maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

द बॉडी शॉप स्‍टोअरमध्‍ये ब्रेललिपीचा प्रयोग

मुंबई, ७ जून २०२४: द बॉडी शॉप हा प्रतिष्ठित ब्रिटीश-निर्मित आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रँड मुंबईतील पॅलेडियम मॉलमधील आपल्‍या अॅक्टिव्‍हीस्‍ट वर्कशॉप स्‍टोअरमध्‍ये आता दृष्टिदोष असलेल्‍या ग्राहकांना सर्वोत्तम शॉपिंग अनुभव देण्यासाठी ब्रेल वैशिष्‍ट्ये सादर करत भारतात आपला १८वा वर्धापन दिन साजरा करत आहे. द बॉडी शॉपचा हा अद्वितीय नाविन्‍यपूर्ण पुढाकार देशभरातील त्‍यांच्‍या स्‍टोअर्समध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने घेतलेल्‍या दृष्टिकोनाचा भाग असेल, जो ब्रँडच्‍या सर्वसमावेशकता व उपलब्‍धतेप्रती सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांमधील मोठा टप्‍पा आहे.

डिसॅबिलिटी राइट्स अॅक्टिव्‍हीस्‍ट व युथ कलेक्टिव्‍ह कौन्सिल (वायसीसी) सदस्‍य विराली मोदी यांच्‍या सल्‍ल्‍यामधून प्रेरित ब्रेल वैशिष्‍ट्यांमध्‍ये स्‍टोअरमधील कॅटेगरी कॉल-आऊट्सचा समावेश आहे, ज्‍यामधून सर्वांगीण सर्वसमावेशक शॉपिंग अनुभव मिळतो. द बॉडी शॉपच्‍या व्‍यवसाय धोरणांमध्‍ये भारतातील उदयोन्‍मुख चेंजमेकर्सच्‍या मतांना समाविष्‍ट करण्‍यासाठी ऑगस्‍ट २०२३ मध्‍ये वायसीसीची स्‍थापना करण्‍यात आली, ज्‍याद्वारे अधिक युवा-केंद्रित, शाश्वत व सर्वसमावेशक दृष्टिकोनाला चालना दिली जात आहे. हा नवीन उपक्रम कंपनीची जेण्‍डर-न्‍यूट्रल उत्‍पादन श्रेणी आणि वैविध्‍यपूर्ण कर्मचारीवर्गापलीकडे द बॉडी शॉपच्‍या सर्वसमावेशकतेचा विस्‍तार करतो.

द बॉडी शॉप – दक्षिण आशियाच्‍या मुख्‍य ब्रँड अधिकारी श्रीमती हरमीत सिंग आपले मत व्‍यक्‍त करत म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला मुंबईतील आमच्‍या अॅक्टिव्‍हीस्‍ट वर्कशॉप स्‍टोअरमध्‍ये ब्रेलचा समावेश करण्‍याची घोषणा करताना आनंद होत आहे आणि ही घोषणा भारतातील आमच्‍या १८व्‍या वर्धापन दिन साजरीकरणाशी संलग्‍न आहे. सर्वसमोवशक नियुक्‍तीपासून ब्रेलच्‍या समावेशापर्यंत आम्‍ही एथिकल ब्‍युटी उपलब्‍ध करून देत आहोत. आमचा सर्वांसाठी सर्वसमावेशक इन-स्‍टोअर अनुभवांची खात्री घेण्‍याचा मनुसबा आहे, जे द बॉडी शॉपच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे.”

कंपनीमध्‍ये या वर्षाच्‍या सुरूवातीला द बॉडी शॉपची मूल्‍य यंत्रणा आणि वायसीसीच्‍या मार्गदर्शनपर धोरणाची चर्चा करण्‍यात आली. हे पाहता ब्रँड एलजीबीटीक्‍यूए+ समुदायासाठी कार्यकर्ता अंकिता मेहरा यांनी दिलेल्‍या सल्‍ल्‍याच्‍या आधारावर लैंगिक सर्वसमावेशकतेला प्राधान्‍य देत आहे. हे प्रयत्‍न नियुक्‍ती, प्रशिक्षण व व्‍यवस्‍थापनाप्रती ब्रँडच्‍या लैंगिक-संवेदनशील दृष्टिकोनामधून दिसून येतात, ज्‍यामधून मुख्‍यालय व स्‍टोअर कर्मचारी देखील या तत्त्वांचे पालन करत असल्‍याची खात्री मिळते.

चेंजमेकर असण्‍यासोबत ब्‍युटी उद्योगामधील अग्रणी ब्रँडचे १० कर्मचारी सदस्‍य आहेत, जे एलजीबीटीक्‍यूए+ स्‍पेक्‍ट्रमचा भाग आहेत आणि सर्व स्‍तरांवर लैंगिक संवेदनशीलतेचे पालन करतात. तसेच, द बॉडी शॉपने आपल्‍या सर्व कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच सर्वोत्तम डायव्‍हर्सिटी अँड इन्‍क्‍लुजन वर्कशॉपचे आयोजन केले. या वर्कशॉपच्‍या माध्‍यमातून ब्रँडने आपल्‍या कर्मचारीवर्गाला सर्वसमावेशक असणे किती महत्त्वपूर्ण आहे हे जाणून व समजून घेण्‍यास सक्षम केले, तसेच त्‍यांना सर्वांसाठी सुरक्षित, स्‍वागतार्ह व सर्वसमावेशक असलेली स्‍पेस निर्माण करण्‍यास प्रेरित करत आहे, ज्‍यामुळे समान वर्कप्‍लेस निर्माण होईल.

Related posts

पेटीएमचा महसूल वार्षिक २५ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ९,९७८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला

Shivani Shetty

भारतातील द्राक्ष व अन्य फळांच्या निर्यात वाढीसाठी ‘देहात’चा पुढाकार

Shivani Shetty

महाराष्ट्रच्या पहिल्या महिला ड्रोन पायलट बनल्या लीनता शेळके वाघमारे

Shivani Shetty

Leave a Comment