शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.
*IMDb वरील शाह रूख खानचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 10 टायटल्स असे आहेत*
1. स्वदेस – 8.2
2. चक दे इंडिया – 8.1
3. फौजी – 8.1
4. डीडीएलजे – 8.0
5. माय नेम इझ खान – 7.9
6. कल हो ना हो – 7.9
7. हे राम – 7.9
8. सर्कस – 7.8
9. वीर जारा – 7.8
10. कभी हां कभी ना – 7.6