नवी दिल्ली, ४ मार्च २०२५: भारताच्या २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन संपादित करण्याच्या दृष्टिकोनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेत टाटा मोटर्स या देशातील पहिल्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने पहिल्यांदाच हायड्रोजन-संचालित हेवी-ड्युटी ट्रक्सच्या चाचण्यांचे आयोजन केले. शाश्वत लांब पल्ल्यापर्यंतच्या सामान वाहतूकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या या ऐतिहासिक चाचणीला माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, माननीय केंद्रीय नवीन व अक्षय ऊर्जा मंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवला.टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ यांच्यासह भारत सरकार व दोन्ही कंपन्यांमधील इतर प्रतिष्ठित प्रतिनिधी उपस्थित होते.
या अग्रगण्य उपक्रमाच्या माध्यमातून भारताच्या व्यापक हरित ऊर्जा उद्दिष्टांशी सुसंगत राहत टाटा मोटर्सची शाश्वत गतिशीलता सोल्यूशन्समध्ये अग्रस्थानी राहण्याप्रती कटिबद्धता दिसून येते. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनअंतर्गत नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाने निधीसाह्य केलेल्या या चाचणीसाठी त्यांना निविदा देण्यात आली. लांब पल्ल्याच्या वाहतुकीकरिता हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराच्या वास्तविक विश्वात व्यावसायिक व्यवहायर्तचे मूल्यांकन करण्यासाठी, तसेच त्यांच्या विनासायास कार्यसंचालनासाठी आवश्यक सक्षम पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
चाचणीचा टप्पा २४ महिन्यांपर्यंत चालेल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन व पेलोड क्षमता असलेल्या १६ प्रगत हायड्रोजन-संचालित वाहनांचा समावेश असेल. आधुनिक हायड्रोजन इंटर्नल कम्बशन इंजिन (H2-ICE) आणि फ्युएल सेल (H2-FCEV) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या ट्रक्सची चाचणी भारतातील सर्वात प्रमुख मालवाहतूक मार्गांवर केली जाईल, ज्यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर, सुरत, वडोदरा, जमशेदपूर आणि कलिंगनगरचा समावेश आहे.
या चाचणीला हिरवा झेंडा दाखवत भारत सरकारचे माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, “हायड्रोजन हे भावी इंधन आहे, ज्यामध्ये उत्सर्जन कमी करून आणि ऊर्जा स्वावलंबन वाढवून भारताच्या वाहतूक क्षेत्रात परिवर्तन करण्याची व्यापक क्षमता आहे. अशा उपक्रमांमुळे हेवी-ड्युटी ट्रकिंगमध्ये शाश्वत गतिशीलता आणण्याला गती मिळेल आणि आपण कार्यक्षम, कमी कार्बन उत्सर्जन भविष्याच्या समीप पोहोचू. मी हायड्रोजन-संचालित हरित व स्मार्ट वाहतूक सक्षम करण्याच्या दिशेने या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये पुढाकार घेतल्याबद्दल टाटा मोटर्सचे अभिनंदन करतो.”
भारत सरकारचे माननीय केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री श्री. प्रल्हाद जोशी म्हणाले, “शाश्वत आणि शून्य-कार्बन भविष्याकडे भारताच्या परिवर्तनासाठी हायड्रोजन हे महत्त्वाचे इंधन आहे. या चाचणीची सुरुवात ही भारताच्या वाहतूक क्षेत्राचे डीकार्बोनायझेशन करण्यात ग्रीन हायड्रोजनची क्षमता दाखवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशनचा भाग असलेल्या या उपक्रमामधून नाविन्यतेला चालना देण्याप्रती आणि भारताच्या ऊर्जा स्वावलंबीत्व उद्दीष्टांना संपादित करण्याप्रती, तसेच जागतिक हवामान ध्येयांमध्ये योगदान देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. मी या अग्रगण्य प्रयत्नांमध्ये पुढाकार घेतल्याबद्दल टाटा मोटर्सचे कौतुक करतो.”
टाटा मोटर्सच्या तयारीबाबत सांगताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले, “टाटा मोटर्सला भारताच्या हरित, स्मार्ट आणि शाश्वत गतिशीलतेप्रती परिवर्तनामध्ये अग्रस्थानी असण्याचा खूप अभिमान वाटतो. राष्ट्र-उभारणीप्रती दीर्घकाळापासून कटिबद्ध असलेली कंपनी म्हणून आम्ही भारताच्या वाढ आणि विकासात योगदान देणारे गतिशीलता सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी सतत नाविन्यतेचा अवलंब केला आहे. आज, या हायड्रोजन ट्रक चाचण्या सुरू झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी स्वच्छ, शून्य उत्सर्जन ऊर्जेकडे परिवर्तनाचे नेतृत्व करून आम्हाला हा वारसा पुढे नेण्याचा अभिमान वाटतो. हे ध्येय शक्य करण्यासाठी आम्ही भारत सरकारचे त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल आभार व्यक्त करतो आणि उत्तम परफॉर्मन्स व कार्यक्षमता प्रदान करणारे शाश्वत, भविष्यासाठी सुसज्ज गतिशीलता सोल्यूशन्स निर्माण करण्यामध्ये आमची भूमिका बजावण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
हिरवा झेंडा दाखवण्यात आलेल्या या वेईकल्समधून टाटा मोटर्सचा हायड्रोजन मोबिलिटीप्रती व्यापक दृष्टिकोन दिसून येतो, ज्यामध्ये हायड्रोजन इंटर्नल कम्बशन इंजिन (H2ICE) आणि हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) तंत्रज्ञानांचा समावेश आहे. यामध्ये दोन टाटा प्राइमा एच.५५५ प्राइम मूव्हर्सचा समावेश आहे – एकामध्ये H2IC ची शक्ती आहे आणि दुसऱ्यामध्ये एफसीईव्हीची शक्ती आहे. यासह टाटा प्राइमा एच.२८ हा प्रगत H2ICE ट्रक देखील आहे. ३०० किमी ते ५०० किमीच्या ऑपरेशनल रेंजसह हे ट्रक्स शाश्वत, किफायतशीर आणि उच्च-कार्यक्षमतेच्या वाहतुकीसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. प्रीमियम प्राइमा केबिन आणि प्रगत ड्रायव्हर-असिस्ट सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली हे ट्रक्स ट्रकिंगमध्ये सुरक्षिततेसाठी नवीन मापदंड स्थापित करत ड्रायव्हरला अधिक आरामदायीपणा देतात, ड्रायव्हिंगमुळे येणारा थकवा कमी करतात आणि उत्पादकता सुधारतात.
टाटा मोटर्स बॅटरी इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी, हायड्रोजन इंटर्नल कम्बशन आणि हायड्रोजन फ्यूएल सेल अशा पर्यायी इंधन तंत्रज्ञानांची शक्ती असलेले नाविन्यपूर्ण गतीशीलता सोल्यूशन्स विकसित करण्यामध्ये अग्रस्थानी आहे. कंपनीचा लहान व्यावसायिक वाहने, ट्रक्स, बसेस आणि व्हॅन्स अशा विविध विभागांमध्ये पर्यायी-इंधनाची शक्ती असलेल्या व्यावसायिक वाहनांचा प्रबळ पोर्टफोलिओ आहे. कंपनीने १५ हायड्रोजन एफसीईव्ही बसेसची निविदा जिंकली होती आणि या बसेस यशस्वीरित्या भारतातील रस्त्यांवर ड्राइव्ह केल्या जात आहेत.
