maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी एस२४ एफई लाँच; आकर्षक ऑफरसाठी आजच प्री-बुक करा

भारत – ऑक्टोबर, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलॅक्‍सी एस२४ एफईच्‍या लाँचची घोषणा केली. अधिकाधिक वापरकर्त्‍यांना प्रीमियम मोबाइल अनुभव देणाऱ्या गॅलॅक्‍सी एआय इकोसिस्‍टममध्‍ये या नवीन स्‍मार्टफोनची भर करण्‍यात आली आहे.

 

एआय-आधारित प्रोव्हिज्‍युअल इंजिनची शक्‍ती आणि गॅलॅक्‍सी एआयचे फोटो असिस्‍ट वैशिष्‍ट्ये असलेल्‍या गॅलॅक्‍सी एस२४ एफईमध्‍ये सुधारित कॅमेरा सेटअप आहे, जे वापरकर्त्‍यांना अधिक क्रिएटिव्‍ह बनण्‍यास सक्षम करते. हा चालता-फिरता गेमिंगचा आनंद घेण्‍यासाठी परिपूर्ण डिवाईस आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये ६.७-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्‍प्‍ले, दीर्घकाळपर्यंत टिकणारी ४,७०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि शक्तिशाली एक्झिनॉस २४०० सिरीज चिपसेट आहे. गॅलॅक्‍सी एस२४ एफईमध्‍ये संवाद, उत्‍पादकता व सर्जनशीलता वाढवण्‍यासाठी प्रीमियम गॅलॅक्‍सी एआय टूल्‍स आणि इकोसिस्‍टम कनेक्‍टीव्‍हीटी आहे, जे आयकॉनिक डिझाइनमध्‍ये समाविष्‍ट आहे आणि शक्तिशाली सॅमसंग नॉक्‍स सिक्‍युरिटीद्वारे सुरक्षित आहेत.

 

एआय-एन्‍हान्‍स्‍ड कॅमेरा आणि एडिटिंग

गॅलॅक्‍सी एस२४ एफईच्‍या प्रीमियम कॅमेरा सेटअपमध्‍ये ५० मेगापिक्‍सल वाइड लेन्‍स आणि ८ मेगापिक्‍सल टेलिफोटो लेन्‍ससह ३x ऑप्टिकल झूम आहे, ज्‍यांना ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन (ओआयएस)चे पाठबळ आहे. तसेच १२ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड लेन्‍स आणि १० मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरा आहे.

एफई सिरीजमध्‍ये पदार्पण करणाऱ्या प्रोव्हिज्‍युअल इंजिनमध्‍ये व्‍यापक सुधारित तंत्रज्ञान आहे, जे प्रगत एआय अल्‍गोरिदम्‍सचा फायदा घेत उल्‍लेखनीय सुस्‍पष्‍टता आणि सर्वोत्तम टेक्‍स्‍चर्स देते.

• अंधुक प्रकाशात कार्यक्षमता सुधारण्‍यासाठी एआय इमेज सिग्‍नल प्रोसेसिंग (आयएसपी)सह नाइटोग्राफी आकर्षक नाइट पोर्ट्रेट्सची खात्री देते.

• २x झूमपासून ऑप्टिकल ३x झूमपर्यंत ऑप्टिकल-क्‍वॉलिटी कार्यक्षमता सक्षम करण्‍यासाठी वाइड कॅमेऱ्याच्‍या ५० मेगापिक्‍सल अॅडप्टिव्‍ह पिक्‍सल सेन्‍सरसोबत काम करते. एआय झूम डिजिटल झूम लांबींदरम्‍यान अंतर असताना देखील सुधारित इमेज क्‍वॉलिटी देते.

• सुपर हाय डायनॅमिक रेंज (एचडीआर)मध्‍ये सीन्‍स ओळखण्‍यासाठी आणि रंगांना ऑप्टिमाइज करण्‍यासाठी ऑब्‍जेक्‍ट-अवेअर इंजिन आकर्षक व वास्‍तविक फोटो व व्हिडिओंची खात्री देते.

 

फोटो एडिट करण्‍यासंदर्भात फोटो असिस्‍ट वैशिष्‍ट्ये त्‍या संकल्‍पनांना प्रत्‍यक्षात आणतात. गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज डिवाईसेसमध्‍ये सादर केल्‍यापासून गॅलॅक्‍सी एआय फोटो एडिट करण्‍यासाठी आणि सर्जनशीलता व्‍यक्‍त करण्‍यासाठी बहुमूल्‍य बनले आहे.

• जनरेटिव्‍ह एडिट ऑब्‍जेक्‍ट मूव्हिंग व रिमूव्‍हल क्षमतांच्‍या माध्‍यमातून अनोख्‍या सुविधा देते, ज्‍यामुळे अधिक क्रिएटिव्‍हीटी करता येते.

