maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून दैनंदिन गेमिंग, बिझनेस आणि क्रिएटिव्‍ह कार्यप्रवाहासाठी उच्‍च-कार्यक्षम, ऊर्जा-कार्यक्षम इंटर्नल स्‍टोरेज डिवाईस ‘एसएसडी ९९० ईवो’ लाँच

गुरूग्राम, भारत – जानेवारी ३०, २०२४ सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज कंपनीच्‍या सॉलिड स्‍टेट ड्राइव्‍ह्सच्‍या श्रेणीमधील नवीन ड्राइव्‍ह – एसएसडी ९९० ईवो लाँच केली आहे. सर्वोत्तम ऊर्जा कार्यक्षमतेसह एसएसडी ९९० ईवो ऊर्जा कार्यक्षमता देते. ही ड्राइव्‍ह गेमिंग, काम आणि व्हिडिओ/फोटो एडिटिंग अशा दैनंदिन कम्‍प्‍युटिंग अनुभवांमध्‍ये अधिक वाढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. सीक्‍वेन्शियल रीड स्‍पीड जवळपास ५,००० एमबी/सेकंद आणि राइट स्‍पीड जवळपास ४,२०० एमबी/सेकंदसह सुसज्‍ज असलेली एनव्‍हीएमई एसएसडी विविध वापरकर्त्‍यांसाठी योग्‍य सोल्‍यूशन असण्‍याची अपेक्षा आहे.

आम्‍ही आमच्‍या उत्‍पादनांमध्‍ये नाविन्‍यता व व्‍यावहारिकतेचा समावेश करतो. यामुळे आम्‍ही वापरकर्त्‍यांसाठी कम्‍प्‍युटिंग अनुभव वाढवणारी उत्‍पादने डिझाइन करण्‍यास सक्षम झालो आहोत. आमच्‍या एसएसडीच्‍या श्रेणीमधील नवीन एसएसडी ९९० ईवोसह आमचा प्रगत मेमरी तंत्रज्ञानांचा फायदा घेण्‍याचा आणि ग्राहकांच्‍या डेटा स्‍टोरेज गरजांसाठी वैविध्‍यपूर्ण, उच्‍च-कार्यक्षम व विश्‍वसनीय सोल्‍यूशन प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे. एसएसडी ९९० ईवो ऊर्जा-कार्यक्षम, परफॉर्मन्‍स माएस्‍ट्रो आहे, जी ग्राहकांच्‍या व्‍यवसाय व क्रिएटिव्‍ह प्रयत्‍नांसाठी भावी कम्‍प्‍युटिंग आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स एंटरप्राइज बिझनेसचे उपाध्‍यक्ष श्री. पुनीत सेठी म्‍हणाले.   

सुधारित कार्यक्षमता 

९९० ईवो पूर्वीचा मॉडेल ९७० ईवो प्‍लसच्‍या तुलनेत जवळपास ४३ टक्‍के सुधारित कार्यक्षमता देते. सीक्‍वेन्शियल रीड स्‍पीड जवळपास ५,००० मेगाबाइट्स-प्रति-सेकंद (एमबी/सेकंद) आणि राइट स्‍पीड जवळपास ४,२०० एमबी/सेकंद आहे. रॅण्‍डम वाचन व राइट स्‍पीड देखील वाढवण्‍यात आल आहे, अनुक्रमे ७००के इनपुट/आऊटपुट ऑपरेशन्‍स प्रति सेकंद (आयओपीएस) आणि ८००के आयओपीएस आहे.  

होस्‍ट प्रोसेसरच्या DRAM शी प्रत्‍यक्ष लिंक होण्‍यासाठी होस्‍ट मेमरी बफर (एचएमबी) तंत्रज्ञानाचा वापर करत एसएसडी DRAM-विरहित डिझाइनसह सानुकूल कार्यक्षमता संपादित करू शकते. पूर्वीच्‍या मुख्‍य एसएसडींमधून अपग्रेड करणाऱ्या वापरकर्त्‍यांना गेम्‍ससाठी जलद लोडिंग गतींचा आणि मोठ्या फाइल्‍स सुलभपणे उपलब्‍ध होण्‍याचा अनुभव मिळेल. 

सुधारित ऊर्जा कार्यक्षमता आणि स्‍मार्ट थर्मल सोल्‍यूशन 

सॅमसंग ९९० ईवोमध्‍ये ९७० ईवो प्‍लसच्‍या तुलनेत जवळपास ७० टक्‍क्‍यांनी सुधारित ऊर्जा कार्यक्षमता आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते बॅटरी लाइफबाबत चिंता न करता पीसीवरील वापर वाढवू शकतात. तसेच यामध्‍ये मॉडेम स्‍टॅण्‍डबाय1 देखील आहे, जे कमी लो-पॉवर स्थितींमध्‍ये देखील विनाव्‍यत्‍यय इंटरनेट कनेक्‍टीव्‍हीटी आणि एकसंधी नोटिफिकेशन प्राप्‍त होण्‍यासह त्‍वरित ऑन/ऑफ फंक्‍शन देते. 

