मुंबई, ५ जुलै २०२४: टीमलीज सर्विसेस या भारतातील रोजगार, रोजगारक्षमता व व्यवसाय करण्यामधील सुलभता यामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या भारतातील आघाडीच्या स्टाफिंग समूहाने त्यांचा ‘कंझ्युमर ड्यूरेबल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स – ए स्टाफिंग परस्पेक्टिव्ह रिपोर्ट’ जारी केला. हा अहवाल देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राबाबत सर्वसमावेशक माहिती देतो. भारत जगातील झपाट्याने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान दृढ करत असताना देश २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ बनेल अशी अपेक्षा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या क्षेत्रातील कर्मचारीवर्ग लाभार्थींना सेवा देण्यासाठी, तसेच कार्यक्षमपणे शाश्वत विकास संपादित करण्यासाठी क्षेत्राच्या क्षमता वाढवण्यामध्ये महत्त्वाचे असतील. या अहवालामधून विविध टॅलेंटसाठी क्षेत्राच्या मागणी सुलभपणे व कार्यक्षमपणे पूर्ण करण्यामध्ये या कर्मचारीवर्गाची महत्त्वपूर्ण भूमिका निदर्शनास येते.
या अहवालाच्या माध्यमातून टीमलीज सर्विसेसने उच्च मागणी असलेल्या तात्पुरत्या पदांना निदर्शनास आणले, ज्यामध्ये इन-स्टोअर प्रमोटर्स, सर्विस टेक्निशियन्स, सुपरवायजर्स, सेल्स ट्रेनर्स, चॅनेल सेल्स एक्झिक्युटिव्ह्ज, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह्ज, वेअरहाऊस इन-चार्ज, टेलि-सपोर्ट एक्झिक्युटिव्ह्ज आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअर्स यांचा समावेश आहे, जे ग्राहकोपयोगी वस्तू व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. अहवालामधील सर्वसमावेशक बाजारपेठ विभाजन व आकार विश्लेषणामध्ये व्यापक ग्राहकोपयोगी वस्तूंचा समावेश आहे, जसे किचन अप्लायन्सेस, एलईडी लाइट्स व इलेक्ट्रिक फॅन्स सारखे लहान अप्लायन्सेस, एसी, रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्स सारखे मोठे अप्लायन्सेस आणि टीव्ही, मोबाइल फोन्स, कम्प्युटिंग डिवाईसेस व डिजिटल कॅमेरे यांसारख्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. उल्लेखनीय बाब म्हणजे एसी बाजारपेठ १५ टक्क्यांच्या सीएजीआर दराने २०२८ पर्यंत ५.८ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, तर मोबाइल फोन बाजारपेठ ६.७ टक्क्यांच्या सीएजीआर दराने २०२८ पर्यंत ६१.२ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
तात्पुरत्या कर्मचारीवर्गाच्या डेमोग्राफिक प्रोफाइलमधून निदर्शनास येते की, प्रामुख्याने सरासरी वय ३१ वर्ष आणि कार्यकाल २.८ वर्ष असलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांचे (९४ टक्के) प्रमाण जास्त आहे. यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे शिक्षण १२वी पेक्षा कमी आहे, म्हणून उत्पादकता वाढवण्याकरिता विशिष्ट कौशल्ये विकसित करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे.
टीमलीज सर्विसेसचा अहवाल सखोल भौगोलिक विश्लेषण देखील देते, ज्यामधून निदर्शनास येते की तात्पुरत्या कर्मचारीवर्गाचे सर्वाधिक प्रमाण प्रामुख्याने दक्षिण प्रांतामध्ये आहे. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व तेलंगणा ही तात्पुरत्या रोजगारांमध्ये सर्वोच्च वाढ निदर्शनास आलेली अव्वल पाच राज्ये आहेत. शहरी स्तरावर बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि मुंबई येथे तात्पुरत्या रोजगारांमध्ये वाढ निदर्शनास येते. हा अहवाल कम्पेन्सेशन ट्रेण्ड्सचे (नुकसान भरपाई ट्रेण्ड्स) देखील परीक्षण करतो, ज्यामधून मेट्रो शहरांमधील सर्वोच्च वार्षिक सीटीसी आणि द्वितीय श्रेणीच्या शहरांमधील सर्वोच्च सरासरी मासिक इन्सेंटिव्ह्जसह प्रांत व शहरांमधील सरासरी वार्षिक सीटीसी व इन्सेंटिव्ह्जमधील विविधता निदर्शनास येते.
अॅट्रिशन मोठे आव्हान आहे, जेथे अहवालामधून रिग्रेटेबल अॅट्रिशन (नोकरी सोडलेले २२ टक्के उच्च कामगिरी करणारे कर्मचारी) आणि नॉन-रिग्रेटेबल अॅट्रिशन (इन्सेंटिव्ह्ज न मिळवलेले ३१ टक्के कर्मचारी) यामधील फरक निदर्शनास येतो. १००० कर्मचारी असलेल्या कंपनीसाठी अॅट्रिशन खर्च अंदाजे ३.६४ कोटी रूपये आहे. १००० कर्मचारी असलेल्या कंपनीसाठी इन-शॉप प्रमोटर पदासाठी अॅट्रिशनमुळे खर्च अंदाजे ११८.६ कोटी रूपये आहे.
टीमलीज सर्विसेस येथील वरिष्ठ उपाध्यक्ष बालसुब्रमण्यम ए.म्हणाले, ”अॅट्रिशन प्रचलित समस्या आहे, जिचा कंपनीची क्षमता व विकास पैलूंवर मोठा परिणाम होऊ शकतो. आमच्या अहवालामधून मध्यम आकाराच्या कंपनीसाठी महसूलामधून नुकसानामुळे १०० कोटी रूपयांहून अधिक खर्च निदर्शनास येतो, ज्यामधून व्यवसायांनी या समस्येचे सक्रियपणे निराकरण करण्याची त्वरित गरज दिसून येते. अॅट्रिशनचे निराकरण करणे हा खर्च वाचवणारा उपाय असण्यासोबत आमच्या उत्पादन व रिटेल पॉवरहाऊसेसचा शाश्वत विकास आणि स्पर्धात्मकतेप्रती गुंतवणूक देखील आहे. तात्पुरत्या कर्मचारीवर्गाचे लक्ष वेधून घेण्यासोबत त्यांचे पालनपोषण करण्यासाठी आणि त्यांना कामावर टिकवून ठेवण्यासाठी टॅलेंट व्यवस्थापन धोरणांमध्ये नवीन बदल केले पाहिजेत.”
टीमलीज सर्विसेस लिमिटेडच्या स्टाफिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक नारायण म्हणाले, ”तात्पुरत्या कर्मचारीवर्गाच्या विशिष्ट गरजा व गतीशीलता जाणून घेणे ग्राहकोपयोगी वस्तू व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील शाश्वत विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाचे आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ म्हणून स्थान पक्के करत असताना कर्मचारीवर्ग सोल्यूशन्समध्ये नवीन बदल करण्याची मोठी संधी आहे. आमचा अहवाल व्यवसायांना स्टाफिंग धोरणे सानुकूल करण्यास मदत करण्यासाठी आणि कार्यरत कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृतीशील माहिती देतो, ज्यामुळे उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मार्ग सुलभ झाला आहे.”