maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

‘आनंदन’ – कोका-कोला इंडिया फाउंडेशनद्वारेआयसीसी मेन्स aक्रिकेट वर्ल्ड कप २०२३ दरम्यानकचरा व्यवस्थापन उपक्रमांना सहाय्य

नवी दिल्ली, नोव्हेंबर १५, २०२३: सर्व क्रीडास्पर्धांमध्ये शाश्वततेला अविभाज्य अंग म्हणून सहाय्य करण्याच्या कामाला चालना देण्यासाठी कोकाकोला इंडिया फाउंडेशनआनंदनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि युनायटेड वे ऑफ मुंबई यांच्याशी सहयोगाने आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३दरम्यान कचरा व्यवस्थापनावर भर देणारा उपक्रम सुरू करून त्याची अंमलबजावणीही केली.

हा कचरा व्यवस्थापन उपक्रम कोकाकोलाच्या वर्ल्ड विदाउट वेस्ट(कचरामुक्त जग) या जागतिक स्तरावरील बांधिलकीशी सुसंगत आहे.फाउंडेशनच्या शाश्वत पॅकेजिंग प्लॅटफॉर्मपुढे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे: २०२५ सालापर्यंत पॅकेजिंग १०० टक्के रिसायकल करण्याजोगे करणे, पॅकेजिंगमध्ये (डिझाइन) किमान ५० टक्के रिसायकल्ड साहित्य वापरण्याचे उद्दिष्ट २०३० सालापर्यंत साध्य करणे; २०३० सालापर्यंत विकलेली प्रत्येक बाटली किंवा कॅन संकलित करून रिसायकल करण्याप्रती वचनबद्धता साध्य करणे; आणि अधिक स्वच्छ, कचरामुक्त पर्यावरणाच्या (पार्टनर) जोपासनेसाठी समुदायाच्या सहभागाला बढावा देणे.

ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान,रिसायकल्ड पेट बाटल्यांपासून तयार केलेले सेफ्टी जॅकेट्स घातलेले १००० हून अधिक स्वयंसेवक, विश्वचषकाचे सामने खेळले जात असलेल्या दहा स्टेडियम्सवर तैनात करण्यात आले आहेत. कचऱ्याच्यावर्गीकरणाबद्दल प्रेक्षकांना शिक्षित करणे, ठरवून दिलेल्या डब्यांमध्येकचरा टाकला जाईल याची खातरजमा करणे आणि स्टेडियम्स पर्यावरणाच्या दृष्टीने स्वच्छ स्थितीत ठेवणे याची जबाबदारी समर्पितस्वयंसेवकांवर आहे. अधिक पर्यावरणपूरक भवितव्याप्रती बांधिलकीची ग्वाहीही यातून दिली जाते.

कोकाकोला भारत आणि आग्नेय आशियाच्या पब्लिक अफेअर्स,कम्युनिकेशन्स आणि सस्टेनिबिलिटी विभागांच्या उपाध्यक्ष देवयानी राजलक्ष्मी राणा म्हणाल्या, यंदाच्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ दरम्यान कोकाकोला इंडिया फाउंडेशनआनंदन’, १० यजमान शहरांमध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व ४८ सामन्यांदरम्यान कचरा व्यवस्थापनात सहाय्य करत आहे. प्रत्यक्ष काम करणाऱ्या स्वच्छता स्वयंसेवकांच्या माध्यमातून ही मदत केली जात आहे. हे स्वयंसेवकरिसायकल्ड पेट बॉट्ल्सपासून तयार केलेले सेफ्टी जॅकेट्स घालून काम करत आहेत. त्याशिवाय आम्ही आयसीसीच्या सहयोगाने राष्ट्रगीत सोहळ्यांदरम्यान रिसायकल केलेल्या पेट बाटल्यांपासून तयार केलेले राष्ट्रध्वजही देत आहोत. वर्ल्ड विदाउट वेस्ट या आमच्या जागतिक धोरणाशी हा उपक्रम सुसंगत आहे. पॅकेजिंगच्या वर्तुळाकारअर्थव्यवस्थेच्या माध्यमातून व्यवस्थेत बदल घडवून आणण्यास चालना दिली जात आहे.” 