९९० ईवोचे हीट स्‍प्रेडर लेबल NAND चिपच्‍या थर्मल स्थितीचे प्रभावीपणे नियमन करते, ज्‍यामुळे ड्राइव्‍ह इंटीग्रिटीबाबत कोणतीही तडजोड न करता उच्‍च पातळवर कार्यसंचालने सुरू राहतात. 

विद्यमान व भावी कम्‍प्‍युटिंगसाठी वैविध्‍यपूर्ण एसएसडी 

९९० ईवो वैविध्‍यपूर्ण एसएसडी आहे, जी विद्यमान कम्‍प्‍युटिंग गरजा आणि अपेक्षित भावी गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. वापर्ते सिंगल एससडीसह एकसंधी मल्‍टीटास्किंगचा अनुभव घेऊन शकतात. सिंगल एसएसडी गेमिंग, व्‍यवसाय व क्रिएटिव्‍ह कार्यप्रवाह अशा दैनंदिन मागण्‍यांची पूर्तता करते. 

PCIe 4.0 x4 आणि PCIe 5.0 x2 इंटरफेसेसचे पाठबळ असलेली ९९० ईवो आजच्‍या PCIe 4.0 M.2 स्‍लॉट्स असलेल्‍या पीसींच्‍या गरजांची पूर्तता करते, तसेच आगामी अॅप्‍लीकेशन्‍समधील PCIe 5.0 इंटरफेसेससाठी थर्मल कंट्रोल व पॉवर सेव्हिंग्‍जसह सुसंगता देखील देते. 

९९० ईवो १ टेराबाइट (टीबी) आणि २ टीबी क्षमतेच्‍या पर्यायांमध्‍ये येते.

सॅमसंग मॅजिशियन सॉफ्टवेअर सपोर्ट

सॅमसंग मॅजिशियन सॉफ्टवेअर ९९० ईवोसह सर्व सॅमसंग एसएसडींकरिता सुधारित कार्यक्षमतेसाठी ऑप्टिमायझेशन टूल्‍सची श्रेणी देते. वापरकर्ते एसएसडी अपग्रेड्ससाठी डेटा मायग्रेशन प्रक्रिया प्रभावीपणे व सुरक्षितपणे सुव्‍यवस्थित करू शकतात. तसेच, सॅमसंग मॅजिशियन बहुमूल्‍य डेटाचे संरक्षण करते, ड्राइव्‍हच्‍या हेल्‍थवर देखरेख ठेवते आणि वेळेवर फर्मवेअर अपडेट्सबाबत सूचित करते.

किंमत, व्‍हेरिएण्‍ट्स आणि कुठे खरेदी करता येईल 

काळ्या रंगामध्‍ये उपलब्‍ध एसएसडी ९९० ईवोची किंमत १ टीबी व्‍हेरिएण्‍टसाठी ९९९९ रूपयांपासून सुरू होत २ टीबी व्‍हेरिएण्टसाठी १६६९९ रूपयांपर्यंत आहे. ही ड्राइव्‍ह आघाडीच्‍या इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल स्‍टोअर्समध्‍ये आणि ऑनलाइन व्‍यासपीठांवर उपलब्‍ध असेल. 

वॉरंटी 

ग्राहकांना एसएसडी ९९० ईवोवर ५ वर्षांची मर्यादित वॉरंटी देण्‍यात येईल. 

सॅमसंग एसएसडी ९९० ईवोची वैशिष्‍ट्ये       

श्रेणी

सॅमसंग एसएसडी ९९० ईवो

इंटरफेस 

PCIe Gen 4.0 x4 / 5.0 x2 NVMe 2.02

फॉर्म फॅक्‍टर 

M.2 (2280)

स्‍टोरेज मेमरी

सॅमसंग V-NAND ३-टीएलसी 

कंट्रोलर 

सॅमसंग इन-हाऊस कंट्रोलर 

क्षमता3

१ टीबी 

२ टीबी 

सीक्‍वेन्शियल रीड/राइट स्‍पीड4,5

जवळपास ५,००० एमबी/सेकंद, जवळपास ४,२०० एमबी/सेकंद 

रॅण्‍डम रीड/राइट स्‍पीड (क्‍यूडी३२)4,5

जवळपास ६८०के आयओपीएस, ८००के आयओपीएस 

जवळपास ७००के आयओपीएस, ८००के आयओपीएस 

मॅनेजमेंट सॉफ्टवेअर 

सॅमसंग मॅजिशियन सॉफ्टवेअर 

डेटा एन्क्रिप्‍शन 

एईएस २५६-बीट फुल डिस्‍क एन्क्रिप्‍शन, टीसीजी/ओपल व्‍ही२.०

एन्क्रिप्‍टेड ड्राइव्‍ह (IEEE1667)

