maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

लेनदेनक्‍लबची ‘लेण्डिंग स्‍टोरी’ – जेथे प्रेम व कर्ज एकत्र येते! लेनदेनक्‍लबची नवीन मोहिम सामान्‍य क्षणांमध्‍ये मजेदार ट्विस्‍टची भर करते, तसेच दाखवून देते की दैनंदिन कमाई जीवनातील साधारण दिवसांना अत्‍यंत खास बनवू शकते

मुंबई, 31ऑक्‍टोबर 2025: लेनदेनक्‍लब या भारतातील आघाडीच्‍या पीअर-टू-पीअर (पी२पी) लेण्डिंग प्‍लॅटफॉर्मने आपली नवीन ब्रँड जाहिरात ‘लेण्डिंग स्‍टोरी’ लाँच केली आहे. ही मोहिम निदर्शनास आणते की प्‍लॅटफॉर्मवरील दैनंदिन कमाई वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना कर्जांमधून नियमित रोखप्रवाहाच्‍या माध्‍यमातून आर्थिक स्थिरतेचा अनुभव घेण्‍यास सक्षम करते.
ही डिजिटल जाहिरात पती-पत्‍नीमधील हलक्‍या-फुलक्‍या संवादाला सादर करते, जेथे संशयाचा क्षण विनोदी शोधामध्‍ये बदलतो. यानंतर सामान्‍य घरगुती दृश्‍य पाहायला मिळते, ज्‍याचा अनपेक्षित वळणावर शेवट होतो. पतीच्‍या आनंदामागील गुपित उघडकीस येते, ते म्‍हणजे तो लेनदेनक्‍लबच्‍या माध्‍यमातून दररोज कमाई करत असतो. डॉ. मनिष पनवार आणि हरप्रीत जटैल अभिनीत ही जाहिरात परिस्थितीयुक्‍त कथानकाचा वापर करत प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून दिल्‍या जाणाऱ्या कर्जावर दैनंदिन कमाईची सहजता व विश्वसनीयता दाखवते.
या मोहिमेचा मुलभूत संदेश ‘बीवी का शक बढे ना बढे, आपका मुनाफा बढता ही रहेगा लेनदेनक्‍लब के साथ. बस डाऊनलोड करो और लेण्‍ड करो. डेअली कमाओ, डेअली मुस्‍कुराओ’ (पत्‍नीचा संशय वाढो किंवा न वाढो, तुमचा फायदा वाढतच राहिल लेनदेनक्‍लबसोबत. फक्‍त डाऊनलोड करा आणि कर्ज द्या. दररोज कमवा, दररोज हसत राहा) सतत आर्थिक वाढ आणि दैनंदिन आत्‍मविश्वासाच्‍या संकल्‍पनेला अधिक दृढ करतो.
या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त करत लेनदेनक्‍लबचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाविन पटेल म्‍हणाले, ”या जाहिरातीसह आमची दाखवून देण्‍याची इच्‍छा होती की आर्थिक स्‍वावलंबीत्‍व आनंदाचे लहान, पण अर्थपूर्ण क्षण आणू शकते. आमच्‍या दैनंदिन कमाई ऑफरिंग वापरकर्त्‍यांना अधिक नियंत्रण व पारदर्शकतेसह कमावण्‍याची सुविधा देते. संबंधित कथानकाच्‍या माध्‍यमातून ‘लेण्डिंग स्‍टोरी’ आर्थिक शिस्‍तबद्धता व स्थिरतेच्‍या दैनंदिन फायद्यांना सादर करते.”
ही जाहिरात आर्थिक समावेशन व दैनंदिन गुंतवणूकीवरील लेनदेनक्‍लबच्‍या संवादाचा प्रसार करते, जी ब्रॅड अॅम्‍बेसेडर हार्दिक पांड्या असलेली ‘इन्‍व्‍हेस्‍ट लाइक हार्दिक’ आणि सतत आर्थिक फायद्यांच्‍या परिणामांना दाखवणारी ‘हर दिन हो खास’ यांसारख्‍या मोहिमांशी संलग्‍न आहे.

Related posts

ग्राहक डिजिटल सुरक्षिततेकरिता क्विक हीलकडून ‘व्‍हर्जन २४’ लाँच

Shivani Shetty

Vedaa is a very important film for me, for my survival and my growth!’ : Sharvari

Shivani Shetty

व्हीएमएस टीएमटी लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफरिंग १७ सप्‍टेंबर २०२५ रोजी सुरू होऊन १९ सप्‍टेंबर २०२५ रोजी बंद होईल, जिचा प्राइस बँड प्रति शेअर ९४ रूपये ते ९९ रूपये आहे

Shivani Shetty

Leave a Comment