maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

क्विक हीलने यूएस एआयएसआयसीचे सदस्यत्व मिळवले

मुंबई, १७ एप्रिल २०२४: जागतिक पातळीवर सायबरसिक्युरिटी उपाययोजना पुरविणारी कंपनी क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडला यू. एस. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी इन्स्टिट्यूट कॉन्सोर्टियम (एआयएसआयसी) चे सदस्यत्व मिळाल्याची घोषणा कंपनीने मोठ्या गौरवाने केली आहे. यूएस एआयएसआयसी हा एआय सुरक्षा आणि विश्वासपात्रतेमध्ये सुधारणा घडवून आणण्याला वाहिलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. क्विक हील ही सायबरसुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारी भारतातील एकमेव अशी कंपनी आहे, जिने हा मैलाचा टप्पा गाठला आहे आणि त्यायोगे देशाच्या सायबरसुरक्षा परिसंस्थेला अधिक प्रगल्भ बनविण्याच्या वाटचालीमधील एका लक्षणीय घटनेवर आपले नाव कोरले आहे.

अलीकडेच क्विक हीलने डेटा क्लासिफिकेशनसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅण्डर्ड अँड टेक्नोलॉजी नॅशनल सायबरसिक्युरिटी सेंटर ऑफ एक्सलन्सशी सहयोग साधला होता. या सहयोगानंतर तिचे नाव प्रतिष्ठेच्या यूएस एआयएसआयसीमध्ये समाविष्ट झाल्याने एआयचा जबाबदारीने अंगिकार करण्यास प्रोत्साहन देण्याप्रती कंपनीची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. सेक्यूराइट हा आपला ब्रॅण्ड आणि या क्षेत्रातील तीन दशकांचा प्रदीर्घ अनुभव यांच्या माध्यमातून अत्याधुनिक उद्योगस्तरीय सायबरसुरक्षा उपाययोजना पुरविण्यासाठी कंपनी ओळखली जाते.

क्विक हील टेक्नोलॉजीज लि. चे एमडी डॉ. कैलाश काटकरम्हणाले, “यूएस एआयएसआयसी बरोबरचा हा सहयोग म्हणजे भारताच्या सायबरसुरक्षा परिसंस्थेची प्रगल्भता आणि जागतिक मंच काबीज करण्यासाठीची आमची सुसज्जता प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने गाठलेला एक महत्त्वाचा धोरणात्मक टप्पा आहे. एआय ही एक दुधारी तलवार आहे, ज्यामध्ये प्रचंड संधी तर आहेतच पण लक्षणीय आव्हानेही आहेत. सायबरसुरक्षेच्या क्षेत्रामध्ये आघाडीचे स्थान मिळविणे हा सन्मानही आहे आणि जबाबदारीसुद्धा आहे, कॉन्सोर्टियमच्या कार्यसूचीमध्ये योगदान देण्याच्या दृष्टीने सेक्यूराइट लॅब्जचे पाठबळ लाभलेले क्विक हील आणि सेक्यूराइट एक आगळीवेगळी भूमिका बजावू शकणार आहे. आमच्या टीमच्या अथक परिश्रमांमुळे आम्ही जागतिक स्तरावर एआय सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या विकासामध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी सिद्ध झालो आहोत.”

यूएस एआयएसआयसी हा एआय यंत्रणांचे मूल्यमापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती विकसित करण्याच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा संघ आहे आणि या वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाची सुरक्षितता व विश्वासार्हता वाढविण्याचे त्याचे लक्ष्य आहे. सेक्यूराइट लॅब्ज या भारताच्या सर्वात मोठ्या मालवेअर अनॅलिसिस केंद्रांच्या साथीने आणि संशोधन व विकासावर भरपूर लक्ष केंद्रित करत क्विक हील टेक्नोलॉजीज लि. एआयएसआयसीमधील रिस्क मॅनेजमेंट फॉर जेनेरेटिव्ह एआय, सिंथेटिक कन्टेन्ट, एआय कपॅबिलिटी इव्हॅल्युएशन्स, एआय रेड-टीमिंग आणि सेफ्टी अँड सिक्युरिटी अशा पाच कार्यरत गटांच्या कामकाजामध्ये आपले भरीव योगदान देण्यासाठी सज्ज आहे.

क्विक हील टेक्नोलॉजीज लि.चे सीईओ विशाल साळवी म्हणाले, “जबाबदार एआय क्षेत्राच्या परिसीमा विस्तारण्याच्या कामी यूएस एआयएसआयसी बरोबर साधलेला सहयोग ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. क्विक हील आणि आमचा औद्योगिक स्तरावरील सायबरसुरक्षा ब्रॅण्ड सेक्यूराइट हे दोन्ही एक असे भविष्य घडविण्याप्रती कटिबद्ध आहेत, जिथे सुरक्षा आणि उत्तरदायित्त्वाच्या साथीने नवनव्या तंत्रज्ञानांची भरभराट साधली जाईल. स्वमालकीच्या गोडीप.एआय तंत्रज्ञानाचा फायदा घेत, क्विक हीलमध्ये आम्ही एआयला डिजिटल सुरक्षेशी जोडण्याच्या क्षेत्रात याआधीच आघाडी घेतली आहे. गोडीप.एआय सोबतचा आमचा अनुभव एआय क्षेत्रातील आमच्या सखोल अनुभवाला अधोरेखित करतो आणि कॉन्सोर्टियमला महत्त्वपूर्ण योगदान देणारा घटक म्हणून आमची  भूमिका अधिक भक्कमपणे मांडतो.”

Related posts

भारतातील पहिली ‘गो कोडर्ज’ राष्ट्रीय कोडिंग स्पर्धा

Shivani Shetty

प्रमुख शहरांमधील घरांच्‍या भाडेदरांमध्‍ये २५ ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ: हाऊसिंग डॉटकॉम

Shivani Shetty

भारताच्या सांस्कृतिक आणि पाककलेतील विविधतेचे उल्लेखनीय प्रदर्शन सादर

Shivani Shetty

Leave a Comment