• पोर्ट्रेट स्‍टुडिओ सेल्‍फीजमध्‍ये कार्टून्‍स, कॉमिक्‍स, वॉटरकलर पेटिंग्‍ज किंवा स्‍केचेसची भर करण्‍याची सुविधा देत ऑनलाइन प्रोफाइल्‍सना अधिक आकर्षक करते.

• एडिट सजेशन्‍स एका बटनाच्‍या प्रेसमध्‍ये रिफ्लेक्‍शन्‍ससारख्‍या अडथळ्यांना त्‍वरित दूर करते.

• इन्‍स्‍टण्‍ट स्‍लो-मो जीवनातील प्रत्‍येक महत्त्वपूर्ण क्षणांना सुरेखरित्‍या कॅप्‍चर करते.

 

शक्तिशाली कार्यक्षमता

शक्तिशाली एक्झिनॉस २४०० सिरीज चिपसेट रे ट्रेसिंग सारख्‍या अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्यांशी सुसंगत तडजोड न करणारा गेमिंग अनुभव देते. स्‍पीड व कार्यक्षमता महत्त्वाचे बनले असलेल्‍या विश्‍वामध्‍ये गॅलॅक्‍सी एस२४ एफई विविध प्रमुख वैशिष्‍ट्यांचा वापर करत स्‍पर्धेमध्‍ये अग्रस्‍थानी आहे.

• १.१x लार्जर वेपर चेम्‍बर दीर्घकाळापर्यंत सर्वोच्‍च कार्यक्षमतेसाठी कूलिंगमध्‍ये सुधारणा करते.

• विशाल ४७०० एमएएच क्षमतेची बॅटरी दीर्घकाळपर्यंत कोणत्‍याही चिंतेशिवाय गेमिंगचा आनंद घेण्‍याची खात्री देते.

• एफई सिरीजमध्‍ये आतापर्यंत वापरण्‍यात आलेला सर्वात मोठा डिस्‍प्‍ले ६.७ इंच अॅडप्टिव्‍ह डायनॅमिक एएमओएलईडी २x डिस्‍प्‍लेसह जवळपास १२० हर्टझ रिफ्रेश रेट सुलभ व आकर्षक व्‍युइंग अनुभव देतो.

• व्हिजन बूस्‍टर सूर्यप्रकाशात सुस्‍पष्‍ट व आरामदायी गेमिंग अनुभवासाठी कलर आणि कॉन्‍ट्रास्‍ट सानुकूल करते.

 

गॅलॅक्‍सी एआय एक्‍स्‍पेरिअन्‍स

गॅलॅक्‍सी एस२४ एफईमध्‍ये गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजप्रमाणेच प्रगत एआय अनुभवाचा समावेश आहे. कामामध्‍ये सुधारणा करण्‍यसाठी, संवाद सोपे करण्‍यासाठी आणि कनेक्‍टीव्‍हीटी वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले एस२४ एफईवरील गॅलॅक्‍सी एआय टूल्‍स देते, जे नवीन शक्‍यतांना अनलॉक करते.

• गुगलसह सर्कल टू सर्च अनपेक्षितपणे उत्‍सुकतेची पूर्तता करते, जे होम बटनवर लाँग प्रेस आणि सर्कल करत त्‍वरित सर्च करणाऱ्या गोष्‍टी उपलब्‍ध करून देते.

• इंटरप्रीटर ऑफलाइन असताना देखील वैयक्तिक संवाद, लेक्‍चर्स किंवा कोणत्‍याही प्रकारच्‍या प्रेझेन्‍टेशन्‍सना त्‍वरित भाषांतरित करते.

• लाइव्‍ह ट्रान्‍सलेट फोन कॉल्‍सवरील संभाषणामधील अडथळ्यांना दूर करते आणि आता लोकप्रिय थर्ड-पार्टी अॅप्‍सच्या श्रेणीपर्यंत विस्‍तारित करण्यात आले आहे.

• सॅमसंग कीबोर्डमधील कम्‍पोजर ईमेल आणि सपोर्टेड सोशल मीडिया अॅप्‍ससाठी साध्‍या कीवर्डसवर आधारित सूचित मजकूर तयार करते.

• नोट असिस्‍ट नोट घेण्‍याची प्रक्रिया सोपी करते आणि आपोआपपणे फॉर्मेटिंग व भाषांतर करते. सॅमसंग नोट्समध्‍ये, तुम्‍हाला प्रत्‍यक्ष वॉइस रेकॉर्डिंग्‍जचे ट्रान्‍सक्रिप्‍शन, भाषांतर व सारांश मिळू शकते. पीडीएफ फाइल्‍समधील टेक्‍स्‍ट्स देखील पीडीएफ ओव्‍हरले ट्रान्‍सलेशनच्‍या माध्‍यमातून भाषांतरित व ओव्‍हरले करता येऊ शकतात.

