maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर ‘हिस्टरी हंटरच्या’ एपिसोड 2 मध्ये मनिष पॉल नालंदाच्या हरवलेल्या ज्ञानाचा शोध घेणार

प्रभावशाली अभिनेता आणि हॉस्ट असलेल्या मनिष पॉलसोबत भारताच्या लपलेल्या इतिहासातील थरारक रहस्यांचा शोध सध्याहिस्टरी हंटर ह्या आठ भागांच्या डॉक्युसिरीजमध्ये घेतला जात आहे. 27 नोव्हेंबर पासून डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी+ वर उपलब्ध होणा-या येणा-या एपिसोडमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध अशा नालंदा विद्यापीठाच्या नाहीसे होण्यामागील गूढ उलगडले जाणार आहे.   

बुद्धांच्या काळात इसवी सन पूर्व पाचव्या शतकात स्थापन झालेले नालंदा हे ज्ञानाचे असे केंद्र होते जिथे नागार्जुन, दिगनाग आणि धर्मकीर्ती अशा दिग्गज विद्वानांनी ज्ञानार्जन केले. ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असूनही जगाला ह्या महान शैक्षणिक केंद्राची जाणीव 19 व्या शतकात झाली व त्यामुळे मनिषच्या मनामध्ये असे का?” हा प्रश्न येतो. 

नालंदाच्या नाशासंदर्भात उत्तरे शोधत असताना मनिषने उघड केले,असेही म्हंटले जाते की, आजवर विद्यापीठाच्या केवळ 10% भागामध्ये उत्खनन केले गेले आहे.तो पुढे म्हणतो, “ह्याचा अर्थ असा की, नालंदा विद्यापीठातील लक्षणीय भागाचे अद्याप उत्खनन करणे व त्याचा शोध घेणे बाकी आहे. कदाचित ही रहस्ये येथून अजूनही उघड होऊ शकतील.” 

ज्या कारणामुळे नालंदा बाह्य धोक्यांना बळी पडू शकत होते व ज्यामुळे त्याचा -हास होण्याचे कारण कदाचित घडले होते, अशा एका महत्त्वपूर्ण बाबीकडेही मनिषने इशारा केला आहे. तो स्पष्ट करतो, नालंदाच्या -हासामागील आणखी एक समोर आलेले कारण म्हणजे तंत्र बौद्ध मार्गाचा उदय. त्यामुळे भिक्षुंमध्येच मतभेद निर्माण झाले व त्यामुळेच कदाचित स्थानिक लोक व राजांनीही विद्यापीठाला मदत करणे थांबवले असावे.” 

हिस्टरी हंटरचा दुसरा भाग 27 नोव्हेंबर रोजी रात्री 9:00 वाजता डिस्कव्हरी चॅनलवर बघा. हा शो डिस्कव्हरी+ वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. 

*** 

वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीबद्दल 

वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी (NASDAQ: WBD) ही आघाडीची जागतिक मीडिया आणि मनोरंजन कंपनी आहे व ती टेलिव्हिजन, फिल्म आणि स्ट्रीमिंगवर सर्वांत वैविध्यपूर्ण आणि परिपूर्ण कंटेंट व ब्रॅंडसच्या पोर्टफोलिओची निर्मिती व वितरण करते. 220 हून अधिक देश- प्रदेश आणि 50 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असलेली वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी आपल्या पुढील प्रसिद्ध ब्रॅंडसद्वारे व उत्पादनांद्वारे जगभरातील श्रोत्यांचे ज्ञानासह मनोरंजन करते व त्यांना प्रेरित करते: डिस्कव्हरी चॅनल, डिस्कव्हरी+, सीएनएन, डीसी, युरोस्पोर्ट, एचबीओ,एचबीओ मॅक्स, एचजीटीव्ही, फूड नेटवर्क, ओडब्ल्यूएन, इन्व्हेस्टीगेशन डिस्कव्हरी,टीएलसी, मंगोलिया नेटवर्क, टीएनटी, टीबीएस, ट्रूटीव्ही, ट्रॅव्हल चॅनल, मोटरट्रेंड, एनिमल प्लॅनेट, सायन्स चॅनल, वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन, वॉर्नर ब्रदर्स गेम्स, न्यू लाईन सिनेमा, कार्टून नेटवर्क, एडल्ट स्विम, टर्नर क्लासिक मूव्हीज, डिस्कव्हरी एन एस्पेनॉल, होगार द एचजीटीव्ही आणि इतर. अधिक माहितीसाठी कृपया इथे भेट द्याwww.wbd.com. Instagram: discovery+ | Discovery Channel India 

Related posts

मुंबईत ‘टेक्सफ्युचर परिषदेचे’ आयोजन

Shivani Shetty

आर के स्वामी लिमिटेडने प्रमुख गुंतवणूकदारांना ६५ लाख इक्विटी शेअर्सचे वाटप करून १८७ कोटी रुपये उभारले

Shivani Shetty

भारतातील दीर्घकाळापासून कार्यरत व अद्वितीय रेकॉर्डस् बुक ‘लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस्’कडून २०२४ एडिशन लाँच लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डसने भारतातील उत्तम कामगिरीसह जगाला प्रेरित केले

Shivani Shetty

Leave a Comment