maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नवीन वर्ष, आरोग्‍यदायी वर्ष: २०२४ मध्‍ये मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी ५ संकल्‍प

नववर्षाची सुरूवात होण्‍यासह आपण आपल्‍या जीवनातील नवीन शुभारंभाच्‍या दिशेने वाटचाल करतो, तसेच नववर्ष हे घडलेल्‍या गोष्‍टींचे आत्‍मपरीक्षण करण्‍यासाठी आणि भविष्‍याकरिता नवीन ध्‍येये स्‍थापित करण्‍यासाठी उत्तम काळ देखील आहे. नववर्षाचा शुभारंभ म्‍हणजे फक्‍त तारखेमध्‍ये बदल नसून आपल्‍या आरोग्‍याप्रती नवीन संकल्‍प स्‍थापित करण्‍यासाठी उत्तम संधी आहे. नववर्ष २०२४ च्‍या सुरूवातीपासून मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी उद्देशात्‍मक ध्‍येये निर्धारित करण्‍याचा प्रयत्‍न करा.

डॉ. प्रशांत सुब्रमण्‍यम, मेडिकल अफेअर्स प्रमुख, दक्षिण आशिया,कोरिया व तैवान, डायबेटीस केअर, अॅबॉट म्‍हणाले, ”२०२४ मध्‍ये मधुमेही व्‍यक्‍तींनी त्‍यांच्‍या मधुमेहाचे उत्तमरित्‍या व्‍यवस्‍थापन करण्‍याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. अपुऱ्या देखरेखीमुळे मर्यादित स्‍वरूपात माहिती मिळते, ज्‍यामुळे कृतीशील माहितीनुसार योग्‍य निर्णय घेणे आव्‍हानात्‍मक ठरते. म्‍हणून मधुमेही व्‍यक्‍तींनी स्‍वत:हून काळजी घेतली पाहिजे की ते नियमितपणे त्‍यांच्‍या रक्‍तातील ग्‍लुकोजच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवतील, जीवनशैलीमध्‍ये बदल करतील आणि ध्येयांचे पालन करण्‍याचा सर्वोत्तम प्रयत्न करतील. या ध्‍येयांच्‍या पूर्ततेला साह्य करणारी अनेक नवीन तंत्रज्ञाने आहेत. उदाहरणार्थ, स्‍मार्टफोन्‍सशी सुसंगत असलेली कन्टिन्‍युअल ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) डिवाईसेस तुम्‍हाला चालता-फिरता तुमच्‍या ग्‍लुकोज व्‍यवस्‍थापनावर देखरेख ठेवण्‍यास मदत करू शकतात.” 

नवीन वर्षात विशिष्‍ट लक्ष्‍य रेंजमध्‍ये (सामान्‍यत: ७० ते १८० mg/dl)रक्‍तातील ग्‍लुकोजच्‍या पातळ्या असण्‍याचा संकल्‍प ठेवला पाहिजे. सीजीएम डिवाईसेस व्‍यतिरिक्‍त डिजिटल हेल्‍थ टूल्‍सच्‍या माध्‍यमातून हा संकल्‍प सहजपणे संपादित करता येऊ शकतो. एकत्रित केल्‍यास हे तंत्रज्ञान व्‍यक्‍तींना वर्षभर त्‍यांच्‍या मधुमेह व्‍यवस्‍थापनामध्‍ये अधिक साह्य करू शकतात. तसेच, यामुळे इकोसिस्‍टम निर्माण होते, जी व्‍यक्‍तींना त्‍यांचे डॉक्‍टर व केअरगिव्‍हर्सशी कनेक्‍टेड राहण्‍यास मदत करते. यामुळे मधुमेही व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये प्रभावीपणे रक्‍तातील ग्‍लुकोजवर देखरेख ठेवू शकतात, परिणामत: ते आरोग्‍यदायी जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील.   

