maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

*सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया, बेंगळुरूकडून कर्नाटकमधील पहिल्‍या विमेन-ओन्‍ली इंजीनिअरिंग कॉलेजमध्‍ये सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसचे उद्घाटन* 

बेंगळुरू, भारत, फेब्रुवारी १९, २०२५ – सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया, बेंगळुरू (एसआरआय-बी)ने कर्नाटकमधील पहिले ऑल-विमेन्‍स इंजीनिअरिंग कॉलेज गीता शिशू शिक्षण संघ (जीएसएसएस) इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्‍नालॉजी फॉर विमेन, म्‍हैसूर येथे सॅमसंगचा प्रमुख जागतिक नागरिकत्‍व उपक्रम सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस (एसआयसी)चे उद्धाटन केले. या उपक्रमामधून एसटीईएममध्‍ये लैंगिक समानतेला चालना देण्‍याप्रती आणि तंत्रज्ञानामध्‍ये महिला प्रमुखांच्‍या नवीन पिढीला चालना देण्‍याप्रती सॅमसंगची अविरत कटिबद्धता दिसून येते.

सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये सुरू करण्‍यात आलेला एसआयसी उपक्रमामध्‍ये भारतातील तरूणांना उद्योगासाठी सुसज्‍ज करण्‍यासाठी सॅमसंगच्‍या जागतिक आरअँडडी तज्ञांनी विशेषरित्‍या डिझाइन केलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स/मशिन लर्निंग, बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंग यांसारख्‍या मुलभूत तंत्रज्ञान कौशल्‍यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्‍यापक अभ्‍यासक्रमाचा समावेश आहे. या उपक्रमामध्‍ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्‍यांना क्‍लासरूम फॅसिलिटीमध्‍ये तज्ञांकडून ऑफलाइन व ऑनलाइन प्रशिक्षणाची, तसेच एसआरआय-बी आणि जीएसएसएस इन्स्टिट्यूटमधील मेन्‍टोर्सच्‍या मार्गदर्शनाखाली नाविन्‍यपूर्ण प्रकल्‍पांवर काम करण्‍याची संधी मिळेल.

“सॅमसंगमध्‍ये आमचा विश्‍वास आहे की, संधी सर्वसमावेशक असल्‍यास इनोव्‍हेशन प्रगत होऊ शकते. कर्नाटकमधील पहिल्‍या विमेन्‍स इंजीनिअरिंग कॉलेजमध्‍ये सॅमसंग इनोव्हेशन कॅम्‍पस (एसआयसी)चे उद्घाटन करताना आम्‍हाला अत्‍यंत अभिमान वाटत आहे, जेथे तरूण विचारवंत एक्‍स्प्‍लोअर, प्रयोग करतील आणि तंत्रज्ञानाच्‍या मर्यादांना दूर करतील. सरकारच्‍या #DigitalIndia व #MakeinIndia मोहिमांशी संलग्‍न राहत हा कॅम्‍पस विद्यार्थ्‍यांना देशामधून तंत्रज्ञान प्रगतीला गती देण्‍यास सक्षम करतो. आम्‍ही महिला प्रमुखांना निपुण करण्‍यास उत्‍सुक आहोत, जेथे तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून निर्मिती, नाविन्‍यता आणि जगामध्‍ये परिवर्तन घडवून आणतील,” असे एसआरआय-बीचे कॉर्पोरेट उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक मोहन राव गोली म्‍हणाले.

२०२४ मध्‍ये, सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाने २०२३ मधील ३,००० विद्यार्थ्‍यांच्‍या तुलनेत ३,५०० विद्यार्थ्‍यांची नोंदणी करत आपल्‍या एसआयसी पोहोचमध्‍ये वाढ केली. एसआयसी आणि सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो (एसएफटी) अशा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटीप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेमधून भारतातील भावी टेक लीडर्सना निपुण व प्रशिक्षित करण्‍याप्रती त्‍यांचे मिशन दिसून येते. या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सॅमसंग भारतातील तरूणांना पाठिंबा देत आहे, त्‍यांना कौशल्‍यांसह सक्षम करत आहे, जे त्‍यांचा वैयक्तिक व व्‍यावसायिक विकास करण्‍यासोबत भारताला जागतिक तंत्रज्ञान हब म्‍हणून सक्षम देखील करतात.

“एसआरआय-बी सोबतचा आमचा सहयोग अधिक प्रभावाची खात्री देतो, तसेच कॅपस्‍टोन प्रकल्‍पांच्‍या माध्‍यमातून उद्योग-संबंधित कोर्सेस् व सर्वोत्तम कौशल्‍ये, प्रबळ टेक्निकल प्राया आणि व्‍यावहारिक एक्‍स्‍पोजर देतो. हा उपक्रम डिजिटल कौशल्‍यांमधील तफावत दूर करत आणि महिलांना भावी कर्मचारीवर्गासाठी सुसज्‍ज करत #DigitalIndia ला पाठिंबा देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दृढ करतो. संरचित अभ्‍यासक्रमाच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना समस्‍या-निवारण आणि उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांमधील प्रत्‍यक्ष अनुभव मिळेल, ज्‍यामुळे रोजगारक्षमता आणि नाविन्‍यतेमध्‍ये वाढ होईल. आम्‍ही या बहुमूल्‍य सहयोगासाठी एसआरआय-बीचे कौतुक करतो, जी तरूण महिला टेक्‍नॉलॉजिस्‍ट्सना तंत्रज्ञान प्रगतीला चालना देण्‍यास सक्षम करते,” असे जीएसएसएस (आर), म्‍हैसूरच्‍या सचिव अनुपमा बी. पंडित म्‍हणाल्‍या.

एसआरआय-बीने कर्नाटकमधील सात इतर इन्स्टिट्यूट्ससह बीएनएम इन्स्ट्यिूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, केम्ब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (मेन अँड नॉर्थ कॅम्‍पसेस्), डॉन बॉस्‍को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, केएलई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, आरएनएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आरएनएसआयटी) बेंगळुरू येथे एसआयसी स्‍थापित केल्‍या आहेत, तसेच आयआयआयटी-कुर्नूलमध्‍ये एक एसआयसी स्‍थापित केले आहे, जे तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंधित संधींचा फायदा घेण्‍यासाठी ८०० हून अधिक विद्यार्थ्‍यांना आवश्‍यक कौशल्‍यांचे प्रशिक्षण देते.

Related posts

आयकॉन स्टार’ अल्लू अर्जुन Snapchat वर

Shivani Shetty

कुपोषणाविरुद्ध लढा देणाऱ्या सुपोषण संगिनींचा सन्मान

Shivani Shetty

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् (एचसीसीबी)ने महाराष्‍ट्रसह १०० शाळांमध्‍ये डिजिटल स्‍मार्टबोर्डस् स्‍थापित केले

Shivani Shetty

Leave a Comment