maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नेस्ले इंडिया साजरी करत आहे प्रोजेक्ट हिलदारीची पाच वर्षे

प्रोजेक्ट हिलदारी हा  प्लॅन (पीएलएएन) फाउंडेशन आणि स्त्री मुक्ती संघटना आणि तांत्रिक भागीदार रेसिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भागीदारीत नेस्ले इंडियाचा उपक्रम आहे. गेल्या पाच वर्षांत,हिलदारी प्रोजेक्ट ने भारतातील निवडक पर्यटन शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक आणि लवचिक मॉडेलयशस्वीरित्या विकसित केले आहेत.हा प्रोजेक्ट सध्या पोंडा,मसुरी,महाबळेश्वर, मुन्नार,डलहौसी,दार्जिलिंग आणि पालमपूर येथे कार्यरत आहे.

श्री सुरेश नारायणन,चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर,नेस्ले इंडिया या प्रसंगी बोलताना म्हणाले,पाच वर्षांपूर्वी आम्ही सामूहिक कृतीतून सकारात्मक बदल घडवून आणून आणि सस्टेनेबल  कचरा व्यवस्थापन मॉडेल्सचा अवलंब करून प्रोजेक्ट हिलदारी सह महत्त्वाचा प्रवास सुरू केला.बहु-भागधारक दृष्टिकोनाद्वारे,आम्ही 7 पर्यटन स्थळांवर हा प्रकल्प यशस्वीपणे राबवत आहोत आणि प्रकल्प मजबूत होत आहे. आमची दृष्टी प्रत्यक्षात आणल्याबद्दल मी आमच्या सर्व भागीदारांचे अभिनंदन करू इच्छितो.

श्रीमती ज्योती म्हापसेकर,प्रेसिडेंट, स्त्री मुक्ती संघटना हिलदारी प्रोजेक्ट ने पाच वर्षांचा टप्पा गाठल्याबद्दल बोलताना  म्हणाल्या,हिलदारी प्रोजेक्टची गेली पाच वर्षे टीमसाठी अत्यंत समाधानकारक आहेत, जिथे आम्ही कचरा कामगार समुदायाचे व्यावसायिकीकरण करण्यासारखे काही अर्थपूर्ण कार्य केले. आम्ही ज्या प्रकारे स्टेकहोल्डर्समध्ये जागरुकता वाढवू शकलो आहोत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही सहकार्य करत राहू आणि या शहरांमधील इकोसिस्टमवर सकारात्मक प्रभाव टाकू.

सुश्री मेहा लाहिरी को-फाउंडर,सीओओ आणि सीएफओ,रेसिटी नेटवर्क इंडिया यांनी हे महत्वाचे लक्ष्य गाठल्याबद्दल  आनंद व्यक्त केला आणि म्हणाल्या,रेसिटी नेटवर्क इंडिया प्लॅस्टिकच्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दिशेने काम करत आहे आणि या कारणासाठी मदत करणाऱ्या प्रोजेक्टपैकी हिलदारी हे एक ज्वलंत  उदाहरण आहे. हिलदारी प्रोजेक्ट  मध्ये आम्ही केलेल्या प्रगतीमुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि हे कारण पुढे नेण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत राहू.

हिलदारी प्रोजेक्ट ने भारतभर त्याच्या विद्यमान ठिकाणी 28,000 मेट्रिक टन पेक्षा जास्त कचरा लँडफिलमधून स्त्रोत विलगीकरणाद्वारे वळवला आहे.20,000 हून अधिक निवासी आणि व्यावसायिक कचरा संकलन जागेवरून 80% स्त्रोत विलगीकरण साध्य केले गेले आहे.

समाजातील प्रत्येक सदस्य सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योगदान देऊ शकतो, असा विश्वास हिलदारी यांना वाटतो. या भागीदारी नागरिकांमध्ये एकता आणि सामूहिक भावनेची भावना निर्माण करतात. नगरपालिका परिषद, नागरिक, कंत्राटदार, कचरा कामगार आणि प्रभावक यांच्यासमवेत बहु-सहयोगी दृष्टीकोनातून उगमस्थानी कचऱ्याचे विलगीकरण करण्याच्या दिशेने  कचरा कामगारांना व्यावसायिक बनवण्याच्या दिशेने हा उपक्रम उत्तरोत्तर कार्यरत आहे. हिलदारी प्रोजेक्टद्वारे 560 हून अधिक कचरा कामगारांना वर्तन बदल (हस्तक्षेपाचा) इंटरव्हेन्शनचा एक भाग होण्यासाठी प्रशिक्षित केले गेले आहे. प्रोजेक्टने त्यांना व्यावसायिक ओळखपत्र, आरोग्य विमा, त्यांच्या कामासाठी आवश्यक संरक्षणात्मक उपकरणे आणि इतर असे फायदे देखील प्रदान केले आहेत.

2/1

Related posts

शाह रूख खान झाला 58 वर्षांचा: IMDb वरील त्याचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 10 टायटल्स असे आहेत

Shivani Shetty

विजय सेल्सचा ‘अॅप्पल डेज सेल’

Shivani Shetty

फिल्म फॉर थॉट: मानसिक आरोग्याच्या सकारात्मक चित्रणाची शक्ती

Shivani Shetty

Leave a Comment