maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

साऊथ आफ्रिकन टूरिझमच्या वार्षिक रोड शो २०२४ची धमाकेदार सुरुवात; जयपूरमध्ये शुभारंभ आणि प्रमुख भारतीय शहरांमध्ये पुनरागमन

राष्ट्रीय, १ फेब्रुवारी २०२४: भारतीय बाजारपेठेसाठी आखलेल्या धोरणात्मक आराखड्याशी जुळवून घेत साऊथ आफ्रिकन टूरिझमकडून आपल्या वार्षिक भारतीय रोड शो २०२४ ची सहर्ष घोषणा करण्‍यात आली आहे. इंद्रधनुष्यासारखी विविधता असलेल्या या रेनबो नेशनतील प्रवास व पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठीचे एक अत्यावश्यक साधन बनणारा हा रोड शो पहिल्यांदाच पिंक सिटी, जयपूरमध्ये प्रवेश करणार आहे. *१२-१६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजित केलेला हा रोड शो त्यानंतर अनुक्रमे दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू आणि मुंबई अशा इतर महत्त्वपूर्ण भारतीय शहरांना भेट देईल.*

हा २०वा वार्षिक रोडशो भारतीय बाजारपेठेत दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटनाद्वारे चाललेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यात पर्यटन मंडळाने भारतीय ग्राहकांना आपल्याशी जोडून घेण्यासाठी आखलेल्या वार्षिक योजनांचे अनावरण होताना पाहता येईल. संपूर्ण दृष्टिकोन नव्याने घडविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या नाविन्यपूर्ण विवेचक विचारांमुळे व्यावसायिक भागीदारांना भारताच्या वाढत्या परदेश पर्यटन बाजारपेठेतील हिस्सा मिळविणे शक्य होईल. जयपूर येथे सुरू होणाऱ्या शुभारंभाचा रोड शोला ११ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या एका परिसंवादाची जोड मिळेल आणि १५० प्रमुख प्रतिनिधी व व्यावसायिक भागीदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य भेटगाठ सोहळ्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील प्रेक्षणीय स्थळे, तेथील स्वर, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीवर घडून येतील.
दक्षिण आफ्रिकन पर्यटनासाठी भारत हा सध्या जगभरातील टॉप तीन महत्त्वपूर्ण बाजारपेठांपैकी एक आहे आणि त्याला धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. साउथ आफ्रिका टूरिझमच्या मध्य पूर्व, भारत आणि दक्षिणपूर्व आशियासाठीच्या हब हेड श्रीम. नेलिस्वा नकानी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणारा हा रोडशो ‘अधिकाधिक’ ग्राहकांना रेनबो नेशनकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नांतील एक अविभाज्य भाग आहे. अनेक वर्षांपासून भारत जगभरातील अनेक पर्यटनस्थळांसाठीची सर्वात मोठी स्त्रोत बाजारपेठ राहिलेली आहे. येथील पर्यटकांच्या परदेशातील पर्यटनाकडे असलेल्या ओढीमध्ये नुकतीच झालेली वाढ पाहता कोणत्याही पर्यटन मंडळाला या देशाकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे.
या प्रसंगी बोलताना साउथ आफ्रिका टूरिझमच्या मध्य पूर्व, भारत आणि दक्षिणपूर्व आशियासाठीच्या हब हेड श्रीम. नेलिस्वा नकानी म्हणाल्या, “२०२३ मध्ये आम्ही भारतीय बाजारपेठेतून येणाऱ्या पर्यटकांच्या ओघामध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे महत्त्वाचे ठरलेले आणखी एक वर्ष अनुभवले. आमच्या धोरणांच्या यशस्वीतेची ग्वाही देणारी दक्षिण आफ्रिकेला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतील वाढ ही आम्ही आदल्या वर्षामध्ये हाती घेतलेल्या उपक्रमांच्या यशाचे मूर्त उदाहरण आहे. अत्यंत काळजीपूर्वक आयोजित केलेल्या मोहिमांच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेचे दडलेले सौंदर्य लोकांसमोर आमले व त्यातून पॅनडेमिकपूर्व काळातील भारतातून दक्षिण आफ्रिकेत येणाऱ्या पर्यटकांच्या एकूण प्रमाणातील ८२ टक्‍के पुन:प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.”

Related posts

देशात पर्यटनाला चालना देण्‍यासाठी इझमायट्रिपचा झेक टुरिझमसह सहयोग

Shivani Shetty

आध्‍यात्मिक पर्यटनासाठी समर्पित प्‍लॅटफॉर्म ‘ईझीदर्शन’ लाँच

Shivani Shetty

फ्रीओला आयआरडीएआयकडून कॉर्पोरेट एजंटचा परवाना मिळाला

Shivani Shetty

Leave a Comment