maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सकडून एआय स्क्रिन युगाला आणि नवीन जीवनशैली पद्धतीला चालना देण्‍यासाठी २०२४ निओ क्‍यूएलईडी, मायक्रो एलईडी, ओएलईडी आणि लाइफस्‍टाइल डिस्‍प्‍लेज लाँच

निओ क्‍यूएलईडी ८के ने नवीन एनक्‍यू८ एआय जेन३ प्रोसेसरसह पिक्‍चर व साऊंड क्‍वॉलिटीला नव्‍या उंचीवर नेले

निओ क्‍यूएलईडीमधील अधिक क्षमतापूर्ण प्रोसेसर्स, ब्राइटर ओएलईडी आणि कुशलतेने डिझाइन केलेल्‍या मायक्रो एलईडी व्‍युईंग अनुभवामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतात

लाइफस्‍टाइल लाइनअपमध्‍ये म्‍युझिक फ्रेम कस्‍टमायझेबल स्‍पीकर आणि क्षेत्रातील पहिला वायरलेस ८के प्रोजेक्‍टर द प्रिमिअर ८के यांची भर करण्‍यात आली आहे  

लास वेगास, नेवाडा – जानेवारी ८, २०२४ – सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने आज CES® 2024 निमित्त त्‍यांचे नवीन क्‍यूएलईडी, मायक्रो एलईडी, ओएलईडी आणि लाइफस्‍टाइल डिस्‍प्‍ले लाइनअप्‍सची घोषणा केली. या घोषणेसह स्‍मार्ट डिस्‍प्‍ले क्षमतांच्‍या पैलूंना नव्‍या उंचीवर नेण्‍यास सज्‍ज असलेल्‍या नेक्‍स्‍ट-जनरेशन एआय प्रोसेसरच्‍या सादरीकरणाच्‍या माध्‍यमातून एआय स्क्रिन युगाची देखील सुरूवात झाली. सुधारित पिक्‍चर व साऊंड क्‍वॉलिटी देण्‍यासह नवीन लाइनअप ग्राहकांना सॅमसंग नॉक्‍सद्वारे सुरक्षित एआय-समर्थित वैशिष्‍ट्ये देखील देते, जेथे वैयक्तिक जीवनशैलींना प्रेरित व सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.

”आज आपण हायपरकनेक्‍टेड युगामध्‍ये राहत आहोत, ज्‍यामुळे फक्‍त दर्जात्‍मक व्हिज्‍युअल अनुभव देणे पुरेसे नाही. डिस्‍प्‍लेनी स्क्रिनवर व स्क्रिनपलीकडे आपले जीवन सुधारित केले पाहिजे,” असे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स येथील व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे अध्‍यक्ष व प्रमुख एसडब्‍ल्‍यू यंग म्‍हणाले. ”ऑन-डिवाईस एआय तंत्रज्ञानाची शक्‍ती असलेल्‍या सॅमसंगच्‍या एआय स्क्रिन्‍स वापरकर्त्‍यांच्‍या घरांमध्‍ये मुख्‍य आकर्षण असण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत, ज्या सर्व सुसंगत डिवाईसेसशी कनेक्ट होत वापरकर्त्‍यांना अधिक स्थिर व वैविध्‍यपूर्ण जीवनशैलीचा आनंद देतात.”

सुधारित निओ क्‍यूएलईडी ८के पिक्‍चर क्‍वॉलिटीसाठी एआय कार्यक्षमतेत दुप्‍पट वाढ