मुंबई, ४ मार्च २०२४: इकोफाय या भारतातील आघाडीच्या निवासी सोलार फायनान्शियरने एक वर्षाच्या कार्यसंचालनांनंतर महत्त्वाचा टप्पा संपादित केला आहे, जेथे प्रभावी ४,००० हून अधिक सक्रिय निवासी सोलार ग्राहक आणि १५,००० हून अधिक चौकशी संपादित करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक फायनान्सिंग सोल्यूशन्सच्या माध्यमातून सौर ऊर्जा अवलंबतेला गती देण्याप्रती स्थिर कटिबद्धता दाखवत इकोफाय उद्योगामधील प्रमुख कंपनी ठरली आहे.
कंपनीचा प्रभाव १० हून अधिक राज्यांवर दिसून आला आहे, तसेच ३०० हून अधिक ईपीसी इन्स्टॉलर्ससोबतच्या सहयोगांसह अधिक प्रबळ झाला आहे, ज्यामुळे कंपनीच्या भौगोलिक पोहोचमध्ये वाढ झाली आहे. या धोरणात्मक सहयोगांमध्ये टाटा पॉवर सोलार, यूपीएनईडीए (उत्तरप्रदेश सरकार), महिंद्रा सोलाराइज अशा उद्योगामधील मोठ्या कंपन्यांसोबतच्या उल्लेखनीय सहयोगांचा समावेश आहे.
इकोफायने भारतातील सोलार रूफटॉप इन्स्टॉलेशन्ससाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरकारचे १ कोटी घरांमध्ये इन्स्टॉलेशन्स करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य, तसेच अनुकूल धोरणे, सबसिडीज आणि ग्राहकांमध्ये वाढती जागरूकता यामुळे बाजारपेठ क्षमता ५०,००० कोटी रूपयांपर्यत पोहोचली आहे, जेथे फायनान्सिंग बाजारपेठेचा २० टक्क्यांचा वाटा आहे.
इकोफायच्या सह-संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री नाम्बियार म्हणाल्या, ”एक वर्षाच्या कार्यसंचालनामध्ये इकोफायने सोलार फायनान्सिंग क्षेत्राला नवीन आकार दिला आहे, ज्यामुळे हजारो घरे सक्षम झाली आहेत. आमचे धोरणात्मक सहयोग, नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स आणि शाश्वततेप्रती अविरत कटिबद्धतेने आम्हाला भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित केले आहे, जेथे हरित ऊर्जा फक्त पर्याय नसून परिवर्तनात्मक स्रोत असेल. इकोफाय फक्त सोलारला अर्थसाह्य करत नसून शाश्वत भविष्याप्रती अर्थसाह्य करत आहे.”