गुरूग्राम, भारत – जून २७, २०२४: सॅमसंगने आज घोषणा केली की, कंपनी १० जुलै रोजी जागतिक लाँच इव्हेण्टमध्ये न्यू जनरेशन गॅलॅक्सी झेड स्मार्टफोन्स व इकोसिस्टम डिवाईसेस लाँच करणार आहे. पॅरिसमध्ये गॅलॅक्सी अनपॅक्ड इव्हेण्टचे आयोजन करण्यात येणार आहे, जेथे प्रतिष्ठित सांस्कृतिक नेक्सस व ट्रेण्ड एपिकसेंटर आमच्या नवीन अत्याधुनिक इनोव्हेशन्सच्या लाँचसाठी परिपूर्ण गंतव्य बनेल, असे सॅमसंगने एका निवेदनामध्ये सांगितले.
“गॅलॅक्सी एआयचे भावी फ्रण्टीयर येत आहेत. गॅलॅक्सी एआयच्या क्षमतेचा अनुभव घेण्यास सज्ज राहा, या क्षमता आता नवीन गॅलॅक्सी झेड सिरीज आणि संपूर्ण गॅलॅक्सी इकोसिस्टममध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. संभाव्यतांच्या विश्वाचा अनुभव घेण्यास सज्ज राहा, जेथे आम्ही मोबाइल एआयच्या नवीन टप्प्यामध्ये प्रवेश करत आहोत,” असे कंपनीने सांगितले.
सॅमसंगच्या ग्लोबल अनपॅक्डसाठी आमंत्रण देण्यापूर्वी कंपनीच्या प्रमुख कार्यकारींपैकी एक कार्यकारी म्हणाले की, सॅमसंग नवीन व अद्वितीय एआय अनुभव देण्यासाठी आगामी फोल्डेबल डिवाईसेसकरिता गॅलॅक्सी एआय अनुभव ऑप्टिमाइज करेल.
“आमचे फोल्डेबल्स सॅमसंग गॅलॅक्सीमधील सर्वात वैविध्यपूर्ण व स्थिर फॉर्म फॅक्टर आहेत आणि गॅलॅक्सी एआयसोबत एकत्रित केले असता हे दोन्ही पूरक तंत्रज्ञान सर्व नवीन शक्यतांना अनलॉक करतील,” असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मोबाइल आरअँडडीचे प्रमुख वोन-जून चोई म्हणाले.
नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स व्यतिरिक्त सॅमसंग १० जुलै रोजी गॅलॅक्सी अनपॅक्ड इव्हेण्टमध्ये नवीन वीअरेबल डिवाईसेसची घोषणा करण्याची अपेक्षा आहे, असे विश्लेषकांनी सांगितले.