२०२४ मध्‍ये केले पाहिजेत असे ५ संकल्‍प –    

  1. रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवा: सतत रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. फ्रीस्‍टाइल लिब्रे सारख्‍या सीजीएम टूल्‍सच्‍या माध्‍यमातून रिअल टाइम देखरेख ठेवता येऊ शकते. दिवसातील बहुतांश काळासाठी, शक्‍यतो जवळपास १७ तासांसाठी  रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांची रेंज ७० ते १८०mg/dl दरम्‍यान ठेवण्‍याचा प्रयत्‍न करा. असे केल्‍याने तुम्‍ही मधुमेहावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्‍ही स्‍वत:हून मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करू शकाल.
  2. धोरणात्‍मक आहार नियोजनाला प्राधान्‍य द्या: दिवसभरात सेवन केल्‍या जाणाऱ्या आहारासंदर्भात नियोजन असणे महत्त्वाचे आहे. कॅलरीचे कमी प्रमाण असलेल्‍या खाद्यपदार्थांची निवड करण्‍याचा प्रयत्‍न करा. रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार नाही अशा खाद्यपदार्थांची निवड करा. मनसोक्‍त खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घ्‍यावासा वाटल्‍यास कमी प्रमाणात अशा खाद्यपदार्थांचे सेवन करणे उत्तम आहे.
  3. शारीरिक व्‍यायाम करा: आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी शारीरिक व्‍यायाम करणे महत्त्वाचे आहे, पण अधिक प्रमाणात व्‍यायाम न करता हलक्‍या स्‍वरूपात व्‍यायाम करणे देखील तितकेचे महत्त्वाचे आहे. चालणे किंवा योगा यासारखे सोपे वर्कआऊट्स प्रभावी ठरू शकतात. सुट्टीच्‍या काळात शरीराची काळजी घेण्‍यासाठी योग्‍य कपडे व फूटवेअर परिधान करण्‍याची खात्री घ्‍या. त्‍वचेवर कोणत्‍याही प्रकारच्‍या अॅब्‍नॉर्मलिटीज आढळून आल्‍यास योग्‍य काळजी व उपचाराच्‍या खात्रीसाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या. 
  4. झोपेबाबत नियम आखा: आपण वाईट सवयी किंवा कामामुळे अनेकदा झोपेबाबतच्‍या नित्‍यक्रमाकडे दुर्लक्ष करतो. पण, आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी पुरेशी झोप मिळणे आवयक आहे. यामुळे झोपेची कमतरता टाळण्‍यास मदत होते, ज्‍याचा तुमची भूक किंवा क्रेव्हिंग पातळ्यांवर नकारात्‍मक परिणाम होऊ शकतो. तसेच, झोप चयापचयाला साह्य करण्‍यामध्‍ये आणि रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे नियमन करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते, जे मधुमेहांचे व्‍यवस्‍थापन करताना आवश्‍यक आहे.  
  5. तणाव व्‍यवस्‍थापन: तुम्‍ही तणावग्रस्‍त असताना शरीरामध्‍ये स्‍ट्रेस हार्मोन्‍स तयार होतात, ज्‍यामुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांमध्‍ये वाढ होऊ शकते आणि इन्‍सुलिन प्रतिकार होऊ शकते. कालांतराने रक्‍तदाब वाढू शकतो आणि हृदयसंबंधित आजार होण्‍याचा धोका वाढू शकतो. तणाव दूर करण्‍यासाठी गाणी ऐकणे, योगा किंवा नृत्‍य अशा धमाल क्रियाकलापांचा आनंद घ्‍या. तसेच, प्रियजनांसोबत उत्तम वेळ व्‍यतित करणे किंवा तुम्‍ही ज्‍या स्थितीमधून जात आहात त्‍याबाबत प्रोफेशनल्‍ससोबत सल्‍लामसलत करणे यामुळे तणाव दूर होण्‍यास मदत होऊ शकते.      

ही साध्‍य करता येण्‍याजोगी ध्‍येये निर्धारित करत मधुमेही व्‍यक्‍ती त्यांच्‍या आरोग्‍यावर नियंत्रण ठेवू शकतात आणि वर्षभर अधिक प्रभावीपणे त्‍यांच्‍या मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करू शकतात. लक्षात ठेवा, प्रत्‍येक लहान पुढाकार महत्त्वाचा ठरतो आणि संयम व निर्धारासह तुम्‍ही ध्‍येये संपादित करण्‍यासह तुमच्‍या आरोग्‍यामध्‍ये सुधारणा करू शकता. 

Related posts

मुंबईत प्रथमच संतोकबा मानवतावादी पुरस्काराचे आयोजन

Shivani Shetty

इन्श्युरन्सदेखोद्वारे विमा एजन्ट्सचे सक्षमीकरण

Shivani Shetty

इझमायट्रिपचा ओएनडीसी नेटवर्कसोबत सहयोग

Shivani Shetty

Leave a Comment