maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

बीएलएस ई-सर्विसेसद्वारे अॅडीफिडेलिस सोल्‍यूशन्‍सचे अधिग्रहण

मुंबई, १९ जून २०२४: बीएलएस ई-सर्विसेस लिमिटेड (‘बीएलएसई’) ने भारतातील कॉर्पोरेट्स व व्‍यक्‍तींसाठी कर्ज वितरण व प्रक्रियेमधील सर्वात मोठी कंपनी अॅडीफिडेलिस सोल्‍यूशन्‍स प्रा. लि. आणि‍ तिच्‍या सहयोगीमधील (‘एएसपीएल’) ५५ टक्‍के नियंत्रित हिस्‍सा संपादित करण्‍यासाठी शेअर परचेस अॅग्रीमेंट (एसपीए) वर स्‍वाक्षरी केली आहे, जेथे एंटरप्राइज मूल्‍य जवळपास १९० कोटी रूपये आहे. बीएलएसई अंदाजे ७१ कोटी रूपयांची (प्राथमिक व दुय्यम) आगाऊ गुंतवणूक करेल आणि‍ उर्वरित गुंतवणूक आर्थिक वर्ष २०२५ मध्‍ये उल्‍लेखनीय टप्‍पे संपादित करण्‍यासाठी नंतर करण्‍यात येईल. हे संपादन ऑल-कॅश डिल असेल. आर्थिक वर्ष २०२५ च्‍या दुसऱ्या तिमाहीमध्‍ये व्‍यवहार पूर्ण होईल.

बीएलएस ई-सर्विसेस लि.चे अध्‍यक्ष श्री. शिखर अग्रवाल म्‍हणाले, ”आम्‍हाला एएसपीएलसोबत निर्णायक करारावर स्‍वाक्षरी करण्‍याची घोषणा करताना आनंद होत आहे. या धोरणात्‍मक पुढाकारामुळे अनेक क्रॉस-सेलिंग संधी निर्माण होतील, तसेच आमच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये विशेषीकृत कर्ज प्रक्रिया व वितरण सेवांची भर होईल. यासह आमचे लास्‍ट-माइल बँकिंग सेवा वितरित करण्‍यामधील अग्रणी स्‍थान अधिक दृढ होईल.

आमच्‍या १,००,००० हून अधिक टचपॉइण्‍ट्सवर दररोज ६ लाखांहून अधिक व्‍यक्‍ती येत असल्‍यामुळे आम्‍ही आमच्‍या टचपॉइण्‍ट्सचे लोकेशन कोणतेही असो भारतातील तळागाळामधील सुरक्षित व असुरक्षित कर्जांचा शोध घेणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी व्‍यापक संदर्भासह एएसपीएलला सुसज्‍ज करण्‍यास स्थित आहोत. एएसपीएलचे प्रतिष्ठित संबंध आणि‍ बहुतांश आर्थिक संस्‍थांसोबत पॅनेलमधील समावेश आमच्‍या २१,००० हून अधिक बिझनेस करस्‍पॉण्‍डंट सेंटर्सचे नेटवर्क अधिक दृढ करतील.”

हब-अॅण्‍ड-स्‍पोक मॉडेलच्‍या माध्‍यमातून कार्यरत असण्‍यासोबत भारतभरातील १७ राज्‍ये व केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वसमावेशक उपस्थितीसह एएसपीएलचे ८,६०० हून अधिक चॅनेल सहयोगींचे नेटवर्क कर्ज चौकशीची सुविधा देतात, जे बीएलएलईच्‍या बिझनेस करस्‍पॉण्‍डंट्स-नेतृत्वित नागरिक-केंद्रित लास्‍ट माइल बँकिंग सेवांच्‍या पोर्टफोलिओशी संलग्‍न असेल. 

एएसपीएल सध्‍या आपल्‍या चॅनेल सहयोगींच्‍या व्‍यापक नेटवर्कच्‍या माध्‍यमातून सरासरी मासिक १,५०० कोटी रूपयांहून अधिक कर्ज वितरण देते आणि आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्‍स व टाटा कॅपिटल अशा आघाडीच्या आर्थिक संस्‍थांसोबत सूचीबद्ध आहे. आर्थिक वर्ष २०२४ साठी लेखापरिक्षित न केलेल्‍या आर्थिक निकालांनुसार एएसपीएल आणि‍ तिच्‍या सहयोगींनी जवळपास ५७७ कोटी रूपयांचा महसूल संपादित केला, तसेच ईबीआयटीडीए जवळपास २२ कोटी रूपये राहिला. ‍

Related posts

वर्क इंटिग्रेटेड लर्निंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Shivani Shetty

कोस्‍टा कॉफीचे भारतीय बॅरिस्‍टा ऑलिम्पिक गेम्‍स पॅरिस २०२४ मध्‍ये ऑफिशियल कॉफी पार्टनर म्‍हणून चमकणार

Shivani Shetty

इंटेलेक्टने दोन अत्याधुनिक एआय समर्थित प्लॅटफॉर्म लाँच केले

Shivani Shetty

Leave a Comment