maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

हृदय पीडित मॉरिशसहुन आलेल्या नवजात बाळांना नवी मुंबईत मिळाले जीवनदान

नवी मुंबई, ७ ऑगस्ट २०२४: अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या सुपर स्पेशालिटी पीडियाट्रिक कार्डिओलॉजी टीमच्या कौशल्यांमुळे, मॉरिशसहून आलेली दोन प्रीमॅच्युअर नवजात बाळ आपल्या आई बाबाच्या कुशीत हसत खेळत आपल्या घरी परतली आहेत. ही दोन्ही बाळे नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्मली होती आणि त्यांच्यामध्ये दुर्लभ व जीवघेणा, जटिल हृदय रोग जन्मापासूनच आढळून आला होता. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये या नवजात बाळावर पीडियाट्रिक कार्डिओलॉजी सिनियर कन्सल्टन्ट डॉ भूषण चव्हाण यांनी मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. बाळाच्या हृदयामध्ये जन्मापासूनच असा काही विकार असेल ज्यामुळे हृदयाची संरचना आणि कार्य यावर परिणाम होत असेल तर त्याला जन्मजात हृदय रोग म्हणतात. त्यामुळे नवजात बाळांमध्ये गंभीर, जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जवळपास १% मुलांना जन्मजात हृदय रोग असतो, जगभरातील बाळांमध्ये आढळून येणारा हा सर्वात जास्त सामान्य जन्मजात दोष आहे. एकट्या भारतात दरवर्षी २००,००० पेक्षा जास्त बाळांना जन्मजात हृदय रोग असतो, त्यापैकी एक पंचमांश बाळांमध्ये हा दोष खूपच गंभीर असतो, त्यामुळे जन्मानंतर पहिल्याच वर्षभरात त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक असते.

मॉरिशसहुन आलेल्या या दोन नवजात बाळांपैकी एक बाळ ३४ आठवडयांनी जन्मले होते आणि त्यावेळी त्याचे वजन फक्त १.५ किलो होते. बाळाला पल्मनरी अट्रेसियासोबत टेट्रालॉजी ऑफ फॉलोट झाले होते. या जटिल परिस्थितीमध्ये फुफ्फुसांपर्यंत जाणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये गंभीर अडथळे येतात, त्यामुळे बाळ निळे पडू लागते. दुसरे बाळ देखील नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्मले होते आणि त्यावेळी त्याचे वजन फक्त २ किलो होते. या बाळामध्ये हृदयाशी संबंधित अनेक विसंगती होत्या, तसेच सीट्स इन्व्हर्सस म्हणजेच हृदय छातीमध्ये उजव्या बाजूला असल्याने त्याची तब्येत अजून साइटस जास्त खराब झालेली होती.

डॉ भूषण चव्हाण, सिनियर कन्सल्टन्ट-पीडियाट्रिक कार्डिओलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”ही बाळे प्रीमॅच्युअर होती आणि त्यांची स्थिती खूपच गुंतागुंतीची झाली होती, त्यामुळे त्यांच्या केसेसमध्ये अनेक आव्हाने होती. दोन्ही केसेसमध्ये हृदय दोषाचे असे कॉम्बिनेशन होते जे खूपच दुर्लभ आहे. त्यामुळे खूप बारकाईने नियोजन व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आमच्या टीमचा मला खूप अभिमान आहे, ज्यांनी या केसेस वर काम केले. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा असल्याने आम्ही या नाजूक प्रक्रिया यशस्वीपणे करू शकलो.”

