maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

द बॉडी शॉपद्वारे नॅशनल युथ डे साजरा

मुंबई, १४ जानेवारी २०२४: द बॉडी शॉप हा ब्रिटीश-स्थित एथिकल ब्‍युटी ब्रॅण्‍ड नॅशनल युथ डे साजरा करत आहे, तसेच युथ कलेक्टिव्‍ह कौन्सिलच्‍या माध्‍यमातून तरूणांना सक्षम करण्‍याप्रती द बॉडी शॉपची सातत्‍यपूर्ण समर्पितता देखील दाखवत आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून ब्रॅण्‍ड भारतातील उदयोन्‍मुख तरूण चेंजमेकरच्‍या मतांना प्रकाशझोतात आणत आहे आणि अधिक शाश्‍वत व सर्वसमावेशक भविष्‍य निर्माण करण्‍यासाठी त्‍यांच्‍याशी संलग्‍न होत आहे. युथ कलेक्टिव्‍ह कौन्सिलच्‍या सदस्‍यांसोबत गोलमेज चर्चा आणि बहुमूल्‍य माहिती मिळवल्‍यानंतर द बॉडी शॉप इंडिया ब्रॅण्ड स्‍ट्रॅटेजी २०२४ चा भाग म्‍हणून भविष्‍य-केंद्रित प्रमुख उपक्रमांची अंमलबजावणी करण्‍याच्‍या या संधीचा लाभ घेत आहे.

द बॉडी शॉप इंडिया कार्यसंचालनांच्‍या सर्व पैलूंमध्‍ये जेण्‍डर सेन्सिटीव्‍हीटीप्रती सर्वसमावेशक दृष्टीकोन आहे. या उपक्रमावर लक्ष केंद्रित करण्‍याच्‍या माध्‍यमातून द बॉडी शॉप विविध भागांमधील त्‍यांचे संबंधित विविध ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी स्‍टोअर्समध्‍ये आणि कामाच्‍या ठिकाणी आदरणीय व समान वातावरण निर्माण करेल. टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सर्व स्‍टोअर्समध्‍ये ब्रेल लिपी सादर करत दृ‍ष्‍टीहीन समुदायासाठी अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यात येईल, ज्‍यामधून प्रत्‍येकासाठी स्‍टोअरमध्‍ये उत्तम अनुभवाची खात्री मिळेल. मार्केटिंग कॅम्‍पेन्‍समधील विविध पार्श्‍वभूमीतील रिअल-लाइफ हिरोंच्‍या वास्‍तविक प्रतिनिधीत्‍वाचा वापर करण्‍याप्रती कटिबद्धता उद्योगासाठी बेंचमार्क म्हणून सर्वसमावेशक स्‍थापित करेल.

द बॉडी शॉप एशिया साऊथच्‍या मार्केटिंग, डिजिटल अॅण्‍ड प्रॉडक्‍टच्‍या उपाध्‍याक्ष श्रीमती हरमीत सिंग म्‍हणाल्‍या, ”द बॉडी शॉप इंडियाची तरूणांना सक्षम करण्‍यासह त्‍यांच्‍याशी संलग्‍न होण्‍याप्रती आणि सर्वसमावेशक वातावरणाला चालना देण्‍याप्रती समर्पितता आमच्‍या मिशनसाठी महत्त्वाची आहे. नॅशनल युथ डे आपल्‍या तरूण पिढीमधील अंतर्गत क्षमता व कटिबद्धतेला साजरा करतो, जेथे आम्‍ही तरूणांना साह्य करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. तसेच आम्‍ही तरूणांना परिवर्तनात्‍मक बदलाला चालना देण्‍यास सक्षम करण्‍याप्रती समर्पित आहोत, ज्‍यामधून त्‍यांची स्थिरता, सर्जनशीलता व आवड उज्‍ज्‍वल भविष्‍य निर्माण करण्‍याची खात्री देते.”

गेल्‍या वर्षी ऑगस्‍टमध्‍ये द बॉडी शॉप इंडियाने युथ कलेक्टिव्‍ह कौन्सिल लाँच केले आणि अधिक शाश्‍वत भविष्‍य निर्माण करण्‍यासाठी टॉप मॅनेजमेंटसमोर तरूणांच्‍या मतांना वाव देण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली.

सध्‍या द बॉडी शॉप घेत असलेल्‍या उपाययोजनांसंदर्भात ब्रॅण्‍ड प्‍लास्टिक कचरा कमी करण्‍याच्‍या आणि परिपूर्ण शाश्‍वतता संपादित करण्‍यासह व्‍यापक रिसायकलिंग उपक्रम राबवण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. त्‍यांच्‍या उत्‍पादनांचे जवळपास सर्व पॅकेजिंग रिसायकल केलेल्‍या प्‍लास्टिकपासून बनवले जाते किवा रिसायक्‍लेबल आहे. द बॉडी शॉपचे भारतातील सर्व स्‍टोअर्स १०० टक्‍के टिकाऊ आहेत आणि रिसायकल केलेल्‍या साहित्‍यापासून बनवलेल्‍या फिक्‍स्‍चर्सचा वापर करतात. तसेच, ब्रॅण्‍डने स्किनकेअर, बॉडी केअर, हेअरकेअर, मेक-अप आणि फ्रॅग्रन्‍स बाय द वेगन सोसायटी अशा आपल्‍या उत्‍पादनांच्‍या संपूर्ण श्रेणीसाठी १०० टक्‍के वेगन प्रॉडक्‍ट फॉर्म्‍युलेशन प्रमाणपत्र देखील संपादित केले आहे.

Related posts

नेक्‍स्‍टवेव्‍हच्‍या संस्‍थापकांचा प्रतिष्ठित फोर्ब्‍स इंडिया ३० अंडर ३० पुरस्‍कारासह सन्‍मान

Shivani Shetty

आयथिंक लॉजिस्टिक्सची आर्थिक वर्षात दमदार कामगिरी

Shivani Shetty

सुलभ यूपीआय पेमेंट्ससाठी मोबिक्विक पॉकेट यूपीआय कसे वापराल?

Shivani Shetty

Leave a Comment