maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा विंटर कार्निवल सेल सुरु

मुंबई, ६ डिसेंबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने विंटर कार्निवल सेल लाँच केला आहे, ज्‍यामधून ग्राहकांना फ्लाइट्स, हॉटेल्‍स, क्रूझेस्, बसेस, कॅब्‍स व हॉलिडे पॅकेजेसवर अविश्‍वसनीय बचतींचा लाभ घेण्‍याची संधी आहे. हा मर्यादित कालावधीचा सेल ९ डिसेंबर २०२३ पर्यंत आहे आणि तुम्‍हाला अविश्‍वसनीय दरांमध्‍ये जगामध्‍ये पर्यटनाचा आनंद देतो.

विंटर कार्निवल सेलदरम्‍यान पर्यटक ९ डिसेंबरपर्यंत कूपन कोड कार्निवल (CARNIVAL) चा वापर करत अविश्‍वसनीय सूटचा आनंद घेऊ शकतात. तुम्‍ही देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सवर अनुक्रमे जवळपास २,०२३ रूपयांची व ७,५०० रूपयांची बचत करू शकता, तसेच देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय हॉटेल्‍सवर अनुक्रमे जवळपास ५,००० रूपयांची व १०,००० रूपयांच्‍या सूटचा आनंद घेऊ शकता. बस किंवा कॅबने प्रवास करण्‍याचे नियोजन करत असाल तर तुम्‍ही अनुक्रमे जवळपास ५०० रूपयांची व जवळपास २००० रूपयांची बचत करू शकता. तसेच संस्‍मरणीय हॉलिडेचा अनुभव घेणाऱ्यांसाठी पॅकेजेस् फक्‍त ११,२९९/- रूपयांपासून सुरू होतात.

इझमायट्रिपने प्रतिष्ठित एअरलाइन्‍स व एक्‍सक्‍लुसिव्‍ह हॉटेल्‍ससोबत सहयोग केला आहे, जसे एअर अस्‍ताना, एअर इंडिया, एअरएक्‍स्‍पोरेस, एअरफ्रान्‍स, आकासा एअर, ब्रिटीश एअरवेज, बॅटिक एअर, गल्‍फ एअर, आयटीए एअरवेज, जपान एअरलाइन्‍स, केएलएम रॉयल डच एअरलाइन्‍स, केनिया एअरवेज, ओमण एअर, स्‍पाइसजेट एअरलाइन्‍स, कतार एअरलाइन्‍स, क्‍वॉन्‍टस, विस्‍तारा व्‍हर्जिन व्‍हर्जिन अॅटलांटिक.

हॉटेल्समध्ये ट्रायडंट हॉटेल्‍स, ऑबेरॉय हॉटेल्‍स अॅण्‍ड रिसॉर्टस्, सिग्‍नेट हॉटेल्‍स, द क्‍लार्क्‍स हॉटेल्‍स, रिजेंटा हॉटेल्‍स, रॉयल ऑर्चिड हॉटेल्‍स, एमपीटी हॉटेल्‍स, स्‍प्री हॉटेल्‍स, सायट्रस हॉटेल्‍स, कायरिड, मास्टिफ हॉटेल्‍स, द फर्न हॉटेल्‍स अॅण्‍ड रिसॉर्टस्, प्राइड हॉटेल्‍स, माऊंट हॉटेल्‍स, हॉटेल ली रॉय, रिनेस्‍ट हॉटेल्‍स, अमृतारा हॉटेल्‍स अॅण्‍ड रिसॉर्ट्स, स्‍टारलाइट बिझनेस हॉटेल, सुबा ग्रुप ऑफ हॉटेल्‍स, लाइमट्री हॉटेल्‍स, श्रीगो ग्रुप ऑफ हॉटेल्‍स, वन अर्थ हॉटेल्‍स, जस्‍ट ए हॉटेल्‍स अॅण्‍ड रिसॉर्टस्, वेलकम हेरिटेज, फॅब हॉटेल्‍स, शेवरॉन हॉटेल्‍स अॅण्‍ड रिसॉर्टस्, झोन बाय द पार्क, द पार्क, स्‍टर्लिंग, लॉर्डस् हॉटेल्‍स अॅण्‍ड रिसॉर्ट्स, द बाइक, अनंता हॉटेल्‍स अॅण्‍ड रिसॉर्टस्, सुमित हॉटेल्‍स अॅण्‍ड रिसॉर्टस् आणि जैन ग्रुप ऑफ हॉटेल्‍स आदींचा समावेश आहे.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्‍हणाले, “मला आमच्‍या विंटर कार्निवल सेलमध्‍ये तुमचे स्‍वागत करताना आनंद होत आहे. हा सेल बचत व हंगामी आनंदाचे सेलिब्रेशन आहे, जो हिवाळ्यामध्‍ये अद्भुत प्रवासाचा अनुभव देण्‍यासाठी क्‍यूरेट करण्‍यात आला आहे. आम्‍ही व्‍यापक सूट देण्‍यासाठी, तसेच उत्‍सवी वातावरण तयार करण्‍यासाठी स्‍पेशल इव्‍हेण्‍ट विंटर कार्निवल सेल डिझाइन केला आहे, जेथे आमचे समुदाय एकत्र येऊ शकतात आणि सीझनच्‍या उत्‍साहाचा आनंद घेऊ शकतात. हा फक्‍त सेल नसून हिवाळ्यातील मोहकतेचे आणि अविश्‍वसनीय डिल्‍स शोधण्‍याच्‍या आनंदाचे सेलिब्रेशन आहे.”

Related posts

इझमायट्रिपची तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी

Shivani Shetty

इझमायट्रिपची दुस-या तिमाहीत दमदार कामगिरी

Shivani Shetty

झी5 इंटेलिजन्स मॉनिटरने सादर केला नवीन अहवाल

Shivani Shetty

Leave a Comment