सुमारे २०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्याचे उद्दिष्ट कोकाकोला इंडियाने ठेवले आहे. यजमान शहरांमध्ये बाके तयार करण्यासाठी हा कचरा वापरला जाणार आहे.  

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) इव्हेण्ट्स विभागाचे प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले, आयसीसीच्या स्पर्धांचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमीतकमी राखण्यासाठी तसेच शाश्वततेप्रती आमच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून कोकाकोला इंडिया फाउंडेशन आणि युनायटेड वे ऑफ मुंबई यांच्याशी सहयोग करण्याचा अनुभवउत्तम आहे. आम्ही सर्व एकत्रितपणे समुदायाचा सहभाग, व्यवस्थित कचरा वर्गीकरण आणि अधिक पर्यावरणपूरक तसेच कचरा मुक्त पर्यावरणाची जोपासना करत आहोत. त्याचा प्रभाव आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतरही पर्यावरणावर कायम राहील,अशी आशा आम्हाला वाटते.”

युनायटेड वे ऑफ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज ऐकारा म्हणाले, “#MaidanSaaf उपक्रम हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. समुदायांवर तसेच त्यांच्या उपजीविकांवर शाश्वत व सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यात आम्ही कोकाकोलाला मदत करत आहोत.आमच्या कचरा रिसायकल करण्याच्या उपक्रमाला वेग देण्यासाठी आम्ही परिश्रमपूर्वक काम करत आहोत. या नवीन अभियानाच्या माध्यमातून, या स्पर्धेदरम्यान कचरा रिसायकल करण्याच्या महत्त्वावर भर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आमच्या सामूहिक समुदाय प्रभाव नमुन्याचे अनुसरण करत आहोत. यासाठी विविध संबंधितांशी सहयोग करत आहोत. यात स्थानिक सरकारी प्रशासन, नागरी समाज समूह आणि संबंधित व्हेण्डर्सचा समावेश होतो. या अभियानाद्वारे वर्ल्ड विदाउट वेस्ट हे आपल्या सर्वांसाठी सामूहिक कार्य होऊ शकते.”

आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ दरम्यान, शाश्वत क्रीडाअनुभव निर्माण करण्यासाठी कोकाकोला इंडियातर्फे #MaidaanSaaf पक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा भाग म्हणून,स्टेडियम्समधील विविध टचपॉइंट्सवर रिव्हर्स व्हेण्डिंग मशिन्स स्थापित करण्यात आल्या. क्रीडाचाहत्यांनी त्यांच्या पेट बाटल्यांची जबाबदारीने विल्हेवाट लावावी म्हणून ही सोय करण्यात आली आहे. कोकाकोला इंडिया व आयसीसीने वापरात आलेल्या (पोस्टकंझ्युमर) पेट बाटल्यांपासून राष्ट्रध्वज तसेच आयसीसी युनिटी फ्लॅग्ज तयार करून घेतले आहेत. गोरिव्हाइज या गणेशा इकोस्फीअरच्या ब्रॅण्डद्वारे पेट बाटल्या रिसायकल करण्यात आल्या आहेत. त्यातून धागे तयार करून ते ध्वज विणण्यासाठी वापरण्यात आले आहेत. हे ध्वज प्रत्येकसामन्यापूर्वी होणाऱ्या राष्ट्रगीत समारंभात वापरले जात आहेत.

थम्स अप आणि लिम्का स्पोर्ट्झ हे आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप इंडिया २०२३चे अधिकृत पेय व स्पोर्ट्स ड्रिंक सहयोगी आहेत.कोकाकोला इंडिया विश्वचषक स्पर्धेदरम्यान अनेक उपक्रम राबवत आहे. यामध्ये चाहते व ग्राहकांसाठी अनेक ऑनलाइन व ऑफलाइन उपक्रमांचा समावेश आहे. याद्वारे कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे.

 

Related posts

युवा भारतीय लेखकों ने पॉकेट एफएम के साथ अपनी सफलता का मनाया जश्न!

Shivani Shetty

दूरसंचार उद्योगामध्ये मनुष्यबळ वाढीचा दर मंदावला: टीमलीज

Shivani Shetty

ज्वेलरी सेव्हिंग मंच ‘प्लस’ने नवीन अॅप लॉन्च केले

Shivani Shetty

Leave a Comment