maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सकडून कोलकातामध्‍ये अॅडवान्‍स्‍ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

कोलकाता, मे २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज कोलकातामध्‍ये त्‍यांचे रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्‍हीएसएफ) लाँच केले. हे कंपनीचे देशभरात लाँच करण्‍यात आलेले आठवे आरव्‍हीएसएफ आहे. ‘Re.Wi.Re. – रिसायकल विथ रिस्‍पेक्‍ट’ नाव असलेले हे अत्‍याधुनिक केंद्र प्रतिवर्ष जवळपास २१,००० एण्‍ड-ऑफ-लाइन वेईकल्‍सचे शाश्‍वतपणे व सुरक्षितपणे विघटन करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. टाटा मोटर्सची सहयोगी सेलेडेड सिनर्जीज इंडिया प्रा. लि. आरव्‍हीएसएफचे कार्यसंचालन आणि सर्व ब्रँड्सच्‍या दुचाकी व तीन-चाकींसह पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सच्‍या स्‍क्रॅपिंगची हाताळणी करण्‍यासाठी सुसज्‍ज आहे.

पश्चिम बंगाल सरकारचे माननीय परिवहन मंत्री श्री. स्‍नेहासिस चक्रवर्ती, इव्‍हेण्‍टमध्‍ये व्‍हर्च्‍युअली सामील झालेले कोलकाताचे महापौर व पश्चिम बंगाल सरकारचे माननीय शहरी विकास व नगरपालिका व्‍यवहार मंत्री श्री. फिरहाद हकिम, पश्चिम बंगाल सरकारच्‍या परिवहन विभागाचे सचिव आयएएस डॉ. सौमित्र मोहन आणि टाटा कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल यांच्‍यासह पश्चिम बंगाल सरकार व टाटा मोटर्सचे इतर मान्‍यवर यांनी उपस्थिती दाखवून उद्घाटन समारोहाची शोभा वाढवली. कंपनी आता जयपूर, भुवनेश्‍वर, सुरत, चंदिगड, दिल्‍ली एनसीआर, पुणे आणि गुवाहाटी येथे रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपेज केंद्रांचे कार्यसंचालन पाहते. कोलकातामधील केंद्र पूर्व भारतातील तिसरे Re.Wi.Re आहे, जे प्रांतातील ग्राहकांना सुलभ उपलब्‍धता देते.

या केंद्राचे उद्घाटन करत पश्चिम बंगाल सरकारचे माननीय परिवहन मंत्री श्री. स्‍नेहासिस चक्रवर्ती म्‍हणाले, ”टाटा मोटर्सच्‍या Re.Wi.Re चे उद्घाटन व्‍यक्‍तींसाठी शुद्ध व अधिक कार्यक्षम भविष्‍य घडवण्‍याच्‍या दिशेने स्‍वागतार्ह पाऊल आहे. हा उपक्रम नवीन, सुरक्षित, ऊर्जा-कार्यक्षम वेईकल्‍सच्‍या अवलंबतेला देखील पाठिंबा देईल आणि परिवहन क्षेत्रात चक्रिय अर्थव्‍यवस्‍था संधींची निर्मिती करेल. आम्‍ही आमच्‍या राज्‍यामध्‍ये हा उपक्रम आणण्‍यासाठी टाटा मोटर्स, सेलेडेल सिनर्जीज आणि सहभागी सर्व भागीदारांचे आभार व्‍यक्‍त करतो.”

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत कोलकाताचे महापौर, पश्चिम बंगाल सरकारचे माननीय शहरी विकास व नगरपालिका व्‍यवहार मंत्री श्री. फिरहाद हकिम म्‍हणाले, ”लाँच करण्‍यात आलेले टाटा मोटर्सचे आरव्‍हीएसएफ शाश्‍वत विकासाच्‍या दिशेने अर्थपूर्ण पाऊल आहे, जे आमच्‍या राज्‍यातील पर्यावरणीय भार कमी करण्‍यास आणि एकूण स्‍वास्‍थ्‍य सुधारण्‍यास मदत करेल. हे केंद्र राज्‍यासाठी बहुमूल्‍य रोजगार संधी निर्माण करेल. आम्‍ही आमच्‍या राज्‍यातील लोकांसाठी हे भविष्‍यसूचक पाऊल उचलण्‍यासाठी टाटा मोटर्सचे आभार मानतो.”

