*मुंबई, एप्रिल २०२४:* डिस्कव्हरी+ वरील लोकप्रिय डॉक्यु-सिरीज मनी माफियाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या मालिकेचं सिझन ३ पहिल्यांदाच ७ एप्रिल रोजी डिस्कवर चॅनेल वर प्रसारित होणार आहे.
सिझन ३ मधील प्रथम एपिसोड, “पे-अप ऑर एल्स”, व्यवसाय, पोलिस आणि माफियामधील वसुली वर आधारित आहे. दुसरा एपिसोड, ‘गोल्ड ब्लडेड’, सोन्याच्या तस्करीच्या इतिहासावर प्रकाश टाकतो. तीसरा एपिसोड “द ठग्स ऑफ ड्रग्स” मुंबईमध्ये वाढलेल्या “म्याऊं-म्याऊं” या ड्रग बद्दल आहे आणि अंतिम एपिसोड, “क्लीनिंग डर्टी मनी”, हीरा व्यापार, बँका, यूपीआय आणि क्रिप्टोकरेंसी मधून मनी लाँडरिंग आणि भारतीय राजकारणाशी संबंधितांवर घोटाळ्यांवर प्रकाश टाकतो.
ही मालिका डिस्कवरी+ वर टॉप रेटेड आहे आणि या मालिकेतून क्रिप्टोकरेंसी कॉन्स, केतन पारेख द्वारा केलेलं मार्केट मॅनिपुलेशन आणि अब्दुल करीम तेलगी द्वारे केलेला २००३ स्टैंप पॅम्पर स्कॅम आणि इतर अनेक घोटाळे दाखवण्यात आले आहे. हि मालिका वाइस स्टुडिओने प्रोड्युस केली आहे.
स्वप्ननगरी असलेली मुंबईतील अविश्वसनीय भ्रष्टाचार आणि गुन्हे पाहण्यासाठी “मनी माफिया” डिस्कव्हरी चॅनेलवर रविवार, ७ एप्रिल रात्री १० वाजता नक्की पहा.