maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून भारतात अल्‍ट्रा-फास्‍ट एआय-पॉवर्ड गॅलॅक्‍सी बुक ५ सिरीज पीसी लाँच

गुरूग्राम, भारत – मार्च ११, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज आपली नवीन एआय-पॉवर्ड पीसी लाइन अप – गॅलॅक्‍सी बुक५ प्रो, गॅलॅक्‍सी बुक५ प्रो ३६० आणि गॅलॅक्‍सी बुक५ ३६०च्‍या लाँचची घोषणा केली. एआय पीसींच्‍या नवीन श्रेणीमध्‍ये गॅलॅक्‍सी एआयच्‍या क्षमतेसह मायक्रोसॉफ्टचे कॉपीलॉट+ पीसी अनुभव आहे, ज्‍यामधून विनासायास उत्‍पादकता, सर्जनशीलता आणि सर्वोत्तम वर्कफ्लोची खात्री मिळते.
एआयची क्षमता
गॅलॅक्‍सी बुक५ सिरीज पहिल्‍यांदाच एआयसह येते. नवीन सिरीजमध्‍ये एआय कम्‍प्‍युटिंगसाठी न्‍यूरल प्रोसेसिंग युनिट (एनपीयू)सह गॅलॅक्‍सी एआय वैशिष्‍ट्ये आहेत, जसे एआय सिलेक्‍ट व फोटो रिमास्‍टर. गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवरील सर्कल टू सर्च विथ गुगलप्रमाणे असलेली वैशिष्‍ट्ये एआय सिलेक्‍ट त्‍वरित सर्च करण्‍याची सुविधा देते आणि सिंगल क्लिकमध्‍ये माहिती देते. फोटो रिमास्‍टर एआय-पॉवर्ड क्‍लेरिटी व शार्पनेससह फोटोमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करते.
सर्वोत्तम कार्यक्षमता
गॅलॅक्‍सी बुक५ सिरीजमध्‍ये इंटेल®️ कोअर™️ अल्‍ट्रा प्रोसेसर्स (सिरीज २)ची शक्‍ती आहे, ज्‍यामध्‍ये जवळपास ४७ टीओपीएस (टेरा ऑपरेशन्‍स पर सेकंड)चे शक्तिशाली एनपीयू आहेत, तसेच सुधारित ग्राफिक्‍स कार्यक्षमतेसाठी जीपीयूमध्‍ये १७ टक्‍के वाढ आणि सिंगल-कोअर कार्यक्षमतेसाठी सीपीयूमध्‍ये १६ टक्‍के वाढ करण्‍यात आली आहे. इंटेल एआय बूस्‍ट असलेली गॅलॅक्‍सी बुक५ सिरीज उच्‍च-स्‍तरीय परफॉर्मन्‍स, सुरक्षितता व कार्यक्षमता देते. लुनार लेकचे रिडिझाइन केलेले सीपीयू-जीपीयू सेटअप, अपग्रेडेड एनपीयू आणि नेक्‍स्‍ट-जनरेशन बॅटलमेज जीपीयू एआय कम्‍प्‍यूट पॉवरमध्‍ये तिप्‍पट बूस्‍ट देते, परिणामत: मागील जनरेशन्‍सच्या तुलनेत एसओसी ऊर्जा वापरामध्‍ये ४० टक्‍के घट झाली आहे, ज्‍यामुळे स्‍मार्टर वर्कफ्लो, विनासायास मल्‍टीटास्किंग आणि विस्‍तारित बॅटरी क्षमतेची खात्री मिळते.
व्‍याप‍क बॅटरी क्षमता
गॅलॅक्‍सी बुक५ सिरीज लाइन-अप सुपर-फास्‍ट चार्जिंगसह जवळपास २५ तासांपर्यंत कार्यरत राहत सुधारित बॅटरी देते. गॅलॅक्‍सी बुक५ प्रोमध्‍ये ३० मिनिटांमध्ये ४१ टक्‍के चार्ज होण्‍याची क्षमता आहे.
मायक्रोसॉफ्ट कॉपीलॉट+
गॅलॅक्‍सी बुक५ मध्‍ये अधिक उत्‍पादकतेसाठी ऑन-डिवाईस मायक्रोसॉफ्ट कॉपीलॉट+ असिस्‍टण्‍सची भर करण्‍यात आली आहे, तसेच समर्पित की देखील आहे, ज्‍यामुळे क्षणात एआय-पॉवर्ड असिस्‍टण्‍स मिळते. विंडोज ११ आणि दैनंदिन टास्‍क्‍सना कॉन्‍टेक्‍स्‍चुअल इंटेलिजन्‍समध्‍ये बदलणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या एआय-सुधारित कॉपीलॉट+ अनुभवासह एकीकृत ही सिरीज राइटिंग, रिसर्च, शेड्यूलिंग व प्रेझेन्‍टेशन्‍स अशा विविध टास्‍क्‍ससाठी सर्वोत्तम असिस्‍टण्‍स देते.
सर्वोत्तम मनोरंजन