याप्रसंगी मत व्‍यक्‍त कर टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”टाटा मोटर्स शाश्‍वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याप्रती, तसेच चक्रिय अर्थव्‍यवस्‍थेला गती देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. पश्चिम बंगालमध्‍ये पहिले आणि देशातील आठव्या Re.Wi.Re केंद्राचे उद्घाटन आमची वेईकल स्‍क्रॅपिंग इकोसिस्‍टम विस्‍तारित करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे. टाटा मोटर्सच्‍या आठ आरव्‍हीएसएफमध्‍ये एकूण प्रतिवर्ष १.३ लाखांहून अधिक वेईकल्‍सचे विघटन करण्‍याच्‍या क्षमतेसह आम्‍हाला सुरक्षितता, अनुपालन आणि शाश्‍वततेवर लक्ष केंद्रित करत भारतातील वेईकल स्‍क्रॅपिंग इकोसिस्‍टममध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याचे नेतृत्‍व करण्‍याचा अभिमान वाटतो.”

प्रत्‍येक Re.Wi.Re केंद्र पूर्णत: डिजिटलाइज आहे आणि सर्व कार्यसंचालने विनासायास व पेपरलेस आहेत. हे केंद्र कमर्शियल वेईकल्‍स, दुचाकी व तीन-चाकींसाठी सेल-टाइप डिस्‍मॅन्‍टलिंग आणि पॅसेंजर वेईकल्‍ससाठी लाइन-टाइप डिस्‍मॅन्टलिंगसह (विघटन) सुसज्‍ज आहे. तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्‍स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्‍या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्‍टेशन्‍स आहेत. प्रत्‍येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन केलेल्‍या प्रखर डॉक्‍यूमेन्‍टेशन व विघटन प्रक्रियेमधून जाते. यामधून देशातील वेईकल स्‍क्रॅपेज धोरणानुसार सर्व घटकांचे सुरक्षित विघटन होण्‍याची खात्री मिळते. Re.Wi.Re. केंद्र ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्‍वत पद्धतींना चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण झेप आहे.

Related posts

सॅमसंगने भारतात गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवर विशेष किमतींसह उत्‍सवी आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर केली

Shivani Shetty

जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त व्हिसाच्‍या या टिप्‍ससह फायनान्शियल वेलनेस उत्तम ठेवा

