maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल

मुंबई, ४ जानेवारी २०२४: ब्रिटन-स्थित आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रॅण्‍ड द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल परतला आहे. हा सेल पूर्वीपेक्षा अधिक मोठा, सर्वोत्तम व अधिक आकर्षक असणार असून सर्व श्रेणींमधील विविध उत्‍पादनांवर आकर्षक सूट देण्‍यास सज्‍ज आहे. हा सेल ३१ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.

प्री-पॅक केलेल्‍या गिफ्ट सेट्सवर ऑफर्स, हंगामी ब्‍युटी पिक्‍सवर उच्‍च-स्‍तरीय डील्‍स आणि आजपर्यंत सेलमध्‍ये कधीच न दिसण्‍यात आलेल्‍या बेस्‍टसेलर्सवर सूटसह द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल ग्राहकांना अद्वितीय आनंदाचा अनुभव देईल. ग्राहक निवडक उत्‍पादनांवर जवळपास ५० टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात.

ब्रिटीश रोज, आल्‍मंड मिल्‍क व अॅवोकॅडोमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या व ९६ तासांपर्यंत मॉइश्‍चराइजिंग देणाऱ्या बॉडी बटर्ससह नरिशिंग विंटर केअर. सव्‍वीस रंगछटांमध्‍ये उपलब्‍ध व्हिटॅमिन ई व अॅलो वेराने युक्‍त फ्रेश न्‍यूड फाऊंडेशन्‍स. हे वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन गडद रंगछटांमध्‍ये कॉन्‍टोर म्‍हणून वापरले जाऊ शकते. एडलवाइस कलेक्‍शन, ज्‍यामध्‍ये एडलवाइस फुलांचा अर्क असलेल्‍या उत्‍पादनांचा समावेश आहे, ज्‍यामध्‍ये रेटिनॉलच्‍या तुलनेत ४३ टक्‍के अधिक अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स आहे. नैतिकदृष्‍ट्या स्रोत मिळवलेल्‍या, उच्‍च दर्जाच्‍या नैसर्गिक घटकांच्‍या श्रेणींमध्‍ये हेम्‍प, शिया आणि टी ट्री ऑईल यांचा देखील समावेश आहे.

अविश्‍वसनीय आकर्षक दरांसह द बॉडी शॉपचा एण्ड ऑफ सीझन सेल सर्वांना प्रत्‍येक बजेटमध्‍ये व प्रत्‍येक प्रसंगासाठी काहीतरी प्रदान करतो, ज्‍यामुळे हा लोकप्रिय गिफ्टिंग गंतव्‍य ब्रॅण्‍ड आहे. तसेच गिफ्टिंग वस्‍तू खरेदी करण्‍याव्‍यतिरिक्‍त ग्राहक टेडी एक्‍स्‍पोर्ट्सशी संलग्‍न असलेल्‍या महिलांच्‍या समुदायासोबत सुट्टीचा आनंद देखील घेतील. टेडी एक्‍स्‍पोर्ट्स ही ब्रॅण्‍डची दीर्घकालीन सीएफटी सहयोगी आहे, जिने द बॉडी शॉपच्‍या स्पार्कअचेंज मोहिमेची पार्श्‍वभूमी तयार केली. या महिलांनी हाताने विविध गिफ्ट पाऊचेस् बनवले आहेत, जे खास सणासुदीच्‍या काळासाठी द बॉडी शॉपने सादर केले.

आपल्‍या सौंदर्य साठ्यामध्‍ये अधिक भर करण्‍याची किंवा प्रियजनांना काही सेल्‍फ-केअर उत्‍पादने गिफ्ट देण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल परिपूर्ण थांबा आहे. एण्‍ड ऑफ सीझन सेल द बॉडी शॉपच्‍या अधिकृत वेबसाइट दबॉडीशॉपडॉटइन तसेच देशभरातील त्‍यांच्‍या २०० हून अधिक स्‍टोअर्समध्‍ये लाइव्‍ह असेल.

Related posts

नवीन किया सोनेट ७.९९ लाख रुपयांमध्ये लॉन्च

Shivani Shetty

डॉ.वेणू मूर्ती अपराजिताचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्त

Shivani Shetty

यामाहाने भारतात ३०० ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर आऊटलेट्ससह गाठला उल्‍लेखनीय टप्‍पा

Shivani Shetty

Leave a Comment