maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralNew initiative for handicappedPublic InterestSocialठळक बातम्यामहाराष्ट्रमुंबईसंपादकीयसमाजकार्यसार्वजनिक स्वारस्य

मुंबईत ‘रॅम्प माय सिटी’चा नवा उपक्रम; सार्वजनिक ठिकाणं आता दिव्यांगांसाठी सोयीस्कर पोलीस स्टेशन ते उपाहारगृहे येथे उभारले जाणार नवे रॅम्प

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२४: नावीन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या ‘रॅम्प माय सिटी’ या संस्थेनं मुंबईत आपल्या नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. समावेशक समाज निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. २०२० साली स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत पाच शहरांमधल्या ५०० हून अधिक सार्वजनिक ठिकाणांचं रूपांतर केलं आहे. यामुळे दिव्यांग व्यक्ती आणि वयोवृद्धांसाठी व्हीलचेअर वापरण्यास सोयीस्कर वातावरण तयार करण्यात मोठी प्रगती झाली आहे. मुंबईतल्या या नव्या उपक्रमांतर्गत १५ पोलीस ठाणी आणि शहरातल्या २५ नामांकित उपहारगृहांमध्ये रॅम्प बसवण्यात येणार आहेत. सर्वांसाठी सुगम शहर बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
मुंबईतला हा उपक्रम केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नाही; तर त्यातून समाजातल्या सर्व घटकांना जोडण्याचा आणि त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. रॅम्प बसवल्यामुळे दिव्यांग व्यक्तीही आता इतरांसारखेच सर्व अनुभव घेऊ शकतील. उदाहरणार्थ, आवडत्या उपहारगृहात जाणे, मित्रांना भेटणे किंवा समाजात मोकळेपणानं वावरणे, हे आता त्यांच्यासाठी सहज शक्य होईल.
या उपक्रमाबद्दल बोलताना ‘रॅम्प माय सिटी’ चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रतीक खंडेलवाल म्हणाले, “आमचं ध्येय अडथळे दूर करणं आणि मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात सर्वांना मुक्त वावर मिळवून देणं, हे आहे. आमच्या नव्या उपक्रमामुळे अशा शहराची निर्मिती होईल जिथे प्रत्येकजण मोकळेपणानं आणि आत्मविश्वासानं फिरू शकेल, याचा आम्हाला आनंद आहे. ‘रॅम्प माय सिटी’ च्या कामामुळे आधीच ३ लाखांहून अधिक लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आम्ही मुंबई पोलिसांशीही सहकार्य करत आहोत, जेणेकरून शहरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम राबवता येईल. यामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि समावेशकता वाढेल. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन अधिक सुरक्षित आणि आनंददायी बनवण्यात सुगमता किती महत्त्वाची आहे, हे या सहकार्यातून दिसून येतं.”
त्यांनी पुढे सांगितलं, “आमचं उद्दिष्ट मुंबईत आमच्या कामाचा विस्तार करणं आणि १००० सार्वजनिक व खासगी ठिकाणांपर्यंत पोहोचणं, हे आहे. यात उद्यानं, शाळा, रुग्णालयं आणि पर्यटन स्थळांसोबतच कॉर्पोरेट कार्यालयं आणि रहिवासी सोसायट्यांचाही समावेश असेल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत. एकत्र येऊन आपण पुढच्या पिढ्यांसाठी एक अधिक सुगम मुंबई निर्माण करू शकतो. ‘रॅम्प माय सिटी’ प्रत्येकाला या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्यास प्रोत्साहित करत आहे. कंपन्या, बिगर-सरकारी संस्था आणि सुगमतेला पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींचं आम्ही स्वागत करतो.”
‘रॅम्प माय सिटी’ ची सुरुवात प्रतीक खंडेलवाल यांच्या वैयक्तिक अनुभवातून झाली. २०१४ मध्ये पाठीच्या कण्यास झालेल्या दुखापतीमुळे त्यांना व्हीलचेअर वापरावी लागली. या अनुभवातूनच त्यांच्यात सुगमता आणि समावेशकतेसाठी काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली. त्यांच्या या कार्याला युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँक यांसारख्या नामवंत संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. याशिवाय, त्यांना युनिव्हर्सल डिझाइन पुरस्कार (२०२१), सवाई पुरस्कार (२०२२) आणि सीएनएन नेटवर्क १८ पुरस्कार (२०२२) यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Related posts

महालक्ष्मी देवीच्या साक्षीने पार पडला बाईपण भारी देवा चित्रपटाच्या शीर्षक गीताचा लाँच सोहळा*

Shivani Shetty

कोटकने मेट्रो ३ अॅक्‍वा लाइनच्‍या बीकेसी स्‍टेशनला कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशन असे ब्रँड नाव दिले

Shivani Shetty

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून मान्‍सून ऑफर्सची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment