मुंबई, नोव्हेंबर 2023: देशाचा वारसा असलेले मैलाचे दगड, उल्लेखनीय व्यक्ती आणि ऐतिहासिक घडामोडींसह भारताचा इतिहास देशभरातील लोकांना आजही अचंबित करतो. ह्या मालिकेतील रोमांचक कहाण्यांमध्ये 1500 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या भारतातील जागतिक दर्जाच्या विद्यापीठापाची कहाणी आहे. हे विद्यापीठ अचानक नकाशावरून आणि मानवी स्मृतीमधून नाहीसे झाले होते. त्यासह कोणत्याही आधुनिक यंत्र तंत्रज्ञानाशिवाय 200 फूट उंचीवर टांगण्यात आलेल्या 80 टनांच्या खडकामागचे अजूनही न उलगडलेल्या अभियांत्रिकी आश्चर्याहाही त्यात समावेश आहे. वॉर्नर ब्रदर्स व डिस्कव्हरी 20 नोव्हेंबर रोजी डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर ‘हिस्टरी हंटर’ च्या प्रस्तुतीसह भारतातील सर्वांत मोठ्या दंतकथा व कहाण्यांमधील रहस्याचा मागोवा घेतील.
प्रसिद्ध अभिनेता आणि होस्ट मनीष पॉलद्वारे सादर केल्या जाणा-या ह्या आठ भागांच्या डॉक्युसिरीजमध्ये देशभरातील अज्ञात उल्लेखनीय ऐतिहासिक तथ्यांचे अन्वेषण करून ती समोर आणली जातील. समोर असलेल्या प्रश्नांचा उलगडा करण्याच्या व तार्किक स्पष्टीकरण शोधण्याच्या त्याच्या मोहीमेमध्ये मनीषसोबत विशेषज्ञ असतील. टिपू सुलतान व त्याचे वडील हैदर अली ह्यांनी कशा प्रकारे जगातील पहिले उपयोगात आणता येणारे सेनेसाठीचे रॉकेट बनवले व ते कसे ब्रिटीशांसाठी प्रेरणादायी ठरले हे शोधण्यापासून ते प्रसिद्ध सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती आहे हे शोधण्यापर्यंत आणि लक्षाधीशांचे शहर असलेले लखपत शहर कसे उजाड बनले हे शोधण्यापर्यंत ‘हिस्टरी हंटरमध्ये’ आजवर उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांमागचे गूढ उलगडण्यापर्यंत दर्शकांना खिळवून ठेवले जाईल.
मनीष पॉलने आपली उत्सुकता पुढील शब्दांमध्ये व्यक्त केली, “हिस्टरी हंटरने मला भारतामध्ये अतिशय थरारक इतिहासाच्या शोधाची आणि आपल्या वैविध्यपूर्ण भूप्रदेशामध्ये सर्वत्र पसरलेल्या सुप्त व पौराणिक दंतकथांना समोर आणण्याही संधी मिळवून दिली. वॉर्नर ब्रदर्स आणि डिस्कव्हरीसोबत काम करणे हा अतिशय विशेष अनुभव होता. ह्या रोमांचक मालिकेला दर्शकांपर्यंत नेण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे आणि मला विश्वास आहे की, ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवेल व त्यांचा श्वास रोखायला भाग पाडेल.”
‘हिस्टरी हंटर’ ह्या आठ भागांच्या मालिकेमध्ये नालंदा विद्यापीठ, गोवळकोंडा किल्ला, महाबलीपूरम, तमिळ नाडूतील बृहदीश्वरा मंदीर, लखपत शहर आणि सरस्वती नदी ह्या ऐतिहासिक बाबींवर प्रकाश टाकला जाईल. दुस-या नानासाहेब पेशव्यांचे नाहीसे होणे आणि सेनेसाठी रॉकेटसचा वापर पहिल्यांदा करणारा टिपू सुलतान जगामध्ये पहिला होता का, ह्यावरच्या दृष्टीकोनांचेही अन्वेषण ह्या शोमध्ये केले जाईल.
डिस्कव्हरी, साउथ एशियाचे फॅक्चुअल अँड लाईफस्टाईल क्लस्टरचे प्रमुख साई अभिषेक ह्यांनी म्हंटले, “वॉर्नर ब्रदर्स व डिस्कव्हरी तथ्यावर आधारित मनोरंजनाच्या प्रकारामध्ये आपली आघाडी टिकवत पुढे जात आहेत व देशभरातील श्रोत्यांच्या मनाला भावेल अशा वैविध्यपूर्ण डॉक्युसिरीज सादर करत आहेत. आमच्या कंटेंटच्या दालनामध्ये अनेक भारतीय ओरिजिनल मालिका आहेत ज्यामध्ये दर्शकांना कित्येक दशके व शतकांमधील विविध ऐतिहासिक घटनांसंदर्भातील अनेक रहस्यमय बाबींना उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल. ह्या प्रोजेक्टमध्ये मनीष पॉलसोबत भागीदारी करताना आम्हांला आनंद होत आहे आणि आम्हांला विश्वास आहे की, त्यामध्ये आमच्या श्रोत्यांना खिळवून ठेवेल असा रोमांचक अनुभव मिळेल.”
‘हिस्टरी हंटर’ डिस्कव्हरी चॅनलवर 20 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होईल व ते डिस्कव्हरी+ वरसुद्धा उपलब्ध असेल. हिस्टरी हंटर हे एमजी मोटर हेक्टर, फोनपे आणि हार्पिकद्वारे को- पॉवर्ड आहे.