नवी मुंबई, 13 ऑगस्ट २०२४: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सेवा मिळवता याव्यात ही नोकरदार, व्यावसायिक आणि कुटुंबांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने संडे क्लिनिक सुरु केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता रविवारी देखील ओपीडी मध्ये डॉक्टरांना भेटता येणार आहे. जेसीआय आणि एनएबीएच मान्यताप्राप्त सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलने हा उपक्रम सुरु केलेला असल्याने सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध होत आहेत. आठवड्यातील मधल्या दिवशी डॉक्टरांना भेटण्यासाठी वेळ काढणे नोकरदार, व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असलेल्या व्यक्तींना गैरसोयीचे असते, त्यांच्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे संडे क्लिनिक एक खूप मोठा दिलासा आहे.
श्री अरुणेश पुनेथा, पश्चिम क्षेत्र-रिजनल सीईओ, अपोलो हॉस्पिटल यांनी सांगितले,”नोकरी, व्यवसाय, शाळेत जाणारी मुले अशा जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी आठवड्यातील मधल्या दिवशी डॉक्टरांना भेटण्यासाठी वेळ काढणे कठीण असू शकते. अनेक लोक खूप लांबून प्रवास करून येतात, तब्येतीच्या समस्यांसाठी डॉक्टरांना भेटणे शक्य होत नाही, त्यामुळे आजाराचे निदान व त्यावरील उपचार यामध्ये उशीर होतो. आम्ही असे मानतो की, व्यक्तीचे शेड्युल कसेही असो, किंवा आठवड्याचा कोणताही दिवस असो, प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्यसेवा मिळाली पाहिजे. रविवारी देखील क्लिनिक सुरु ठेवून आम्ही आमचे विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लोकांना सर्वोत्तम दर्जाची आरोग्य देखभाल आणि सेवा पुरवण्याप्रती आमची बांधिलकी यामधून अधोरेखित होत आहे.”
सध्या शनिवारी कन्सल्टेशन अपॉईंटमेंट्सची मागणी प्रचंड वाढली आहे, शनिवारचे अपॉइंटमेंट स्लॉट्स अनेक आठवडे आधीच बुक केले जात आहेत. युवा नोकरदार, व्यावसायिक, लहान मुलांचे पालक, घरातील वृद्धांची काळजी घेणारे लोक अशांमध्ये हा ट्रेंड जास्त पाहायला मिळतो, आठवड्याच्या मधल्या दिवशी ऑफिसमधील काम किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून डॉक्टरांना भेटण्यासाठी वेळ काढणे त्यांना तितकेसे सोयीस्कर नसते. नव्याने सुरु करण्यात आलेल्या संडे क्लिनिकमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर्सकडून कन्सल्टेशनपासून रोगनिदान सेवांपर्यंत विविध सेवा मिळतील.
आता पावसाळ्यामुळे स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, वेगवेगळे ताप असे आजार वाढले आहेत, उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा सदैव मिळत राहणे अत्यावश्यक बनले आहे.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई उच्च अनुभवी डॉक्टर्स व सेवातत्पर सहायता कर्मचाऱ्यांनी सुसज्ज आहे, आपल्या रुग्णांना प्रगत आरोग्यसेवा तंत्रज्ञान आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बांधील आहे. याठिकाणी काटेकोर मानके व नियमांचे पालन केले जात असल्याने रुग्णांना सुरक्षितता व उपचारांचे प्रभावी परिणाम मिळतात. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये २४X७ इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे जिच्याकडे ५जी सक्षम रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध आहे. ०२२ ६२८० ६२८० या क्रमांकावर फोन करून रविवारची अपॉइंटमेंट बुक करता येईल.