राष्ट्रीय 23 November 2023- भारतात मानसिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्या विषयी हळूहळू लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत असून या विषयी होत असलेल्या जागरुकता आणि संभाषणामुळे गैरसमजही कमी होऊ लागले आहेत. मानसिक आरोग्य दिनाच्या तिसर्या वर्षी आयटीसीच्या फील गुड विथ फियामा मेंटल वेलबिईंग सर्वेक्षणातून असे दिसून आले की भारतातील तरुणाई ही मानसिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्या विषयी त्यांचा दृष्टिकोन बदलत आहेत. नेल्सन आयक्यू द्वारे घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून मानसिक आरोग्यासाठी जेन झी आणि मिलेनियल्स हे त्यांच्यासाठी विश्वास, वर्तवणूक, प्रमुख तणाव आणि डी-स्ट्रसर यांचीही माहिती यातून घेण्यात आली.
जगभरांतील अन्य भागांप्रमाणे सिनेमा सुध्दा सांस्कृतिक प्रभाव आणि वागणूकीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणून महत्त्वपूर्ण भुमिका अदा करत आहे. दी फील गुड विथ फियामा मेंटल हेल्थ वेल बिईंग सर्व्हे २०२३ मधून असे दिसून आले की जेन झी आणि मिलेनियल्स चा असा विश्वास आहे की मानसिक आरोग्या विषयी सिनेमात दाखवल्या जाणार्या गोष्टी सकारात्मक असल्यास त्यामुळे समाजावर प्रभाव पडून संभाषण वाढेल. गेल्या काही वर्षांत मानसिक आरोग्याने प्रसारणात महत्त्वपूर्ण भुमिका अदा केली असून या सर्वेक्षणातून अधिक सकारात्मकता दर्शवण्यावर जोर देण्यात आला. सर्वेक्षणाला प्रतिसाद देणार्यां पैकी ८२ टक्के लोकांच्या मते टिव्ही/ओटीटी हा मानसिक आरोग्या विषयी परिणामकारक गोष्टी देऊ शकेल. ७७ टक्के लोकांच्या मते टिव्ही/चित्रपट आणि ओटीटी कंटेंट मुळे मानसिक आरोग्या विषयी संभाषण घडू शकेल. तर दुसरीकडे मानसिक स्वास्थ्यासाठी आणि रोजचा तणाव कमी करण्यसाठी सकारात्मक बदल घडत असून पॉप संस्कृती मध्ये अधिक चांगले संदर्भ देण्याची गरज आहे. ७८ टक्के भारतीयांच्या मते ड्रामॅटिक प्रतिनिधीत्व हे मानसिक आरोग्या विषयी केल्यास लोक हे उपचारांपासून दूर जाती आणि ७९ टक्के लोकांच्या मते सकारात्मक मानसिक आरोग्याचे चित्रपटात प्रदर्शन केल्यास गैरसमज दूर होण्यास मदत होईल. ८१ टक्के लोकांना असेही वाटते की सेलिब्रिटीज सुध्दा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करु शकतात.
जेन झी असो किंवा मिलिनियल्स, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या तणावाचा सामना करत आहे. सर्वेक्षणातून आलेल्या निष्कर्शातून असे अधोरेखित होते की कामाचा ठिकाणी, नातेसंबंधात असो किंवा एकूण मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्तीवर ते भर देत आहेत.
सर्वेक्षणातील काही महत्त्वपूर्ण निष्कर्श –
काम आणि करियरचे निर्णय |
कामाचा तणाव आणि करियरशी संबंधित निर्णय यांमुळे भारतातील तरुणांच्या मानिसक आरोग्यावर परिणाम होतो आणि तणाव वाढतो. जेन झी ने करियरच्या चिंते बाबत मिलेनियल्सना १८ टक्क्यांनी मागे टाकले आहे.
१० पैकी ९ भारतीयांना कामाच्या ठिकाणी तणाव असूनही ते अधिक वर्क लाईफ बॅलन्स योजनांवर काम करु इच्छितात. ६२ टक्के लोकांना कामा ठिकाणी जाण्याचा तणाव जाणवतो. ५७ टक्क्यांहून अधिक जेन झी मुलांच्या मते मानसिक आरोग्यावर जास्त तणाव देणारी गोष्ट म्हणजे करियरशी संबंधित निर्णय होय. ४२ टक्के भारतीय पुरुषांना तत्काळ व्यावसायिक मदतीची गरज आहे आणि ३५ टक्के लोक हे ऑनलाईन काऊन्सेलिंगची मदत घेतात. बंगलोरच्या ५३ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की कामाच्या ठिकाणच्या नातेसंबंधांमुळे ही तणावात वाढ होते. |
नातेसंबंध
|
द फील गुड विथ फियामा मेंटल हेल्थ सर्व्हे २०२३ मध्ये असे दिसून आले की ३८ टक्के भारतीय स्त्रिया मानसिक आरोग्यावर परिणाम करणार्या प्रमुख कारणांपैकी नकारात्मक संबंधांना कारणीभूत ठरतात आणि ६४ टक्के भारतीय मानतात की सामाजिक मानकांमुळे त्यांना त्रास होत असतो. ८२ टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे की त्यांच्या पालकांशी संपर्क केल्यास ते उपचारात्मक काम करु शकतात. यातून असेही दिसून येते की पालकांवरील त्यांच्या विश्वासामुळे त्यांना चांगले मानसिक उपचार मिळू शकतात. पण केवळ २९ टक्के भारतीयांना असे वाटते की भाऊ बहीण सुध्दा त्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रवासात महत्त्वपूर्ण भुमिका बजावतात, त्याच बरोबर पार्टनर्स खूपच कमी म्हणजे केवळ ३१ टक्के योगदान त्यांच्या मानसिक आरोग्यात देत असतात. ६१ टक्के भारतीयांना आपल्या परिजनांच्या मानसिक आरोग्य विषयक समस्यांमध्ये योगदान देण्यास ते असमर्थ आहेत. |
भारतातील आरोग्य आणि स्वास्थ्य
|
अधिकतर भारतीय मानसिक आरोग्याच्या लक्षणां विषयी अनभिज्ञ आहेत, याचे सर्वाधिक प्रमाण दिल्लीत ८५ टक्के आहे. ७२ टक्के भारतीयांना हे माहिती आहे की कोणाला मानसिक आरोग्य विषयक समस्या आहेत आणि त्यांचे मानसिक आरोग्यासह डिप्रेशनचा त्रास आहे.