 

सॅमसंग गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टम

गॅलॅक्‍सी एस२४ एफई सॅमसंगच्‍या विस्‍तृत मोबाइल इकोसिस्‍टमशी कनेक्‍ट केल्‍यास प्रत्‍येक गॅलॅक्‍सी एआय-एन्‍हान्‍स्‍ड अनुभव अधिक उपयुक्‍त ठरतो. ते विनासायासपणे फाइल्‍स ट्रान्‍सफर करते, त्‍वरित विस्‍तारित डिस्‍प्‍ले सेट अप करते आणि सर्वोत्तम इनपुट्सच्‍या माध्‍यमातून गुंतागूंतीच्‍या क्रिएटिव्‍ह संकल्‍पनांना सुलभ करते. या हायपर-कनेक्‍टेड सॅमसंग गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टममध्‍ये गॅलॅक्‍सी एस२४ एफई अनुभवांना सक्षम करते, जे उत्‍पादकता, सर्जनशीलता आणि कार्यक्षमतेमध्‍ये वाढ करतात.

 

एस सिरीजच्‍या नाविन्‍यपूर्ण वारसाला अधिक दृढ करत गॅलॅक्‍सी एस२४ एफई प्रबळ सुरक्षिततेसह सुधारित करण्‍यात आला आहे. सॅमसंग नॉक्‍स हा गॅलॅक्‍सीचे बहुस्‍तरीय सिक्‍युरिटी प्‍लॅटफॉर्म एण्‍ड-टू-एण्‍ड सिक्‍युअर हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्‍शन आणि कोलॅबोरेटिव्‍ह प्रोटेक्‍शनसह महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करण्‍यासोबत असुरक्षिततांपासून संरक्षण करतो.

 

एस२४ सिरीजच्‍या शाश्‍वत डिझाइनच्‍या परंपरेला कायम ठेवत गॅलॅक्‍सी एस२४ एफई प्‍लॅनेटच्‍या संसाधनांसंदर्भात कमी वापरासह अधिक कामगिरी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये विविध प्रकारचे रिसायकल मटेरिअल्‍स तसेच रिसायकल केलेले प्‍लास्टिक्‍स, अॅल्‍युमिनिअम, ग्‍लास आणि अंतर्गत व बाह्य घटकांमध्‍ये पृथ्‍वीवरील दुर्मिळ एलीमेंट्सचा समावेश आहे. तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये ओएस अपग्रेड्सच्‍या सात जनरेशन्‍स आणि सात वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स आहेत. हा स्‍मार्टफोन १०० टक्‍के रिसायकल केलेल्‍या पेपर मटेरिअलपासून बनवलेल्‍या पॅकेजिंग बॉक्‍समध्‍ये येतो.

 

उपलब्‍धता आणि किंमत

गॅलॅक्‍सी एस२४ एफई ब्‍ल्‍यू, ग्रॅफाईट आणि मिंट या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलॅक्‍सी एस२४ एफईसाठी प्री-बुकिंगला २७ सप्‍टेंबर २०२४ पासून सुरूवात होईल, ग्राहक Samsung.com आणि आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये गॅलॅक्‍सी एस२४ एफई प्री-बुक करू शकतात.

उत्‍पादन व्‍हेरिएण्‍ट्स रंग मूळ किंमत

गॅलॅक्‍सी एस२४ एफई ८ जीबी + १२८ जीबी ब्‍ल्‍यू, ग्रॅफाइट आणि मिंट ५९,९९९ रूपये

८ जीबी + २५६ जीबी ६५,९९९ रूपये

 

प्री-बुक ऑफर्स

उत्‍पादन ऑफर्स

गॅलॅक्‍सी एस२४ एफई गॅलॅक्‍सी एस२४ एफई प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ८ जीबी + २५६ जीबी स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये म्‍हणजेच फक्‍त ५९,९९९ रूपयांमध्‍ये मिळेल

+

४७९९ रूपयांचे सॅमसंग केअर + पॅकेज फक्‍त ९९९ रूपयांमध्‍ये

+

जवळपास १२ महिन्‍यांपर्यंत नो कॉस्‍ट ईएमआय (सॅमसंग फायनान्‍स+)

Related posts

चिल अॅट होम’ स्‍प्राइटकडून मोहिम लाँच

Shivani Shetty

वायू प्रदूषण आणि इन्‍फ्लूएन्‍झा: श्‍वसनविषयक आरोग्‍यावर देखरेख ठेवा

Shivani Shetty

जान्हवी कपूरने मुंबईमध्ये गोरेगावआणि वांद्रे येथे कल्याण ज्वेलर्सच्यादोन नवीन शोरूम्सचे उदघाटन केले

Shivani Shetty

Leave a Comment