुम्हाला तुमचा डेटा कशाप्रकारे वापरला जात आहे हे समजण्यास मदत होते. तुम्ही कोणत्याही गोष्टींना होकार देत आहात हे जाणून घ्या, ज्यामुळे योग्य निर्णय घेता येतील.
*5.* *फसवणूकीला बळी पडल्यास काय करावे:* तुम्हाला ऑनलाइन फसवणूक झाल्याचा संशय आल्यास त्वरित तुमची बँक किंवा पेमेंट प्रदात्याशी संपर्क साधा, तसेच कोणत्याही अनधिकृत व्यवहारांबाबत तक्रार करण्यासाठी १९३० या क्रमांकावर संपर्क साधत नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनवर तक्रार दाखल करा.
या टिप्सचे पालन करत तुम्ही डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करू शकता. यंदा सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त डिजिटल विश्वामधील वाढत्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्क व सक्रिय राहा!