maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतीयांसाठी आजही रिअल इस्‍टेट गुंतवणूकीसाठी पसंतीचा मालमत्तावर्ग: हाऊसिंगडॉटकॉम

मुंबई, २६ सप्टेंबर २०२३: भारतीय नागरीक स्‍टॉक्‍स, मुदत ठेवी व सोने अशा इतर मालमत्तावर्गांच्‍या तुलनेत रिअल इस्‍टेटमध्‍ये गुंतवणूकीला अधिक प्राधान्‍य देत असल्याचे हाऊसिंगडॉटकॉम या आघाडीच्‍या प्रॉपटेक कंपनीने रिअल इस्‍टेट उद्योगसंस्‍था नरेडकोसोबत सहयोगाने केलेल्‍या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. बांधकाम सुरू असलेल्‍या प्रकल्‍पांच्‍या तुलनेत रेडी-टू-मूव्‍ह-इन निवासी मालमत्तांना अधिक मागणी आहे. हाऊसिंगडॉटकॉम आणि नरेडकोने त्‍यांचा नवीन सर्वेक्षण अहवाल ‘रेसिडेन्शियल रिअॅल्‍टी कंझ्युमर सेन्टिमेंट आऊटलुक एच२ २०२३ – ट्रेण्‍ड्स अॅण्‍ड इनसाइट्स’ प्रसिद्ध केला. ऑनलाइन सर्व्‍हेमध्‍ये हजारोहून अधिक संभाव्‍य गृहखरेदीदारांचे सर्वेक्षण करण्‍यात आले. हे सर्वेक्षण जानेवारी ते जून २०२३ दरम्‍यान करण्‍यात आले.

सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, गेल्‍या वर्षभरात घरांच्‍या वाढत्‍या किंमती आणि वाढत्‍या गृहकर्जांदरम्‍यान संभाव्‍य गृहखरेदीदार कर सवलत आणि स्थिर पेमेंट प्‍लान्‍सचा शोध घेत आहेत. रेडी-टू-मूव्‍ह-इन घरे आणि गेटेड समुदाय हे सर्वात पसंतीचे मालमत्ता प्रकार आहेत. अतिरिक्‍त लाभ जसे मॉड्युलर किचन्‍स व सानुकूल इंटीरिअर वर्क हे गृहखरेदीदारांसाठी निर्णय घेण्‍याच्‍या प्रक्रियेदरम्‍यान प्रभावी घटक आहेत.

सर्वेक्षणाच्‍या मते, ४८ टक्‍के प्रतिसादक स्‍टॉक्‍स, मुदत ठेवी व सोने अशा इतर मालमत्तावर्गांच्‍या तुलनेत रिअल इस्‍टेटमध्‍ये गुंतवणूकीला अधिक प्राधान्‍य देतात. डेटामधून निदर्शनास येते की, १८ टक्‍के प्रतिसाद शेअर बाजाराला प्राधान्‍य देतात, १९ टक्‍के प्रतिसाद मुदत ठेवींचा अवलंब करतात आणि १५ टक्‍के प्रतिसादक सोन्‍याची निवड करतात.

हाऊसिंगडॉटकॉम, प्रोपटायगरडॉटकॉम व मकानडॉटकॉमचे ग्रुप सीईओ श्री. ध्रुव अगरवाल म्‍हणाले, “गतकाळापासून रिअल इस्‍टेट गुंतवणूकीचा आधारस्‍तंभ राहिले आहे. कोविड-१९ महामारीमुळे या क्षेत्राचे महत्त्व प्रकर्षाने दिसून आले आहे, तसेच अनेकांसाठी ते पसंतीचे क्षेत्र बनले आहे. स्‍वत:च्‍या मालकीचे घर असण्‍याची इच्‍छा, हायब्रिड वर्क मॉडेल्‍समध्‍ये वाढ आणि सुरक्षिततेचे महत्त्व यासारख्‍या घटकांनी रिअल इस्‍टेट क्षेत्राला नव्‍या उंचीवर नेले आहे. अलिकडील काळात घरांच्‍या किमतींमध्‍ये वाढ होताना दिसण्‍यात आले आहे आणि या वाढीने जवळपास दशकभरातील स्थिर किमतीला मागे टाकले आहे. यंदा गृहकर्ज व्‍याजदरांमध्‍ये २.५ टक्‍क्‍यांची वाढ झालेली असताना देखील रिअल इस्‍टेट बाजारपेठेने स्थिरता दाखवली आहे. या प्रबळ स्थितीचे श्रेय नियंत्रित व उदयोन्‍मुख मागणीला जाऊ शकते.”

