मुंबई, ५ डिसेंबर २०२४: ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी ‘चलो मोबिलिटी’ला ‘डिजिटल इनोव्हेशन’साठी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम न्यू चॅम्पियन्स अवॉर्ड २०२४’ नुकतेच प्रदान करण्यात आले. ‘लाइव्ह ट्रॅकिंग’ आणि ‘डिजिटल तिकिटिंग’साठी ‘चलो मोबिलिटी’चा गौरव करण्यात आला आहे. कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लाखो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुलभ आणि कार्यक्षम झाला आहे. या उपक्रमामुळे अधिकाधिक प्रवासी सार्वजनिक परिवहन सेवेचा स्वीकार करीत आहेत.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या तत्त्वांशी सुसंगत राहून ‘चलो’ गेल्या दोन वर्षांपासून ‘डब्ल्यूईएफ’च्या उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले आहे. यंदा ४५ देशांतील ९० कंपन्यांमधून सन्मानित होणारे आणि ‘डब्ल्यूईएफ न्यू चॅम्पियन्स अॅवॉर्ड’ जिंकणारे ते एकमेव भारतीय टेक स्टार्टअप ठरले आहे. याशिवाय ‘चलो’च्या सहसंस्थापक आणि संचालक प्रिया सिंग यांची ‘न्यू चॅम्पियन्स कम्युनिटी’च्या ‘ग्लोबल बोर्ड ऑफ अॅडव्हायजर’पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
‘चलो’च्या नावीन्यपूर्ण उपायांद्वारे भारत आणि विदेशांतील ६५ शहरांतील ३० हजार बसमधून दर वर्षी अब्ज प्रवासी प्रवास करतात. ‘चलो’ ॲप दरमहा सहा कोटी सेशनसह देशातील अव्वल क्रमांकांचे प्रवासी ॲप ठरले आहे. कंपनीने आजपर्यंत २५ लाख प्रवासी कार्डे जारी केली आहेत. त्यामुळे ते देशातील आघाडीचे प्रवास कार्ड ठरले आहे.मुंबईत ‘बेस्ट चलो अॅप’मुळे एका वर्षात प्रवाशांच्या संख्येत ५५ टक्के वाढ झाली आहे. ‘चलो’चे प्रयत्न केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाशी मिळतेजुळते आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन होत आहे.