एकूण बाइट्स रिटन 

६०० टीबी 

१२०० टीबी 

वॉरंटी6

पाच वर्षांची मर्यादित वॉरंटी7

    

1 मॉडेम स्‍टॅण्‍डबायबाबत सविस्‍तर माहितीसाठी कृपया Microsoftवेबसाइटला (https://learn.microsoft.com/en-us/windows-hardware/design/device-experiences/part-selection#ssd-storage) भेट द्या. 

2 एनव्‍हीएम एक्‍स्प्रेस® डिझाइन मार्क एनव्‍हीएम एक्‍स्‍प्रेस, इन्‍क.चे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.

3    १ जीबी = ,०००,०००,००० बाइट्स बाय IDEMA. क्षमतेचा विशिष्‍ट भाग सिस्‍टम फाइल आणि मेन्‍टेनन्‍स वापरासाठी वापरला जाऊ शकतो, ज्‍यामुळे वास्‍तविक क्षमता उत्‍पादनाच्‍या लेबलवर निर्देशित करण्‍यात आलेल्‍या क्षमतेपेक्षा भिन्‍न असू शकते. 

4 ,5 सीक्‍वेन्शियल आणि रॅण्‍डम कार्यक्षमता मापनवर आधारित आहे. कार्यक्षमता एसएसडीच्‍या फर्मवेअर व्हर्जन, सिस्‍टम हार्डवेअर आणि कन्फिग्‍युरेशननुसार भिन्‍न असू शकते. 

टेस्‍ट सिस्‍टम कन्फिग्‍युरेशन: एएमडी रायझेन९ ७९५०एक्‍स १६-कोअर प्रोसेसर सीपीयू@४.५ गिगाहर्ट, डीडीआर५ ४८०० मेगाहर्ट्झ १६जीबीx२ (पीसी५-३८४००), ओएस-विंडोज ११ प्रो ६४ बीट, चिपसेट – एएसरॉकएक्‍स६७०ई टायची

6 सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार राहणारनाही, ज्यामध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनांवरील डेटा किंवा इतरमाहितीची हानी किंवा वापरकर्त्याद्वारे होणारा नफा किंवा महसूल हानीचासमावेश आहे, पण इतकेच मर्यादित नाही. वॉरंटीबाबत अधिक माहितीसाठी कृपया samsung.com/SSD or semiconductor.samsung.com/internal-ssd/ येथे भेट द्या. 

7 पाच वर्ष किंवा टोटल बाइट्स रिटन (टीबीडब्‍ल्‍यू), जे पहिले लागू असेल ते. वॉरंटीबाबत अधिक माहितीसाठी कृपया पॅकेजसोबत असलेले वॉरंटी डॉक्‍यमेंट पहा.    

सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कं. लि. बाबत

सॅमसंग परिवर्तनशील संकल्‍पना व तंत्रज्ञानांसह जगाला प्रेरित करते आणि भविष्‍याला आकार देते. कंपनी टीव्‍ही, स्‍मार्टफोन्‍स, वीअरेबल डिवाईसेस, टॅब्‍लेट्स, होम अप्‍लायन्‍सेस, नेटवर्क सिस्‍टम्‍स व मेमरी, सिस्‍टम एलएसआय, फाउंड्री आणि एलईडी सोल्‍यूशन्‍स या विश्‍वांमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे, तसेच आपली स्‍मार्टथिंग्‍ज इकोसिस्‍टम आणि भागीदारांसोबत खुल्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून एकसंधी कनेक्‍टेड अनुभव देत आहे. सॅमसंग इंडियावरील नवीन बातम्‍यांसाठी कृपया सॅमसंग इंडिया न्‍यूजरूमला http://news.samsung.com/in येथे भेट द्या. हिंदीसाठी सॅमसंग न्‍यूजरूम भारतला https://news.samsung.com/bharat येथे भेट द्या. तुम्‍ही आम्‍हाला ट्विटरवर @SamsungNewsIN येथे फॉलो करू शकता.

Related posts

द बॉडी शॉपने विशेष फुल फ्लॉवर्स कलेक्‍शन लाँच केले

Shivani Shetty

फिजिक्स वालाद्वारे २०० कोटींच्या शिष्यवृत्तीची घोषणा

Shivani Shetty

कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागात किया सोनेटचा सर्वात कमी देखभाल खर्च

Shivani Shetty

Leave a Comment