काम व मनोरंजनामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या गॅलॅक्‍सी बुक५ सिरीजच्‍या प्रो मॉडेल्‍समध्‍ये डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्‍प्‍ले आहे, जो ३के रिझॉल्‍यूशन, १२० हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्‍टर तंत्रज्ञान देतो, ज्‍यामुळे कोणत्‍याही प्रकाशामध्ये आकर्षक फोटो कॅप्‍चर करता येतात. सर्वोत्तम अनुभवासाठी डॉल्‍बी अॅटमॉस असलेले क्‍वॉड स्‍पीकर्स सुस्‍पष्‍ट व विशाल साऊंड देतात, जे मनोरंजन व व्‍यावसायिक वापरासाठी परिपूर्ण आहे.
तसेच, मल्‍टी-डिवाईस कनेक्‍टीव्‍हीटीमध्‍ये फोन लिंक, क्विक शेअर, मल्‍टी-कंट्रोल आणि सेकंड स्क्रिन यांसारखी वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍या गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स व टॅब्‍लेट्समध्‍ये कार्यक्षमपणे काम करू शकतात. तसेच, सॅमसंग नॉक्‍स सुरक्षित व सहयोगात्‍मक गोपनीयतेची खात्री देते.
किंमत, उपलब्‍धता आणि प्री-बुक ऑफर्स
इंटेल अल्‍ट्रा असलेले गॅलॅक्‍सी बुक५ प्रोची किंमत ११४९०० रूपयांसह सुरू होते, जी मागील जनरेशनच्‍या तुलनेत १५००० रूपयांनी कमी आहे. प्री-बुक ऑफर्सचा भाग म्‍हणून गॅलॅक्‍सी बुक५ प्रो, गॅलॅक्‍सी बुक५ ३६० आणि गॅलॅक्‍सी बुक५ प्रो ३६० प्री-बुक करणारे ग्राहक फक्‍त २९९९ रूपयांमध्‍ये (मूळ किंमत १९९९९ रूपये) गॅलॅक्‍सी बड्स३ प्रो मिळवू शकतात.
ग्राहक आजपासून Samsung.com, सॅमसंग इंडिया स्‍मार्ट कॅफेज आणि निवडक सॅमसंग अधिकृत रिटेल स्‍टोअर्स व इइतर ऑनलाइन पोर्टल्‍सवर गॅलॅक्‍सी बुक५ ३६०, गॅलॅक्‍सी बुक५ प्रो आणि गॅलॅक्‍सी बुक५ प्रो ३६० प्री-बुक करू शकतात. गॅलॅक्‍सी बुक५ सिरीज लाइनअप भारतात २० मार्च २०२५ पासून Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स, आघाडीचे ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर आणि प्रमुख रिटेल सहयोगींकडे उपलब्‍ध असेल.
Specs Galaxy Book5 Pro
(14-inch) Galaxy Book5 Pro 360
(16-inch) Galaxy Book5 360
(15-inch)
Display 14” 3K AMOLED, 120Hz 16” 3K AMOLED, 120Hz 15.6” FHD AMOLED, 60Hz
Processor Intel Core Ultra 7/5 Intel Core Ultra 7/5 Intel Core Ultra 7/5
Graphics Intel Arc Graphics Intel Arc Graphics Intel Arc Graphics
Memory 16GB / 32GB 16GB / 32GB 16GB / 32GB
Storage 256GB / 512GB / 1TB 256GB / 512GB / 1TB 256GB / 512GB / 1TB
Battery 63.1Wh 76.1Wh 68.1Wh
Audio Quad speakers,
Dolby Atmos Quad speakers,
Dolby Atmos Stereo speakers,
Dolby Atmos
Weight 1.23 kg 1.56 kg 1.46 kg
OS Windows 11 Windows 11 Windows 11
Camera 2MP (1080p FHD) 2MP (1080p FHD) 2MP (1080p FHD)
Starting Price [INR] 131990 155990 114990

Related posts

जनजागृतीच्या माध्यमातून गुन्हेगारी रोखण्यावर चर्चा

Shivani Shetty

कोटक – जीओक्‍यूआयआय स्‍मार्ट व्‍हायटल प्‍लस स्‍मार्टवॉच लाँच

Shivani Shetty

द बॉडी शॉपचे लिमिटेड एडिशन ख्रिसमस कलेक्‍शन

Shivani Shetty

Leave a Comment