maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा ‘महाराष्ट्र जन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित

मुंबई, १४ जानेवारी २०२४: पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांना अलीकडेच राज भवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम श्री. रमेश बैस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र जन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.  

महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार हा सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. समाजाला लक्षणीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत व्यक्तींच्या कामाची दखल घेणे हा या पुरस्कारांचा हेतू आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, कला, राजकारण आणि समाजकार्य यांसह वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारताच्या सन्माननीय व्यक्तिमत्त्वांना या पुरस्काराने गौरविले जाते.

या पुरस्काराविषयी आपले मत व्यक्त करताना पद्मश्री डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि अध्यक्ष  डॉ. मुकेश बत्राम्हणाले, “महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी खरोखरीच सन्मानाची बाब आहे आणि माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल मी राज्यपाल रमेश बैसजी आणि सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टचा आभारी आहे. हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून जगभरात होमियोपॅथीची वाढती लोकप्रियता आणि जीवनमानाचा दर्जा वाढविण्याच्या कामी तिचा प्रभाव यांना मिळालेली पोचपावती आहे. असे पुरस्कार मला होमियोपॅथीच्या आणि माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाला अधिक योगदान देण्याचे प्रोत्साहन देतात.

सचिन पिळगांवकर, पद्मश्री अनुप जलोटा, सुधा चंद्रन आणि जुही बब्बर आदी मान्यवरांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Related posts

परफेक्ट ‘मॅच’ – तंदुरुस्ती आणि हायड्रेशन

Shivani Shetty

मुंबईतील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शनाचे विजय सेल्सद्वारे आयोजन

Shivani Shetty

मेधा शंकरने जिंकला IMDb स्टारमीटर पुरस्कार

Shivani Shetty

Leave a Comment