नवी दिल्ली, २०२४: सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने देशातील इनोव्हेशन इकोसिस्टमला चालना देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला त्यांचा प्रमुख सीएसआर उपक्रम ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’साठी १०० टीम्सची शॉर्टलिस्ट जाहीर केली आहे. या शॉर्टलिस्टमध्ये ‘स्कूल’ व ‘युथ’ ट्रॅकमध्ये प्रत्येकी ५० टीम्सचा समावेश आहे, जे आता राष्ट्रीय शिक्षण व इनोव्हेशन स्पर्धेमध्ये स्पर्धा करतील.
यंदा, प्रादेशिक स्तरावर शॉर्टलिस्ट्स तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ओडिशा येथील खुर्द, आसाम येथील कचार व कामरूप ग्रामीण आणि गुजरात येथील अमरेली अशा देशातील दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नेक्स्ट जनरेशन भारतीय इनोव्हेटर्सपर्यंत स्पर्धा पोहोचली आहे. ‘युथ ट्रॅक’मध्ये थीम ‘एन्व्हायरोन्मेंट अँड सस्टेनेबिलिटी’अंतर्गत सबमिट करण्यात आलेल्या टॉप ५० संकल्पना असमकालीन, तसेच अत्यंत भविष्य-केंद्रित आहेत. तरूणांनी जंगलतोड, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सागरी प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, असुरक्षित पॅकेजिंग आणि अयोग्य जल व्यवस्थापन अशा समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले.
दुसरीकडे, ‘स्कूल’ ट्रॅकमध्ये विद्यार्थ्यांनी ‘कम्युनिटी अँड इन्क्लुजन’ थीमअंतर्गत आपल्या संकल्पनांना सबमिट केले. त्यांच्या संकल्पना शालेय विद्यार्थ्यांमधील मानसिक आजार, एलजीबीटीक्यू समुदायासाठी सर्वसमावेशक वातावरणाचा अभाव, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि रोजगाराकरिता सुसज्ज होण्यासाठी आवश्यक शिक्षण व टेक्निकल कौशल्यामधील विद्यमान तफावत अशा महत्त्वपूर्ण समस्यांसाठी अद्वितीय सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करतात.
१०० टीम्सचे प्रतिनिधीत्व करणारे एकूण २३२ सहभागी आता ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’च्या पुढील टप्प्यासाठी तयारी करतील, जेथे त्यांना तज्ञ प्रशिक्षण व मार्गदर्शनच्या माध्यमातून प्रेझेन्टेशन व प्रभावी कम्युनिकेशन स्किल्ससह सुसज्ज करण्यात येईल. यामुळे त्यांना जुलैच्या मध्यामध्ये सुरू होणाऱ्या प्रादेशिक फेऱ्यांसाठी तयारी करण्यास मदत होईल.
”सॅमसंगचा विश्वास आहे की, तरूणांमध्ये समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अमाप क्षमता आहे. म्हणून, आमचा प्रमुख सीएसआर उपक्रम ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ने यंदा पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांसाठी श्रेणी तयार केली आहे, ज्यामुळे त्यांची अद्वितीय कौशल्ये व संकल्पनांसाठी आवश्यक गरजांची पूर्तता होईल. संकल्पनांच्या दर्जामधील सुधारणेमधून त्यांच्यामध्ये असलेली सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण मानसिकता दिसून येते. यंदा पहिल्यांदाच आम्ही उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व व ईशान्य या पाच प्रांतांमध्ये सखोल प्रवेश करण्याचे ठरवले, ज्यामुळे आम्हाला देशातील दुर्गम भागांमधून अधिकाधिक सहभाग मिळाला. आम्हाला काही सर्वोत्तम संकल्पना मिळाल्या आहेत आणि तरूणांकडून येणारी अशी सादरीकरणे व त्यांची विचारसरणी अत्यंत प्रेरणादायी आहे,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष एसपी चुन म्हणाले.
”सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो उपक्रम यंदा पर्यावरण, समुदाय व सर्वसमावेशकता अशा थीम्सना पाठिंबा देत विकसित झाला आहे. स्वतंत्र ट्रॅक्स – युथ आणि स्कूल यांनी सर्व स्पर्धा करणाऱ्या टीम्सना समान संधी आणि समान खेळाचे मैदान दिले आहे. देशभरातील तरूणांकडून येणाऱ्या विचारशील संकल्पना पाहून अविश्वसनीय वाटत आहे. सॅमसंगसोबत सहयोगाने आमचा भावी पिढीमध्ये समस्या निवारण मानसिकतेला प्रेरित करण्याचा प्रयत्न आहे, जे देशातील स्टार्ट-अप इकोसिस्टम सुधारण्यामध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल,” असे आयआयटी-दिल्ली येथील एफआयटीटीच्या व्यवस्थापकीय संचालक प्रा. प्रीती रंजन पांडा म्हणाल्या.
पुढील टप्प्यामध्ये प्रत्येक ट्रॅकमध्ये निवडण्यात आलेल्या उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण व ईशान्य या पाच प्रांतांमधील दोन टीम्सचा समावेश असेल, ज्यामधून २० टीम्सचे राष्ट्रीय समूह तयार होईल. टॉप २० टीम्सना त्यांची टेक्निकल व सॉफ्ट स्किल्स अधिक निपुण करण्यासाठी सॅमसंगकडून प्रशिक्षण, तसेच मार्गदर्शन मिळेल. या टीम्स गुरूग्राममधील सॅमसंग रिजिनल हेडक्वॉटर्स आणि भारभरातील सॅमसंग आरअँडडी सेंटर्स येथील ‘इनोव्हेशन वॉक’मध्ये देखील सहभागी होतील.
सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४ बाबत माहिती:
यंदा ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ उपक्रमाने दोन विशिष्ट ट्रॅक्स – स्कूल ट्रॅक व युथ ट्रॅक सादर केले. हे प्रत्येक ट्रॅक विशिष्ट थीमला चालना देण्याप्रती समर्पित आहेत आणि विविध वयोगटातील व्यक्तींवर लक्ष्य करतात. दोन्ही ट्रॅक्स एकाच वेळी राबवण्यात येतात, ज्यामधून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान खेळाच्या मैदानाची खात्री मिळते.
स्कूल ट्रॅक: स्कूल ट्रॅक १४ ते १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो ‘कम्युनिटी अँड इन्क्लुजन’ थीमवर लक्ष केंद्रित करतो. विजेत्या टीमला सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४ ची ‘कम्युनिटी चॅम्पियन’ म्हणून घोषित करण्यात येईल आणि प्रोटोटाइप सुधारणेसाठी २५ लाख रूपयांची सीड अनुदान मिळेल. विजेत्या टीम्सच्या स्कूल्सना शैक्षणिक ऑफरिंग्ज वाढवण्यासाठी, समस्या निवारण मानसिकतेला प्रेरित करण्यासाठी सॅमसंग प्रॉडक्ट्स देखील मिळतील.
युथ ट्रॅक: युथ ट्रॅक १८ ते २२ वर्ष वयोगटातील व्यक्तींवर लक्ष्य करण्यासह थीम ‘एन्व्हायरोन्मेंट अँड सस्टेनेबिलिटी’वर लक्ष केंद्रित करतो. विजेत्या टीमला सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४ ची ‘एन्व्हायरोन्मेंट चॅम्पियन’ म्हणून घोषित करण्यात येईल आणि आयआयटी-दिल्ली येथे इन्क्यूबेशनसाठी ५० लाख रूपयांचे अनुदान मिळेल. विजेत्या टीम्सच्या कॉलेजेसना त्यांच्या शैक्षणिक ऑफरिंग्ज वाढवण्यासाठी, सामाजिक उद्योजकतेला प्रेरित करण्यासाठी सॅमसंग उत्पादने देखील मिळतील.
सॅमसंग इंडियाने फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (एफआयआयटी), आयआयटी दिल्लीसोबत सहयोग केला आहे. तिसऱ्या पर्वासाठी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी; मंथन, ऑफिस ऑफ प्रिन्सिपल सायण्टिफिक अॅडवायजर, भारत सरकार आणि युनायटेड नेशन्स इन इंडिया यांच्यासोबत धोरणात्मक सहयोग देखील केले आहेत.
२०१० मध्ये प्रथम यूएसमध्ये लाँच करण्यात आलेला उपक्रम सॉल्व्ह फॉर टूमारो सध्या जगभरातील ६३ देशांमध्ये कार्यरत आहे आणि जगभरातील २.३ दशलक्षहून अधिक तरूणांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.