maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून भारतात सॅमसंग हेल्‍थ अॅपवर वैयक्तिक हेल्‍थ रेकॉर्डस् फिचर लाँच

गुरूग्राम, भारत – जानेवारी, २०२५: भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड सॅमसंगने सॅमसंग हेल्‍थ अॅपमध्‍ये हेल्‍थ रेकॉर्डस् फिचरची भर केल्‍याची घोषणा केली. यामुळे वापरकर्त्‍यांना अधिक सर्वसमावेशकपणे त्‍यांच्‍या आरोग्‍याचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होईल.

हेल्‍थ रेकॉर्डस् फिचर वापरकर्त्‍यांना प्रत्‍यक्ष सॅमसंग हेल्‍थ मोबाइल अॅपच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे आयुष्‍मान भारत हेल्‍थ अकाऊंट (आभा) तयार करण्‍यासोबत उपलब्‍ध होण्‍यास मदत करते. वापरकर्ते आता भारतभरातील आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांनी तयार केलेल्‍या त्‍यांच्‍या हेल्‍थ डेटाचे प्रभावीपणे व्‍यवस्थापन करू शकतात, ज्‍यामुळे व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या वैयक्तिक हेल्‍थ रेकॉर्डसवर देखरेख ठेवण्‍याच्‍या पद्धतीत बदल झाला आहे.

सॅमसंगचा नवीन उपक्रम वापरकर्त्‍यांना देशातील डिजिटल हेल्‍थ इकोसिस्‍टमशी विनासायास व सुरक्षितपणे एकीकृत करत सक्षम करतो. हा उपक्रम भारत सरकारच्‍या आयुष्‍मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) प्रकल्‍पाशी संलग्‍न आहे.

”सॅमसंग ग्राहकांच्‍या गरजांना प्राधान्‍य देते आणि त्‍यांच्‍या दैनंदिन अनुभवांना अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी सतत उत्‍पादने व सेवांमध्‍ये वाढ करते. भारतीयांसाठी सॅमसंग हेल्‍थ अॅपमध्‍ये भर करण्‍यात आलेल्‍या हेल्‍थ रेकॉर्डस् फिचरमधून सोईस्‍करपणे डिजिटल हेल्‍थ रेकॉर्डस् उपलब्‍ध करून देण्‍याप्रती आमची समर्पितता दिसून येते, ज्‍यामुळे कधीही डॉक्‍टर किंवा केअरटेकर्ससोबत सुरक्षितपणे डेटा शेअर करता येतो. हे फिचर वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या हेल्‍थ हिस्‍ट्रीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास, प्रोग्रेसवर देखरेख ठेवण्‍यास आणि त्‍यांच्‍या आरोग्‍यावर सर्वोत्तम नियंत्रण ठेवण्‍यास सक्षम करते,” असे नोएडामधील सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे व्‍यवस्‍थापकीय संचालक क्‍यूनग्‍यून रू म्‍हणाले.

सॅमसंग येथील आरअँडडी, यूएक्‍स डिझाइन व कंझ्युमर एक्‍स्‍पेरिअन्‍स टीम्‍स आणि भारतातील आघाडीची एबीडीएम-प्रमाणित इंटीग्रेटर ईका केअर यांच्‍या सहयोगात्‍मक प्रयत्‍नांमधून हेल्‍थ रेकॉर्डस् फिचर लाँच करण्‍यात आले आहे. या फिचरसह, वापरकर्ते सॅमसंग हेल्‍थ अॅपमधील आभा अकाऊंटसाठी त्‍यांच्‍या आधार किंवा मोबाइल फोन क्रमांकाच्‍या माध्‍यमातून नोंदणी करू शकतात. नोंदणी झाल्‍यानंतर त्‍यांना त्‍यांची मेडिकल हिस्‍ट्री, तसेच प्रीस्क्रिप्‍शन्‍स, लॅबोरेटरी अहवाल, हॉस्पिटल व्हिझिट्स पाहता येईल, जे त्‍यांच्‍या अद्वितीय आभा आयडीशी सुरक्षितपणे लिंक असतील.

”ईका केअरमध्‍ये आम्‍हाला सॅमसंगसोबतच्‍या सहयोगाचा आनंद होत आहे. यामुळे भारतभरात एबीडीएमच्‍या अवलंबनाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल. हा सहयोग देशामध्‍ये अधिक कनेक्‍टेड व कार्यक्षम आरोग्‍यसेवा इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याच्‍या दिशेने प्रमुख पाऊल आहे,” असे ईका केअरचे सह-संस्‍थापक दीपक तुली म्‍हणाले.

सॅमसंगचा डिजिटायझेशनच्‍या क्षमतेचा फायदा घेत भारतीयांच्‍या वैयक्तिक आरोग्‍यसेवा व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये क्रां‍तिकारी बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे. वापरकर्ते आता सुरक्षितपणे एबीडीएम-प्रमाणित सेक्‍युअर हेल्‍थ लॉकर्समध्‍ये त्‍यांचे हेल्‍थ रेकॉर्डस् स्‍टोअर करू शकतात आणि पेपरवर्कचा त्रास दूर करू शकतात.

तसेच, एबीडीएम-प्रमाणित हॉस्पिटल्‍स व क्लिनिक्‍समध्‍ये ओपीडी भेटीदरम्‍यान वापरकर्ते सॅमसंग हेल्‍थ अॅपच्‍या माध्‍यमातून क्‍यूआर कोड स्‍कॅन करत व्‍हर्च्‍युअल क्‍यू टोकन घेऊ शकतात आणि प्रतिक्षाकाळ कमी करू शकतात.

सॅमसंग हेल्‍थ अॅप सर्वसमावेशक आरोग्‍यसेवांसह औषधोपचार व्‍यवस्‍थापन, स्‍लीप मॉनिटरिंग, अर्थपूर्ण प्रोग्राम्‍स आणि अनियमित हृदयाच्‍या ठोक्‍यांबाबत नोटिफिकेशन्स देते. सॅमसंग डिवाईसेसवर सर्व सॅमसंग हेल्‍थ युजर डेटा डिफेन्‍स-ग्रेड नॉक्‍स सिक्‍युरिटी प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून सुरक्षित आहे.

भारतातील वापरकर्ते सॅमसंग गॅलॅक्‍सी स्‍टोअर व गुगल प्‍ले स्‍टोअरवर सॅमसंग हेल्‍थचे नवीन अॅप अपडेट्स करत नवीन हेल्‍थ रेकॉर्डस् फिचरचा अनुभव घेऊ शकतात.

सॅमसंग न्‍यूजरूम इंडिया

Samsung Introduces Personal Health Records Feature on Samsung Health App in India – SamsungNewsroomIndia

Related posts

परवडण्याजोगी आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी ‘ईझेरेक्स’चा पुढाकार

Shivani Shetty

एचसीसीबी महाराष्‍ट्रातील ५,५०० व्‍यक्‍तींना अपस्किल करण्‍यासह १४ गावांमध्‍ये सामुदायिक प्रकल्‍प राबवणार

Shivani Shetty

मुलांना न्युमोकॉक्कल बॅक्टेरियल संसर्गापासून अधिक व्यापक संरक्षण पुरविणारी अॅबॉटची १४ व्हॅलेन्ट न्युमोकॉक्कल कन्ज्युगेट लस (PCV-14) बाजारात दाखल

Shivani Shetty

Leave a Comment