maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्स लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफरिंग गुरुवार, 19 डिसेंबर 2024 पासून सुरू

Concord 1: (L-R)*
1. Mr. Tanmay Jagdale, Associate Vice President , Motilal Oswal Investment Advisors Limited
2. Mr. Prayas Goel, Chairman and Managing Director, Concord Enviro Systems Limited
3. Mr. Prerak Goel, Executive Director, Concord Enviro Systems Limited
4. Mr. Hiren Raipancholia , Director , Equirus Capital Private Limited.

 

 

राष्ट्रीय, 16 डिसेंबर 2024: कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्स लिमिटेड (“CESL” or “The Company”) ने गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

प्रमुख गुंतवणूकदाराची बोली सुरू होण्याची आणि बंद होण्याची तारीख बुधवार, 18 डिसेंबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. (“Bid Details”)

 

प्रति इक्विटी शेअरसाठी 665 रुपये ते 701 रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा (“Price Band”) निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 21 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 21 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Bid Lot”).

 

कंपनी निव्वळ उत्पन्नाचा उपयोग पुढील गोष्टींसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते: (i) आपल्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनी, कॉनकॉर्ड एन्व्हायरो FZE (“CEF”)मध्ये गुंतवणूक. त्याचा उद्देश ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी भांडवली खर्चाच्या गरजांसाठी निधी पुरविणे आहे. या प्रकल्पाद्वारे पाणी, सांडपाणी आणि संबंधित मेम्ब्रेन मॉड्युल्सच्या प्रक्रियेसाठी यंत्रणा व प्रकल्प एकत्र करण्यासाठी असेंब्ली युनिट विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे 250 दशलक्ष रु. [25.00 कोटी रु.] खर्च अपेक्षित आहे; (ii) आपल्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनी, रॉकेम सेपरेशन सीस्टिम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (“RSSPL”) मध्ये गुंतवणूक. त्याचा उद्देश ब्राउनफिल्ड प्रकल्पासाठी भांडवली खर्चाच्या गरजांसाठी निधी पुरविणे आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादन सुविधा, साठवणूक आणि सहायक क्रिया विस्तारण्यात येणार आहेत. त्यासाठी अंदाजे 105.05 दशलक्ष रु. [10.50 कोटी रु.] खर्च अपेक्षित आहे. (iii) कंपनीच्या भांडवली खर्चाच्या गरजांसाठी, प्रकल्प व यंत्रसामग्री खरेदीसाठी अंदाजे 32.07 दशलक्ष रु. [3.21 कोटी रु.] निधी पुरविणे;

(iv) आपल्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनी, CEF मध्ये गुंतवणूक. त्याचा उद्देश CEF कडून घेतलेल्या विशिष्ट थकबाकी असलेल्या कर्जांच्या पूर्ण किंवा अंशतः आगाऊ परतफेडीसाठी किंवा परतफेडीसाठी अंदाजे 500 दशलक्ष रु. [50.00 कोटी रु.] निधी पुरविणे;

(v) CEF च्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी अंदाजे 200 दशलक्ष रु. [20.00 कोटी रु.] निधी पुरविण्यासाठी CEF मध्ये गुंतवणूक;

(vi) कंपनीचा पे पर यूज / पे अॅज यू ट्रीट व्यवसाय वाढविण्यासाठी आपली संयुक्त कंपनी Roserve Enviro Private Limited मध्ये अंदाजे 100 दशलक्ष रु. [10.0 कोटी रु.] गुंतवणूक.

(vii) नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी तंत्रज्ञान व अन्य विकास उपक्रमांमध्ये अंदाजे 235 दशलक्ष रु. [23.50 कोटी रु.]ची गुंतवणूक, तसेच उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरणे. (“ऑफरचे उद्देश”).

 

या ऑफरमध्ये 1,750.00 दशलक्षपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू समाविष्ट आहेत, तसेच विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये AF होल्डिंग्स (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) यांच्याकडून 4,186,368 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रयास गोयल यांच्याकडून 150,600 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रेरक गोयल यांच्याकडून 150,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (प्रयास गोयल यांच्यासह मिळून “प्रवर्तक विक्री समभागधारक”), पुष्पा गोयल यांच्याकडून 92,420 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, निधी गोयल यांच्याकडून 31,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि नम्रता गोयल यांच्याकडून 29,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (पुष्पा गोयल, निधी गोयल यांच्यासह “प्रवर्तक समूह विक्री समभागधारक” आणि गुंतवणूकदार विक्री समभागधारक, प्रवर्तक विक्री समभागधारक मिळून “विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे.

 

हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या 14 डिसेंबर 2024 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर करण्यात येत असून, महाराष्ट्रामधील मुंबई येथे कंपनी नोंदणी कार्यालय (ROC) येथे दाखल करण्यात आला आहे.

 

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव असून, एक्स्चेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” together with BSE, the “Stock Exchanges”) आहेत. ऑफरच्या उद्देशासाठी नियुक्त स्टॉक एक्स्चेंज हे BSE असेल. (The “Listing Details”)

मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. (The “BRLMs”).

 

येथे वापरल्या गेलेल्या, परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपीमध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

 

सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस (रेग्युलेशन) नियम 1957च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार (the “SCRR”) आणि 2018 च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जाहीर करण्यात आली असून, त्या अंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्त्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किमतीइतक्या किंवा अधिक किमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”). ऑफर प्राइस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शांपैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

 

त्याचप्रमाणे, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात, त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उपश्रेणीतील सबस्क्राइब नसलेला भाग दुसऱ्या इतर उपश्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. पुढे सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार, ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रियेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशिलासाठी 501 पानावरील “ऑफर प्रोस्युजर” बघा.

Disclaimer:

CONCORD ENVIRO SYSTEMS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the RHP dated December 14, 2024 with RoC. The RHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.concordenviro.in and the website of the BRLMs i.e. Motilal Oswal Investment Advisors Limited and Equirus Capital Private Limited at www.motilaloswalgroup.com and www.equirus.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see the section entitled “Risk Factors” on page 31 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (“U.S. Securities Act”) or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Security Act and applicable U. S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in “offshore transactions” as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made. There will be no public offering in the United States.

This is a public announcement for information purposes only. This is not a prospectus announcement and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities.

 

Related posts

किया इंडियाने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये नवीन ईव्ही६ सादर केली

Shivani Shetty

‘मिला ब्‍युटी’ लाँचसाठी साहिल नायर यांचा धोरणात्‍मक सहयोग

Shivani Shetty

अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी १४ महिन्यांची मुलगी केनियातून नवी मुंबईत

Shivani Shetty

Leave a Comment