मुंबई, ७ ऑक्टोबर २०२४: इंडिया एज्युकेशन फोरम आणि इंडिया एम्प्लॉयर फोरम यांच्याद्वारे सह-प्रस्तुत मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अँड अवॉर्डस (एमआयईसीए) २०२४चे मुंबईत यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रायोजक टीमलीज एडटेकला भारतातील रोजगार अजेंडाबाबत चर्चेला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचा अभिमान वाटत आहे. या पुरस्कार सोहळ्याला शिक्षण, उद्योग व स्किलिंग क्षेत्रांमधील ८० हून अधिक प्रभावी प्रमुख व व्यावसायिकांसोबत दिग्गज जसे पद्मविभुषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, सिम्बायोसिसचे दूरदर्शी संस्थापक व अध्यक्ष पद्मभूषण डॉ. एस. बी. मुजुमदार, मेरिको लिमिटेड व काया लिमिटेडचे अध्यक्ष श्री. हर्ष मारीवाला, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयचे सचिव श्री. अतुल कुमार तिवारी उपस्थित होते.
टीमलीज एडटेकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु रूज म्हणाले, ”एमआयईसीए २०२४ मधून सहयोगात्मक नाविन्यतेसाठी गरज दिसून येते. रोजगारक्षमतेचे भविष्य सहयोगात्मक प्रयत्नांमध्ये आहे आणि आज हे पुरस्कार परिवर्तनात्मक बदल घडवून आणणाऱ्यांना सन्मानित करतात. टीमलीज एडटेकला भारतातील तरूणांना सक्षम करणाऱ्या आणि कर्मचारीवर्गाला आकार देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचा अभिमान वाटतो.”
यंदाच्या आवृत्तीची थीम ‘द पॉवर ऑफ द इकोसिस्टम’ होती, जेथे रोजगारक्षमता व शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट्स आणि सरकारकडून आवश्यक असलेल्या सहयोगात्मक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या इव्हेण्टने १५० हून अधिक व्यक्ती आणि कंपन्यांना भारतातील कर्मचारीवर्गाला अपस्किल करण्याप्रती, तसेच देशातील तरूणांच्या भविष्याला आकार देण्याप्रती त्यांच्या उल्लेखनीय योगदानांकरिता सन्मानित केले.
एमआयईसीएच्या २०२४ आवृत्तीने भारतातील स्किलिंग इकोसिस्टमला चालना देणारे विचारवंत आणि चेंजमेकर्सना सन्मानित केले. हे पुरस्कार सर्वोत्तम व्यक्तींना देण्यात आले आहेत, ज्यांनी मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल म्हणजेच भारतीयांना रोजगारक्षम बनवण्याच्या ध्येयाप्रती योगदान दिले.
पद्मविभुषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर म्हणाले, ”शिक्षण पुरेसे नाही, त्यासोबत संधी देखील आवश्यक आहे. शिक्षणासोबत भविष्य घडते, पण सर्वांगीण शिक्षण आणि उत्तम संधीसह भविष्याला योग्य आकार देखील मिळतो. उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षण, उद्योग व सरकार या इकोसिस्टमला चालना देणे आवश्यक आहे. त्यांनी एकत्रितपणे काम केल्यास भारतीय टॅलेंटमधील व्यापक क्षमता अनलॉक होऊ शकतात, शाश्वत करिअर घडू शकतात आणि आपल्या देशाच्या विकासाला चालना मिळू शकते.”