maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोटक प्रायव्‍हेट मल्‍टीमीडिया मोहिमेसह साजरी करत आहे सर्वोत्तमतेची २० वर्षे

मुंबई, ऑगस्‍ट २०२४ – कोटक प्रायव्‍हेट बँकिंग हा कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा (‘केएमबीएल’ किंवा ‘कोटक’) विभाग आपल्‍या पहिल्‍या मल्‍टीमीडिया मोहिमेसह भारतातील खाजगी बँकिंग उद्योगामधील सर्वोत्तमतेच्‍या दोन दशकांना अभिमानाने साजरे करत आहे. या टप्‍प्‍यामधून भारतातील प्रमुख प्रायव्‍हेट बँकिंग कंपनी म्‍हणून तिच्‍या दृढ स्‍थानाची पुष्‍टी मिळते. प्रिंट जाहिराती, आऊट-ऑफ-होम (ओओएच) प्रदर्शन आणि डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍सवर प्रचार केली जाणारी ही मोहिम कोटकच्‍या गुंतवणूक क्रेडेन्शियल्‍सना आणि भारतातील ५८ टक्‍के* श्रीमंत व्‍यक्‍तींसह सर्वात श्रीमंत कुटुंबांवरील त्‍यांच्‍या प्रभावाला साजरे करते.
कोटक प्रायव्‍हेट सतत मुलभूत गुंतवणूक मार्गांच्‍या पलीकडे जाते, तसेच यूएचएनआय (अल्‍ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्‍युअल्‍स) आणि एचएनआय (हाय नेट वर्थ इंडिव्हिज्‍युअल्‍स) क्‍लायण्‍ट्सना त्‍यांच्‍या संपत्तीचे व्‍यवस्थापन करण्‍यामध्‍ये साह्य करण्‍यासोबत त्‍यांना त्‍यांचा उद्देश जोपासण्‍यास सक्षम देखील करते. बारकाईने डिझाइन करण्‍यात आलेल्‍या मल्‍टीमीडिया मोहिमेमध्‍ये व्हिज्‍युअली लक्षवेधक जाहिरातींचा समावेश आहे, ज्‍या कोटक प्रायव्‍हेटने ऑफर केलेले सर्वसमावेशक सोल्‍यूशन्‍स आणि बीस्‍पोक सेवा दाखवतात. अत्‍याधुनिक, आधुनिक सोल्‍यूशन्‍ससह कोटक प्रायव्‍हेट नाविन्‍यपूर्ण गुंतवणूक संधी देते.
ही मोहिम लाँच करत कोटक महिंद्रा बँकेच्‍या कोटक प्रायव्‍हेट बँकिंगच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी सीईओ ओशर्या दास म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला अत्‍याधुनिक गुंतवणूक सोल्‍यूशन्‍ससह आमच्‍या क्‍लायण्‍ट्सना सेवा देण्‍याच्‍या दोन दशकांना साजरे करण्‍याचा आनंद होत आहे. आघाडीची प्रायव्‍हेट बँकिंग कंपनी म्‍हणून आम्‍ही आमच्‍या वैविध्‍यपूर्ण क्‍लायण्‍टेलच्‍या विकसित होत असलेल्‍या गरजांशी जुळवून घेतो. आमची नवीन मल्‍टीमीडिया मोहिम आमच्‍या क्‍लायण्‍ट्सना मानवंदना देते, जे आमच्‍या प्रवासाचा महत्त्वपूर्ण भाग असण्‍यासोबत आम्‍हाला भारतातील प्रमुख प्रायव्‍हेट बँकर म्‍हणून आमचे स्‍थान कायम ठेवण्‍यास मदत करत आहेत.”
पसंतीची प्रायव्‍हेट बँकिंग संस्‍था म्‍हणून कोटक प्रायव्‍हेट व्‍यक्‍तींना जीवनातील अधिक महत्त्वपूर्ण पैलूंवर लक्ष केंद्रित करण्‍यास, तसेच कुशलपणे त्‍यांची संपत्ती, वाढ आणि संवर्धन गरजांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास सक्षम करते. भारतातील पन्‍नास टक्‍क्‍यांहून अधिक उच्‍चभ्रू कुटुंबांसह उद्योजक, व्‍यवसाय कुटुंबं व व्‍यावसायिक, तसेच भारतीय निवासी व एनआरआय यांना सेवा देत कोटक प्रायव्‍हेट विविध पिढ्यांच्‍या गरजांची पूर्तता करते. कंपनीच्‍या ऑफरिंग्‍जमध्‍ये गुंतवणूक उत्‍पादनांचा समावेश आहे, जसे आरईआयटी (रिअल इस्‍टेट इन्‍व्‍हेस्‍टमेंट ट्रस्‍ट्स)# व आयएनव्‍हीआयटीएस# (इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर इन्‍व्‍हेस्‍टमेंट ट्रस्‍ट्स), विशेषीकृत बँकिंग सोल्‍यूशन्स आणि सर्वोत्तम सेवा जसे इस्‍टेट प्‍लानिंग# आणि फॅमिली ऑफिस$ मॅनेजमेंट.
या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त करत कोटक महिंद्रा बँकेच्‍या रिटेल लायबिलिटीज प्रॉडक्‍टचे प्रमुख आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर रोहित भासिन म्‍हणाले, ”आमच्‍या मल्‍टीमीडिया मोहिमेमधून उद्योग ट्रेण्‍ड्सच्‍या पुढे राहण्‍याप्रती आमचा नाविन्‍यपूर्ण दृष्टिकोन व अविरत कटिबद्धता दिसून येते. आम्‍ही लक्ष्‍य ग्राहकांपर्यंत पोहोचत ते सक्रियपणे संलग्‍न होणाऱ्या प्रीमियम प्‍लॅटफॉमर्सवर लक्ष केंद्रित करू, ज्‍यामधून आमची मोहिम उच्‍चभ्रू यूएचएनआय आणि एचएनआय कुटुंबांसोबत प्रभावीपणे संलग्‍न होण्‍याची खात्री मिळेल. या विशिष्‍ट चॅनेल्‍ससाठी दृष्टिकोन तयार करत आमचा आमच्‍या बीस्‍पोक ऑफरिंग्‍ज दाखवण्‍याचा आणि आमचे गुंतवणूक कौशल्‍य अधिक दृढ करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे खाजगी बँकिंगमध्‍ये सर्वोत्तमतेची प्रदाता म्‍हणून आमचे स्‍थान अधिक प्रबळ होईल.”
जाहिराती पाहण्‍यासाठी लिंक्‍स: https://images.kotak.com/bank/mailers/2024/files/KP%203%20print%20ads%20link%20for%20mailer.pdf
या मोहिमेमध्‍ये राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील प्रख्‍यात लक्‍झरी आणि लाइफस्‍टाइल टायटल्‍सचा समावेश असेल, जे सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करतात. आकर्षकता व मेसेजिंगवर लक्ष केंद्रित करत या जाहिराती यूएचएनआय/एचएनआय क्‍लायण्‍ट्सशी संलग्‍न होण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍यामधून त्‍यांची अत्‍याधुनिक अभिरूची आणि आर्थिक महत्त्वाकांक्षा दिसून येतात.

Related posts

राडोने दोन नवीन घड्याळे सादर केली

Shivani Shetty

लिव्‍हप्‍युअरची २३३ कोटी रूपयांची निधी उभारणी

Shivani Shetty

श्रेयस शिपिंग डीलिस्टिंग की 400 रुपये प्रति शेयर की काउंटर ऑफर बोली विंडो 17 अक्टूबर 2023 को होगी बंद

Shivani Shetty

Leave a Comment