Shivani Shetty

*खेतान अँड कं., मेकमायट्रिप आणि शार्दुल अमरचंद मंगलदास लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अनुक्रमे टॉप ३ स्‍थानावर* ● कायदा, तंत्रज्ञान, आरोग्‍यसेवा क्षेत्रांमधील कंपन्‍यांनी टॉप १५ स्‍थानांपैकी १० स्‍थान मिळवले आहेत. ● १५ पैकी १४ मिडसाइज कंपन्‍या मुंबई (४), दिल्‍ली-एनसीआर (४), हैदराबाद (३) आणि बेंगळुरू (३) येथील आहेत भारत, १५ एप्रिल २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज लिस्‍टचे अनावरण केले, ज्‍यामध्‍ये जगभरातील ५,०००० पेक्षा कमी कर्मचारी आणि भारतातील किमान २५० कर्मचारी असलेल्‍या, तसेच प्रोफेशनल्‍स त्‍यांचे करिअर घडवू शकतील अशा १५ कंपन्‍यांचा समावेश आहे. प्‍लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्‍सच्‍या एक्टीव्हिटीजच्‍या आधारावर ही लिस्‍ट या कंपन्‍यांमधील मागणीत असलेली कौशल्‍ये, टॉप लोकेशन्‍स आणि सर्वात मोठ्या जॉब फंक्‍शन्‍सबाबत माहिती देते, ज्‍यामुळे नोकरीसाधकांना त्‍यांच्‍या भावी संधीचा शोध घेण्‍यास मदत होते. प्रगती करण्‍याची क्षमता, कौशल्‍ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्‍डइनच्‍या आठ आधारस्‍तंभांमधील डेटामधून मिळवलेली ही लिस्‍ट स्‍पर्धात्‍मक रोजगार बाजारपेठेत टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करणाऱ्या आणि सक्रियपणे हायरिंग करणाऱ्या कंपन्‍यांना दाखवते. खेतान अँड कं. (Khaitan & Co) (#1) या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर मेकमायट्रिप (MakeMyTrip) (#2) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) (#3) यांचा क्रमांक आहे, ज्‍यामधून भारतभरात करिअर संधी निर्माण करण्‍यामध्‍ये कायदा व पर्यटन क्षेत्रांची क्षमता दिसून येते. ते वकील, कायदेशीर सहयोगी, खाते व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक यांसारख्या पदांसाठी हायर करत आहेत, ज्यामध्ये संवैधानिक कायदा, प्रवास व्यवस्थापन आणि महसूल विश्‍लेषण यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी आहे. मुंबई, गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर येथे या हायरिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍था‍पकीय संस्‍थापिका (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”या वर्षीची लिस्‍ट कंपन्‍यांमधील विकास संधींना प्रकाशझोतात आणते, जेथे टीम्‍स कमी आहेत, भूमिका व्‍यावहारिक आहेत आणि प्रत्‍यक्ष व्‍यवसाय प्रभाव घडवण्‍याची शक्‍यता भरपूर आहे. १५ कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांचे मुख्यालय मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहे. मुंबई व दिल्ली-एनसीआरमधील कायदा संस्था सक्रियपणे कायदेशीर टॅलेंटना नियुक्त करत आहेत, बेंगळुरूमध्‍ये सॉफ्टवेअर चाचणी व एआय अॅप्‍लीकेशन्‍स भूमिकांसाठी हायर केले जात आहे आणि हैदराबादमध्‍ये फार्मा, सेमीकंडक्टर आणि मीडिया ऑपरेशन्ससाठी मागणी वाढत आहे. डोमेन ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि प्रबळ संवाद व समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेले प्रोफेशनल्‍स या क्षेत्रांमध्ये काम करतील आणि त्यांना या मिडसाइज कंपन्यांमध्‍ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे.” या लिस्‍टमधून निदर्शनास येते की, मिडसाइज कंपन्‍या औषध शोध, आरोग्‍यसेवा तंत्रज्ञान व ग्राहक रिटेल अशा विभाग-संबंधित क्षेत्रांमध्‍ये करिअर संधी देत आहेत. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) (#4) जेनेटिक इंजीनिअरिंग व फार्मास्‍युटिकल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग कौशल्‍ये असलेल्या प्रोफेशनल्‍सना हायर करत आहे, तर ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) (#7) बायोमेडिकल इंजीनिअरिंग व सार्वजनिक आरोग्‍यामधील कौशल्‍याची आवश्‍यकता असलेल्‍या पदांवर लक्ष केंद्रित करते आहे. नायका (Nykaa) (#5) ब्‍युटी अॅडवायजर, ब्रँड मॅनेजर व शॉप मॅनेजर अशा पदांसह रिटेल, कॉस्‍मेटोलॉजी आणि कॉन्‍सेप्‍चुअर आर्टमध्‍ये संधी निर्माण करत आहे. लिंक्‍डइन लिस्‍टनुसार सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज (Sasken Technologies) (#9) आणि मॉसचिप (MosChip) (#13) यांसारख्‍या कंपन्‍या इंजीनिअरिंग व डिझाइनमध्‍ये करिअर घडवण्‍यास मदत करत आहेत. ते डिझाइन इंजीनिअर्स, एम्‍बेडेड सॉफ्टवेअर इंजीनिअर्स आणि सिस्‍टम इंजीनिर्सना हायर करत आहेत, जेथे सिग्‍नल प्रोसेसिंग, इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम्‍स आणि मोबाइल अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंटमधील कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. लिस्‍टमधील इतर कंपन्‍यांमध्‍ये जनसंपर्क, शिक्षण तंत्रज्ञान, ना-नफा तत्त्‍वावर आधारित सेवा आणि होम सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR) (#8), प्रदान (PRADAN) (#10), एक्सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) (#11) आणि अर्बन कंपनी (Urban Company) (#12) अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट व बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांसारख्या भूमिकांसाठी हायर करत आहेत. या कंपन्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, अॅक्टिव्ह लर्निंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉस्मेटोलॉजी कौशल्ये असलेल्या टॅलेंटला हायर करत आहेत. २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये प्रवेश मिळवलेल्‍या १५ कंपन्‍या पुढीलप्रमाणे: 1. खेतान अँड कं. (Khaitan & Co) 2. मेकमायट्रिप (MakeMyTrip) 3. शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) 4. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) 5. नायका (Nykaa) 6. सिरील अमरचंद मंगलदास (Cyril Amarchand Mangaldas) 7. ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) 8. अॅडफॅक्‍टर्स पीआर (Adfactors PR) 9. सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (Sasken Technologies Limited) 10. प्रोफेशनल असिस्‍टण्‍स फॉर डेव्‍हलपमेंट अॅक्‍शन (प्रदान) (Professional Assistance For Development Action (PRADAN)) 11. एक्‍सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) 12. अर्बन कंपनी (Urban Company) 13. मॉसचिप (MosChip®️) 14. मीडिया मिंट (MediaMint) 15. ट्रायकॉन इन्‍फोटेक (Tricon Infotech) लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप मिड-साइज कंपनीज इंडियावरील संपूर्ण लेख येथे पहा.

Shivani Shetty

Leave a Comment