नवी दिल्ली, १८ फेब्रुवारी २०२५: कोका-कोला इंडियाचा स्वदेशी ब्रँड लिम्का हे पेय आहे, जे सर्वत्र आयकॉनिक आहे. विशिष्ट क्लाऊडी बबल्सपासून भारतीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या उत्साहपूर्ण स्वादापर्यंत लिम्का अभूतपूर्व अनुभव आहे. आणि आता भारतातील सर्वात लोकप्रिय लेमनी पेय लिम्का उत्साहवर्धक नवीन समर कॅम्पेनसह रिफ्रेशमेंटच्या नवीन युगामध्ये प्रवेश करत आहे.
उन्हाळ्यातील कडाक्याच्या ऊनामध्ये थंडगार लिम्का उत्साह वाढवण्यासोबत तुम्हाला ‘थंडावा’ देते. लिम्कासाठी यंदाच्या समर कॅम्पेनमध्ये हा उत्साह खास आहे.
ब्रँडच्या सिग्नेचर लाइम ‘एन’ लेमनी फिझवरील ही नवीन कॅम्पेन ग्राहकांना लिम्काची मोहकता व रोमांसचा पुन्हा शोध घेत साजरा करण्याचे आवाहन करते.
या कॅम्पेनमध्ये मोहक तृप्ती डिमरी आणि तिचा केसाळ मित्र आहे, जेथे ती उष्णतेवर मात करत अद्वितीय लिम्का पद्धतीने थंडाव्याचा आनंद घेते. तिने लिम्काचा घोट घेताच गतीशील दृश्ये दिसू लागतात, ज्यामध्ये तिचा उत्साह वाढतो आणि सर्वत्र फ्रेशनेस दिसून येतो.
कोका-कोला कंपनीच्या भारत व नैऋत्य आशियामधील ऑपरेटिंग युनिटच्या मार्केटिंग – हायड्रेशन, स्पोर्ट्स अँड टी कॅटेगरीच्या वरिष्ठ संचालक रूचिरा भट्टाचार्य म्हणाल्या, “लिम्का वैविध्यपूर्ण ब्रँड आहे आणि सर्व वयोगटातील ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. या कॅम्पेनसह आम्ही लिम्कासंदर्भातील सर्व लोकप्रिय गोष्टी पुन्हा लिम्कामध्ये आणल्या आहेत. आम्ही ‘हलके-फुलके’ मधुरमय जिंगल देखील सादर केले आहे आणि आमच्यासोबत मोहक तृप्ती आहे. या दोघांनी आमच्या कॅम्पेनमध्ये उत्साहाची भर केली आहे. आम्ही पेय श्रेणीमध्ये लिम्काचे अग्रस्थान पुन्हा एकदा अधिक दृढ करण्याची आशा करतो, तसेच या खास कॅम्पेनच्या माध्यमातून हे पेय त्वरित रिफ्रेशमेंट व उत्साहासाठी पसंतीचे राहण्याची खात्री घेत आहोत.”
तृत्पी डिमरी म्हणाल्या, “लिम्काने मला जुन्या आठवणींना उजाळा देण्यास भाग पाडले आहे, तसेच या मोहिमेने मला लिम्काच्या जुन्या, मोहक व धमाल विश्वामध्ये नेले. मला या कॅम्पेनचा भाग होण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत आहे. मी दिबाकर सर आणि संपूर्ण टीमसोबत या जाहिरातीचे शूटिंग करताना खूप धमाल केली. आशा करते की, प्रेक्षकांना ही जाहिरात आवडेल. ही जाहिरात मनाला आनंद देणाऱ्या उत्साहाबाबत आहे.”