सर्वेक्षणातून पुढे हे दिसून आले की ८६ टक्के मुंबईकर अगदी शेवटचा उपाय म्हणून उपचारांचा मार्ग अवलंबतात.
पुढे जाऊन सकारात्मक पाऊल उचलतांना सर्वेक्षणातून असे दिसून आले की ८४ टक्के लोकांच्या मते मानसिक आरोग्य विषयक समस्या असणे ही लाजेची बाब नाही. ५४ टक्के भारतीयांच्या मते मानसिक आरोग्य हे एकूण आरोग्यातील महत्त्वपूर्ण बाब आहे. ५८ टक्के लोक हे याचा सामना योगा, प्राणायाम आणि व्यायामाच्या माध्यमातून करतात.
सकारात्मक गोष्टीचा विचार करतांना ६७ टक्के भारतीय जेन झी आणि ६३ टक्के मिलेनियल्स ने त्यांच्या पिढीसाठी फोमोच्या पुढे जाऊन फन ऑफ मिसिंग आऊट चा पर्याय निवडतात.
|
जरी तणाव आणि चिंतेची विविध कारणे असली तरीही ५१ टक्के भारतीयांच्या मते समाजमाध्यमांचा वाढता वापर असल्याने ऑनलाईन काऊन्सेलिंग व उपचारांसाठी तो एक उत्तम पर्याय ठरु शकतो. तरुणाई आता तणावमुक्तीसाठी विविध पर्यायांचा वापर करत असून ८६ टक्के भारतीय हे तणाव आणि नकारात्मकता घालवण्यासाठी संगीताचा आधार घेत आहेत.
या सर्वेक्षणा विषयी बोलतांना आयटीसी लिमिटेडच्या पर्सनल केअर प्रॉडक्ट्सचे डिव्हिजनल चीफ एक्झिक्युटिव्ह समीर सत्पती यांनी सांगितले “ विविध जागरुकता मोहिमा आणि चर्चासत्रांमुळे लोकांच्या मानसिक आरोग्या बद्दलच्या भावनांमध्ये सकारात्मक बदल घडणे ही एक आनंदददायी बाब आहे. फियामा मेंटल वेलबीईंग सर्वे हा भारतीय तरुणाई आणि त्यांचा मानसिक आरोग्या विषयीचा दृष्टिकोन अधोरेखित करत असतो. या सर्वेक्षणाच्या तिसर्या पर्वात यातून काही महत्त्वपूर्ण सत्ये बाहेर आली ज्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊन ही समस्या लक्षात घेऊन मानसिक आरोग्याला अधिक सहकार्य प्राप्त होऊ शकेल. फियामा ने नेहमीच मानसिक आरोग्या विषयी सक्षम चर्चा करुन केवळ विचार करण्या पलिकडील काम केले आहे. म्हणूनच आम्ही माईंड्स फाऊन्डेशन बरोबर सहकार्य करुन सवलतीच्या दरात व्हर्च्युअल थेरपीचा उपाय उपलब्ध करुन दिला आहे.”
आयटीसी फियामा ने माईंड्स फाऊन्डेशन बरोबर सहकार्य करुन पहिल्या व्हर्च्युअल क्लिनिकची सुरुवात केली आहे. व्हर्च्युअल क्लिनिक चे डिझाईन हे परवडणार्या दरात मानसिक उपचार हे परवानाधारक व्यावसायिकांकडून दिले जातात. हा कोणत्याही व्यक्तीला व्हर्च्युअल जगतात जाऊन भिती न बाळगता किंवा लाज न बाळगता मदत मागण्याचा उत्तम मार्ग देऊ करण्यात आला आहे. माईंड्स फाऊन्डेशन ने एकत्रित पणे प्रशिक्षित थेरपिस्टचा संघ या व्हर्च्युअल क्लिनिक मध्ये आणला आहे. परिणमी तज्ञांचा सल्ला, उपचार आणि सल्लामसलत आपल्या खाजगीपणासह सोप्या पध्दतीने उपलब्ध होणार आहे.
माईंड्स फाऊन्डेशन च्या या व्यावसायिक प्रशिक्षण प्राप्त थेरपिस्ट चा सल्ला घेण्यासाठी here क्लिक करा आणि हे सेशन रु ३०० प्रती सेशन या दरात उपलब्ध आहे.
* आयटीसी फील गुड विथ फियामा मेंटल वेलबीईंग सर्वे २०२३ चे आयोजन दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगलोर येथील १६-४५ वर्षे वयोगटातील ८०० पुरुष आणि महिलांमध्ये करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचे आयोजन सप्टेंबर २०२३ मध्ये नेल्सनआयक्यू द्वारे करण्यात आले होते.