maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगने या महिन्‍यामध्‍ये लाँच करण्‍यात येणाऱ्या भारतीयांसाठी विशिष्‍ट एआय वॉशिंग मशिन सेटची झलक दाखवली

गुरूग्राम, भारत – ऑगस्‍ट, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज विशेषत: भारतातील बाजारपेठेसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्या त्‍यांच्‍या आगामी एआय-समर्थित लॉण्‍ड्री स्‍पेशालिस्‍टची झलक दाखवली. नवीन लाँचसह सॅमसंग भारतीय ग्राहकांच्‍या लॉण्‍ड्री अनुभवामध्‍ये क्रांती घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे.
नवीन, एआय-समर्थित वॉशिंग मशिन दैनंदिन नित्‍यक्रमांमध्‍ये प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करेल, ज्‍यामधून लॉण्‍ड्री अनुभवामध्‍ये बदल करत ते अधिक सोपे व अधिक कार्यक्षम होईल. हे लाँच सॅमसंगच्‍या सोयीसुविधांमध्‍ये सुधारणा करण्‍याच्‍या आणि ग्राहकांना ‘डू लेस अँड लिव्‍ह मोअर’साठी सक्षम करण्‍याच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे.
सॅमसंगचा १९७४ मध्‍ये पहिली वॉशिंग मशिन लाँच केल्‍यापासून वॉशिंग मशिन नाविन्‍यतेला चालना देण्‍याचा प्रबळ वारसा आहे. कंपनीने १९७९ मध्‍ये आपली पहिली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन लाँच केली, जिने सिंगल टचमध्‍ये वॉशिंग व स्पिनिंगची सुविधा देत लॉण्‍ड्री (कपडे धुणे) सोपे केले. १९९७ मध्‍ये, सॅमसंगने फ्रण्‍ट-लोडिंग वॉशिंग मशिन लाँच केली, जिने कपड्यांचे नुकसान होणे कमी केले आणि उच्‍च-तापमानामध्‍ये वॉशिंग सक्षम केले, तसेच कपड्यांची काळजी घेण्‍यासाठी नवीन मानक स्‍थापित केले.
२००८ मध्‍ये, सॅमसंगने इकोबबल वॉशिंग मशिनच्‍या लाँचसह क्‍लीनिंगमध्‍ये क्रांती घडवून आणली. बबल तंत्रज्ञानाचा वापर करणारी ही पहिली वॉशिंग मशिन होती, ज्‍यामधून उत्तम क्‍लीनिंगची खात्री मिळते. या इनोव्‍हेशननंतर २०१४ मध्‍ये अॅक्टिव्‍ह ड्युअलवॉश तंत्रज्ञान लाँच करण्‍यात आले, ज्‍याने अद्वितीय वोबल तंत्रज्ञान आणि बिल्‍ट-इन सिंकसह ग्राहकांसाठी सोयीसुविधेमध्‍ये वाढ केली, ज्‍यामुळे कपड्यांचे प्री-ट्रीटमेंट पूर्वीपेक्षा अधिक सोपी झाली.
इनोव्‍हेशनची ही परंपरा कायम राखत सॅमसंगने २०१७ मध्‍ये फ्लेक्‍सवॉश™ वॉशिंग मशिन लाँच केली, जी ड्युअल वॉशर्ससह अद्वितीय स्थिरता देते. ही वॉशिंग मशिन विविध लॉण्‍ड्री गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली. २०२१ पर्यंत सॅमसंगने भारतातील पहिल्‍या एआय-सक्षम इकोबबल वॉशिंग मशिनच्‍या लाँचसह स्‍मार्ट लॉण्‍ड्री सोल्‍यूशन्‍समध्‍ये नवीन बेंचमार्क स्‍थापित केले. या वॉशिंग मशिनमध्‍ये प्रगत एआय तंत्रज्ञान आहे, जे भारतीय कुटुंबांसाठी लॉण्‍ड्री अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते.
सॅमसंग इनोव्‍हेशन्‍स आणि परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या प्रवासामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी राहिली आहे. कंपनी लॉण्‍ड्री केअरच्‍या नवीन युगाचे अनावरण करण्‍यास सज्‍ज आहे, जेथे नवीन वॉशिंग मशिन या महिन्‍याच्‍या अखेरपर्यंत लाँच होण्‍याची अपेक्षा आहे.

Related posts

*सॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी वॉच७, गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, बड्स३ सिरीज लाँच; आकर्षक ऑफर्सचा आनंद घेण्‍यासाठी आजच प्री-बुक करा

Shivani Shetty

युवा भारतीय लेखकों ने पॉकेट एफएम के साथ अपनी सफलता का मनाया जश्न!

Shivani Shetty

इझमायट्रिपने स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजी लाँच केली

Shivani Shetty

Leave a Comment