नरेडकोचे अध्‍यक्ष श्री. राजन बांदलेकर म्‍हणाले, “नुकत्याच झालेल्या जी२० शिखर परिषदेचा एकूण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव पडेल आणि धोरण, गुंतवणूक व शाश्‍वत विचारांद्वारे भारताच्या रिअल इस्टेटला नवीन आकार मिळेल. ग्राहकांच्‍या वाढत्‍या आत्‍‍मविश्‍वासाने महामारीदरम्‍यानच्‍या मंदीच्‍या वातावरणाला मागे टाकले आहे. उत्‍पन्‍नासंदर्भात दृष्टिकोन काहीसा कमी झाला असला तरी ४८ टक्‍के प्रतिसादक पसंतीचा मालमत्तावर्ग म्‍हणून रिअल इटेस्‍टला प्राधान्‍य देत आहेत.”

श्री. बांदलेकर पुढे म्‍हणाले, “घरांच्‍या किमती व व्‍याजदरांमध्‍ये वाढ झाल्‍यामुळे भविष्‍यात गृहखरेदीदार मुद्रांक शुल्‍क व जीएसटी माफ करण्‍यासारख्‍या सवलतींचा शोध घेतील. या इन्‍सेंटिव्‍ह्जचा घराचे मालकीहक्‍क सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. सर्वेक्षणमधून वैयक्तिक पाठिंबा, तसेच प्रॉपर्टी शॉर्टलिस्टिंगचे महत्त्व दिसून येते, जे व्‍यवहार करण्‍यासाठी आणि गृहखरेदीच्‍या अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे.”

हाऊसिंगडॉटकॉम, प्रोपटायगरडॉटकॉम व मकानडॉटकॉमच्या संशोधनप्रमुख श्रीमती अंकिता सूद म्‍हणाल्‍या, “प्रबळ देशांतर्गत मागणीमुळे भारतीय अर्थव्‍यवस्‍था प्रमुख अर्थव्‍यवस्‍थांमध्‍ये उच्‍च दरासह विकसित होण्‍याची अपेक्षा आहे. ग्राहक मागणीमधील ही वाढ निवासी मालमत्ता बाजारपेठेत देखील दिसून येते, जेथे मंदीचे वातावरण असताना देखील प्रमुख बाजारपेठेतील विक्रीने २०२३ च्‍या पहिल्‍या सहामाहीत वार्षिक १५ टक्‍क्‍यांची वाढ नोंदवली. बाजारेपठेतील हा आत्‍मविश्‍वास संपादित करत ग्राहकांच्‍या भावनांचे मापन करणारे आघाडीचे सूचक असलेल्‍या आमच्‍या रिअॅल्‍टी कंझ्युमर सर्व्‍हेमधून गृहखरेदीदारांचा अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये, तसेच त्‍यांच्‍या भावी उत्‍पन्‍नांमध्‍ये असलेला विश्‍वास दिसून येतो. हे घटक निवासी मालमत्ता खरेदीदारासाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहेत. तसेच, गुंतवणूकीच्‍या इतर सर्व स्‍वरूपांच्‍या तुलनेत रिअल इस्‍टेटमध्‍ये गुंतवणूक करण्‍याला प्राधान्‍य दिले जात आहे, ज्‍यामधून प्रबळ बाजारपेठ स्थिती दिसून येते.”

 

Related posts

७१ व्या मिस वर्ल्ड टीमचे ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला समर्थन

Shivani Shetty

डॉर्बीचे “व्हेस्टा” कलेक्शन

Shivani Shetty

उन्‍हाळ्याकरिता द बॉडी शॉपचे व्हिटॅमिन सी कलेक्‍शन

Shivani Shetty

Leave a Comment