मुंबई, भारत—7 ऑगस्ट 2024—IMDb (www.imdb.com) ह्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय माहिती स्रोताने मुंज्या मधील अभिनेत्री शर्वरीला IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार घोषित केला आहे. IMDb app वर प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये आघाडीवर प्रदर्शन करत असलेल्या कलाकारांना ह्या पुरस्काराद्वारे मान्यता दिली जाते. ह्या यादीमध्ये जगभरामधून IMDb वर दर महिन्याला येणार्या 25 कोटींहून अधिक दर्शकांच्या पेज व्ह्यूजच्या आधारे निर्धारित केले जाते व आपल्या करीअरमध्ये अगदी समोर येण्याच्या ठिकाणी कोण आहे, ह्याचे हे एक अचूक असे प्रेडीक्टर ठरले गेले आहे.
शर्वरीने आदित्य सरपोतदारच्या भय- विनोदी कथा असलेल्या मुंज्यामध्ये काम केले आहे (ज्याचे IMDb रेटींग 7.2/10 आहे), आणि तिने सिद्धार्थ पी. मल्होत्राच्या ऐतिहासिक नाट्य असलेल्या महाराज मध्ये स्पेशल ऍपीयरन्स भुमिका केली आहे. दोन्ही चित्रपट अगदी एका आठवड्यामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तिने सलग चार आठवड्यांसाठी “प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या” यादीमध्ये आघाडीचे स्थान पटकावले व टिकवून ठेवले. तिच्या आधीच्या भुमिकांमध्ये बंटी और बबली 2 आणि द फोरगॉटन आर्मी- आज़ादी के लिए ह्यांचा समावेश आहे. येणा-या काळामध्ये ती वेदा मध्ये जॉन अब्राहमसोबत दिसेल व ती सध्या आलिया भट्ट सोबत अल्फा चे शूटिंग करत आहे.
“IMDb ला मन:पूर्वक धन्यवाद. IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याबद्दल मला विलक्षण आनंद झाला आहे. हे अविश्वसनीय आहे,” शर्वरीने म्हंटले. “गेल्या महिन्यात माझ्या अभिनयावर इतके प्रेम केल्याबद्दल व मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी सर्व चाहते व दर्शकांची ऋणी आहे. मी अतिशय, अतिशय आभारी आहे.”
शर्वरीला पुरस्कार दिला जातानाचा व्हिडिओ इथे पाहा. IMDb ग्राहक www.imdb.com/watchlist. वर जाऊन शर्वरीच्या फिल्मोग्राफी व इतर टायटल्समधून वेब सिरीज व मूव्हीज त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर जोडू शकतात.
आधीच्या IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कारांमध्ये नितांशी गोएल, मेधा शंकर, भुवन अरोड़ा, अंगीरा धर, आदर्श गौरव, आणि नताशा भारद्वाज ह्यांचा समावेश आहे. IMDb स्टारमीटर पुरस्कारांबद्दल अधिक माहिती इथे मिळवा- www.imdb.com/starmeterawards.