टेट्रालॉजी ऑफ फॉलोट आणि पल्मनरी एट्रेसियाच्या पहिल्या केसमध्ये हृदयातून फुफ्फुसांपर्यंत रक्तप्रवाह नियंत्रित करणारा व्हॉल्व (पल्मनरी व्हॉल्व) पूर्णपणे ब्लॉक झालेला होता. रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होण्यासाठी डॉ चव्हाण यांनी एक हवा नसलेला फुगा आणि स्टेन्टसोबत कॅथेटरला मांडीतील रक्तवाहिनेतून आत सरकवले व अतिशय काळजीपूर्वक हृदयापर्यंत नेले. जेव्हा कॅथेटर अरुंद झालेल्या भागापर्यंत पोचला तेव्हा फुग्याला फुगवून ती जागा रुंद केली गेली. स्टेन्ट एका स्कॅफोल्डप्रमाणे काम करतो आणि ती जागा कायमची रुंद राहील याची काळजी घेतो, त्यामुळे प्राणवायू युक्त रक्त हृदयापासून फुफ्फुसांपर्यंत वाहत राहते. या बाळाचा ब्ल्यू सिंड्रोम ठीक झाला आणि त्याला नवजीवन मिळाले.

दुसऱ्या बाळाच्या केसमध्ये एक वेगळेच आव्हान होते. त्याला अनेक हृदय दोष होते, शिवाय हृदय छातीमध्ये उजव्या बाजूला होते. मुळातच नाजूक असलेली प्रक्रिया या आव्हानांमुळे अजूनच कठीण बनली होती. रिअल-टाइम मार्गदर्शनासाठी प्रगत इमेजिंग तंत्राचा वापर करत, डॉ चव्हाण यांनी हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी रक्तवाहिन्यांमार्फत एक कॅथेटर नेव्हिगेट केला आणि हृदयाच्या आत योग्य रक्तप्रवाहासाठी पीडीएच्या आत (पेटंट डक्टस आर्टेरियोसस) दोन स्टेन्ट लावले.

श्री अरुणेश पुनेथा,पश्चिम क्षेत्र-रिजनल सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,”अपोलो हॉस्पिटल्समध्ये आम्ही रुग्णाचे वय किंवा केसमधील गुंतागुंत यांची पर्वा न करता सर्वोच्च मानक देखभाल प्रदान करण्यासाठी बांधील आहोत. नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या या बाळांनी आमच्याकडील विशेष उपचार आणि देखभाल मिळवण्यासाठी हजारो मैलांचे अंतर पार केले, त्यांच्या केसेसमध्ये मिळालेले यश डॉ चव्हाण आणि आमच्या संपूर्ण पीडियाट्रिक कार्डियाक टीमची कौशल्ये, करुणा व समर्पण दर्शवते. आम्हाला अभिमान आहे की, जन्मजात हृदय रोगामुळे उत्पन्न होणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करत असलेल्या कुटुंबांना आशा आणि उपचार प्रदान करत आहोत. जागतिक स्तराच्या आरोग्य सेवा प्रत्येकाला उपलब्ध करुन देण्याची आमची बांधिलकी या केसेसमध्ये मिळालेल्या यशाने दर्शवली आहे.”

अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये आणीबाणीच्या केसेस हाताळण्यासाठी बाळांवरील उपचारांसाठी आवश्यक अत्याधुनिक पायाभूत सुविधा २४X७ उपलब्ध आहेत. त्यामुळे या दोन्ही बाळांच्या तब्येतीला वेगाने आराम मिळाला आणि काही दिवसांतच त्यांना घरी घेऊन जाण्याची परवानगी मिळाली. त्यावेळी ही दोन्ही बाळे कोणत्याही सपोर्टशिवाय श्वास घेऊ शकत होती आणि त्यांना सतत औषधे घेत राहावी लागण्यापासून मुक्ती मिळाली होती. पहिल्या बाळाला वय जसजसे वाढत जाईल तसतसे अजून काही शस्त्रक्रिया करण्याची गरज भासेल, तर जास्त गुंतागुंतीच्या समस्या असलेल्या बाळाला सतत देखभालीची व भविष्यात उपचारांची आवश्यकता असेल.

Related posts

इझमायट्रिपद्वारे ईट्रॅव्‍ह टेकचे संपादन

Shivani Shetty

महिलांच्‍या आरोग्‍यसेवेला चालना देण्‍यासाठी ईझीआरक्‍सचा पुढाकार

Shivani Shetty

इन्श्युरन्सदेखोद्वारे विमा एजन्ट्सचे सक्षमीकरण

Shivani Shetty

Leave a Comment